माझ्या किंवा इतर कोणाच्याही बालपणामध्ये शाळेत जाणे व गेल्यानंतर पुस्तक वाचणे
हे अत्यंत कंटाळवाणे काम होतं पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं सुशिक्षित माणसाच्या
लक्षात येतं व अशिक्षित माणसाचे लक्षात येतं ही आयुष्यामध्ये पुस्तकांचं काय महत्त्व असतं
जगातील सर्व ज्ञान हे पानांमध्ये अक्षरुपी छापलेलं असतं प्रत्येक धर्मामध्ये जेवढं महत्व त्या धर्मातील
शक्तींना असतं त्यापेक्षाही जास्त महत्व हे त्या धर्माच्या धार्मिक ग्रंथांना असतं यामुळे प्रत्येक धर्मामध्ये
धार्मिक ग्रंथांना खूप महत्त्व असतं श्रद्धा जरी वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा ग्रंथाला तेवढेच महत्त्व आहे
आज जागतिक पुस्तक दिनworld book day शाळा कॉलेजमध्ये गुरुप्रमाणेच आपल्याला ज्ञानदानाचे पवित्र
कार्य हे पुस्तक करत असतात ज्ञान हे कुठल्याही प्रकारचे असेल त्याचे सखोल विश्लेषण व माहिती
पाहिजे असल्यास पुस्तक हा एकमेव पर्याय आहे
भारत देशामध्ये हजारो वर्षांपूर्वी दिले गेले धार्मिक ग्रंथ आज सुद्धा आपल्या आयुष्यातील मूल्य व सिद्धांत
याविषयी ज्ञान पुस्तक आपल्या देत असतात भूतकाळात काय झाले वर्तमान काळात काय चालू आहे व
भविष्य काळामध्ये काय होऊ शकतं याची कालची परिस्थिती आजची परिस्थिती आणि उद्याची परिस्थिती
याच्याविषयी संपूर्ण ज्ञान हे आपल्याला पुस्तक वाचल्याशिवाय book reading आपल्याला कळणार नाही
जगामध्ये जेवढे काही महान व्यक्ती होऊन गेले त्या प्रत्येकानीच वाचनाला व पुस्तकांना खूप महत्त्व दिले आहे
शिक्षण घेऊन व वाचन करून आपण जगातील कुठल्याही प्रकारची माहिती मिळू शकतो आत्मसात करू शकतो
व स्वतःमध्ये बदल देखील करू शकतो पूर्वीच्या काळी जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक व्यवस्था नव्हत्या
तेव्हा गुरुकुल व गावामध्ये आपल्या धार्मिक ग्रंथाचे सामूहिक वाचन करून त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न या गावातील
विद्वान व्यक्ती करत असत म्हणजे आपल्याला वाचन व पुस्तक हे कित्येक पिढ्यापासून माहित आहेत पुढे हळूहळू
शिक्षणाची दारे उघडली गेली व गावोगावी शाळा सुरू झाल्या. पिढ्या शिकू लागल्या व वाचायला सुद्धा लागल्या या
वाचनामधून ग्रामीण भागातील व्यक्तींनी आपला पुढचा टप्पा गाठला व हा टप्पा गाठण्यासाठी परत एकदा पुस्तकांनी
अनमोल साथ दिल 1960 ते 80 च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणात वाचण्याची सवय ही भारतीयांना लागली गावोगावी
शासनामार्फत ग्रंथालय उघडली जाऊ लागली ग्रंथालयामध्ये येणारी वर्तमानपत्रे पुस्तके लोक आवडीने वाचू लागले
याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये व देशांमध्ये शेकडो लेखक आणि कवी यांनी भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले
अगदी चित्रपटापेक्षा सुद्धा पुस्तकांना जास्त महत्त्व येऊ लागले यामध्ये मुंशी प्रेमचंद हरिवंशराय बच्चन वि स खांडेकर
व पु काळे पु ल देशपांडे मिर्झा गालिब शैलेश चतुर्वेदी गुरु रवींद्रनाथ टागोर लक्ष्मण शास्त्री जोशीअसे व
बहिणाबाई संत जनाबाई संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेल्या ओव्या या आज सुद्धा आपल्याला भुरळ घालतात
असे असंख्य हिरे या देशाला मिळून दिले ते पुस्तकांनी बच्चे कंपनीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर ऐंशीच्या दशकामध्ये
