सध्या सर्वत्र चर्चा फक्त अमेरिकेने लावलेल्या टेरिफ(Trump Tariff)बद्दल नेमकं भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारी संबंध का खराब झाले? याविषयी आपण चर्चा करूया
अमेरिका व भारताचे व्यापारी संबंध का खराब झाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50% टेरिफ(Trump Tariff) लावला त्यामुळे अमेरिकेमध्ये भारतीय उत्पादनांची मागणी घटली पण यामागे नेमके काय कारण आहे भारत हा कृषिप्रधान देश आहे भारतामध्ये मुख्यता दूध आणि तेल या दोन गोष्टी प्रत्येकासाठी महत्त्वाच्या असतात आणि यामुळेच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध बांधले गेले यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टेरिफ(Trump Tariff)लावण्याचा निर्णय घेतला
भारत रशियाकडून तेल आयात करतो त्यामुळेच अमेरिका नाराज आहे अमेरिकेचे म्हणणे आहे की भारताने त्यांना लागणार कच्च तेल हे अमेरिकेकडूनच घेतलं पाहिजे दुसरं म्हणजे दूध अमेरिकेतील मोठे डेरी फार्म हे भारतामध्ये स्वतःचे उत्पादन विक्री करू इच्छितात पण भारत याबाबतीत असहमत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की भारतीय शेतकऱ्यांचे मच्छीमारांचे आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान मी होऊ देणार नाही
हे हि वाचा –Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?
अमेरिकन डेअरी भारतात आल्यास भारतीय दुग्धव्यवसायावर काय परिणाम?
भारतीय दुग्धव्यवसाय हा जगातील सर्वात मोठा आणि मजबूत क्षेत्र मानला जातो. व याच बाजारपेठेवर लक्ष ठेऊन अमेरिकेला बाजारपेठेवर कब्जा करायचा आहे म्हणून दबाव तंत्राचा वापर करताना अमेरिकेने भारतावर टेरिफ लावला (Trump Tariff)राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या (NDDB) आकडेवारीनुसार, भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश असून वार्षिक उत्पादन २२ कोटी टनांपेक्षा जास्त आहे. परंतु, जर अमेरिकेतील मोठ्या प्रमाणातील डेअरी कंपन्यांनी थेट भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला, तर या क्षेत्रात अनेक आर्थिक,सामाजिक आणि तांत्रिक बदल घडू शकतात.
१. स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता
भारतीय डेअरी उद्योग सध्या अमूल, मदर डेअरी, नंदिनी, गायत्री अशा सहकारी आणि खासगी ब्रँडच्या आधारे चालतो.
अमेरिकन कंपन्या अत्याधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान, आकर्षक पॅकेजिंग आणि आंतरराष्ट्रीय चव या आधारे ग्राहकांना आकर्षित करू शकतात. त्यामुळे स्थानिक ब्रँड्सना टिकून राहण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता आणि पुरवठा शृंखला सुधारावी लागेल.
हे हि वाचा –Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण
२. किंमत बदलणार
अमेरिकन डेअरी उत्पादनांमध्ये सहसा मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्याने प्रति लिटर खर्च कमी असतो. परंतु, भारतात आयात झाल्यास वाहतूक, सीमाशुल्क आणि कोल्ड स्टोरेजचा खर्च वाढेल. जर सरकारने आयातीवरील शुल्क कमी केले, तर अमेरिकन दूध किंवा दूधजन्य पदार्थ भारतीय बाजारात तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतात. याचा थेट परिणाम स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे.
३. शेतकऱ्यांवरील परिणाम
भारतातील सुमारे ८ कोटी कुटुंबे थेट किंवा अप्रत्यक्षपणे दुग्धव्यवसायावर अवलंबून आहेत. अमेरिकन कंपन्या जर मोठ्या प्रमाणात पुरवठा करू लागल्या, तर स्थानिक दूध संकलन केंद्रांना कमी दरात दूध खरेदी करण्याचा दबाव येऊ शकतो.