वाचण्याची आवड निर्माण झाली होती ती आजच्या घडीला दिसत नाही यामध्ये मुख्यतः कॉमिक्स चांदोबा यासारखे
पुस्तकांनी बालकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेत्या काळामध्ये लहान मुलांमध्ये सुद्धा पुस्तकांविषयी मनामध्ये कुतूहल होती
यानंतर वर्तमानपत्राने सुद्धा या देशांमध्ये बौद्धिक क्रांती आणली व इंग्रजांना हा देश सोडून पळून जावे लागले सकाळी
सकाळी सर्व ताज्या घडामोडी या आपल्या दारापर्यंत येऊ लागल्या निर्भय लिखाणामुळे वृत्तपत्र हे आपल्याला जवळचे
वाटू लागले यामध्ये सुद्धा जागतिक स्तरापर्यंत भारतीय वर्तमानपत्रांनी आपले नाव कमावले यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया
हिंदुस्थान टाइम्स डीएनए लोकमत सकाळ पुण्यनगरी लोकसत्ता यासारख्या वृत्तपत्रांनी आपली छाप जनमानसाच्या मनावर
सोडली पुस्तक वाचून व वर्तमानपत्र वाचून ग्रामीण भागातील मुले यांना नवनवीन संधी कळू लागल्या अगदी या पुस्तकांच्या
जोरावर सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील मुलगा मुलगी हे कलेक्टर एस पी यासारख्या उच्च पदावर निवडले जाऊ लागले
याचे श्रेय सुद्धा आपण पुस्तकांना दिलं पाहिजे
काही मासिकांमधून व्यंगचित्र ताज्या घडामोडी व्यंजन क्रीडाक्षेत्र कलाक्षेत्र यामधील सर्व घडामोडी वर सविस्तर वाचायला
मिळत असेल व जगात काय चालले आहे याविषयी माहिती मिळत असे पुढे हळूहळू इंटरनेटचे युग आले व या युगामध्ये
वाचण्याची कला अशी कमी होऊ लागली प्रत्येक गोष्ट ही इंटरनेटवर अगदी सहजरीत्या कळाल्यामुळे वाचनाकडे
जनतेने पाठ फिरवली आहे
आजीबाईच्या बटव्यामधून एखादा आजार झाल्यास सुरुवातीची औषधं ही त्या बटव्यात सापडायची म्हणजे त्या
पुस्तकात सापडायची
वाचन संस्कृती ही आपण जपली पाहिजे पुढच्या पिढ्यांना ती आपण दिली पाहिजे आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा आपण
वाचण्याची आवड लावली पाहिजे कारण एक वाक्य लक्षात ठेवा वाचाल तर वाचाल ज्ञानी माणूस हा चार चौघांमध्ये उठून
दिसतो त्याचं कारण म्हणजे त्याचं ज्ञान या व्यक्तीला पुस्तकांच्या माध्यमातून अगदी सरळ हातामध्ये पोहोचते
आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त (World Book Day) आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा व आज आपण असा पण करू
की ज्याप्रमाणे जगातील यशस्वी व्यक्ती त्यामध्ये बिल गेट्स असतील वारेन बफेट असतील इलोन मस्क असतील ही व्यक्ती
दर महिन्याला किमान चार नवीन पुस्तके वाचतात एवढ्या बिझी शेड्युल मधून ते वेळ काढून पुस्तक मात्र वाचतात आपण
बोलताना वारंवार म्हणतो की त्यामध्ये काय रॉकेट टेक्नॉलॉजी आहे की काय म्हणजे आपण समजतो की रॉकेट टेक्नॉलॉजी
ही जगातील सगळ्यात अवघड टेक्नॉलॉजी आहे हीच टेक्नॉलॉजी इलॉन मस्क यांनी फक्त वाचून ही टेक्नॉलॉजी आत्मसात
केली त्यामुळे आपण सुद्धा किमान महिन्याचे दोन तरी पुस्तक वाचण्याचा आपण आज पण करूया व हा वैचारिक खजिना
आपल्या दुसऱ्या पिढीला घेऊया व नवीन भारत देश करूया
आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण जास्तीत जास्त पुस्तक वाचावे ते इंटरनेटच्या माध्यमातूननकी पुस्तक स्वरूपात असतील
आपण हि नियमित वाचन करावे हीच अपेक्षा
Add A Comment