तथापि, काही तज्ञांच्या मते, अमेरिकन कंपन्या भारतात उत्पादन केंद्रे स्थापन केल्यास स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित जातीचे जनावर, उत्तम पशुखाद्य आणि आरोग्य सेवा मिळू शकतील. त्यामुळे उत्पादनक्षमता वाढण्याची शक्यता आहे.
४. गुणवत्तेचा आणि सुरक्षेचा प्रश्न
अमेरिकन डेअरी उद्योगात दूध प्रक्रियेचे मानदंड अतिशय उच्च दर्जाचे असतात. FDA (Food and Drug Administration) आणि USDA (United States Department of Agriculture) यांच्या कडक नियमांमुळे उत्पादनाची सुरक्षितता सुनिश्चित केली जाते.
जर हे मानदंड भारतीय बाजारात लागू झाले, तर स्थानिक उत्पादकांनाही गुणवत्ता वाढवावी लागेल. मात्र, यामुळे लहान उत्पादकांवर आर्थिक भार पडू शकतो.
५. ग्राहकांच्या पसंतीत बदल
आज भारतीय ग्राहक परंपरागत चव आणि ताजेपणाला प्राधान्य देतात. पण शहरी भागात पाश्चात्य उत्पादनांची मागणी वाढत आहे. अमेरिकन डेअरी कंपन्या या विभागात मजबूत असल्यामुळे, त्या शहरी मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय ग्राहकवर्ग पटकावू शकतात.
६. धोरणात्मक आव्हाने
भारतीय सरकारने डेअरी क्षेत्रात परकीय गुंतवणुकीसाठी काही मर्यादा घातल्या आहेत. थेट गुंतवणूक करण्यासाठी FDI नियम, आरोग्य मानके, लेबलिंग नियम आणि आयात शुल्क हे मोठे घटक ठरतील.
जर सरकारने स्थानिक शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी उच्च आयात शुल्क कायम ठेवले, तर अमेरिकन कंपन्यांना भारतात व्यवसाय करणे अवघड जाईल.
७. संभाव्य सकारात्मक परिणाम
• अत्याधुनिक दुग्ध प्रक्रिया तंत्रज्ञानाचा प्रवेश
• कोल्ड चेन आणि लॉजिस्टिक्स सुधारणा
• नवी रोजगार संधी
• ग्राहकांना अधिक पर्याय आणि उत्तम गुणवत्ता
८. संभाव्य नकारात्मक परिणाम
• स्थानिक लहान उत्पादकांचा बाजार कमी होणे
• दूध खरेदी दर घटणे
• परंपरागत उत्पादनांची मागणी कमी होणे
९)भारतामध्ये प्राण्यांच्या चरबी पासून तयार केलेले प्रोटीन पशुधनासाठी वापरत नाहीत ?
भारतीय परंपरेमध्ये गाईला आईचा दर्जा देण्यात आलेला आहे अत्यंत पवित्र गाईला भारतीय लोक मानतात पण अमेरिकेमध्ये वाया जाणारे मास यापासून गाईंसाठी प्रोटीन तयार केले जाते व ते गाईंना खायला दिले जाते भारतामध्ये दूध देणाऱ्या जनावरांसाठी तेलबिया मधून तेल काढल्यानंतर उरलेली पेंड ही प्रोटीन सोर्स म्हणून वापरली जाते त्यामुळे भारतीय दूध हे अत्यंत शुद्ध मानण्यात येते पण जर अमेरिकेतील दुग्ध उत्पादने भारतात आली तर या धार्मिक भावना दुखवू शकतात तेही कारण भारत अमेरिकेची ही गोष्ट ऐकायला तयार नाही
अमेरिकन डेअरी कंपन्यांचा भारतात प्रवेश हा भारतीय दुग्धव्यवसायासाठी एकाच वेळी संधी आणि आव्हान ठरू शकतो. यातून देशाला तंत्रज्ञान, गुणवत्ता व ग्राहक अनुभवात प्रगती मिळेल; मात्र स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि परंपरागत उत्पादन पद्धतींचे रक्षण करण्यासाठी सरकार आणि सहकारी संस्थांनी धोरणात्मक पावले उचलणे आवश्यक आहे.