आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या तिरुपती तिरुमला मंदिर देवस्थान(Tirupati Tirumala Temple Devotion)चर्चेत आहे या प्रसादामध्ये माश्यांचे तेल व जनावरांची चरबी(Fish oil and animal fat)चा उपयोग केला गेल्याचा आरोप चंद्रबाबू(Chief Minister Chandrababu Naidu)ने केला होता व एनडीडीबी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड चा एक टेस्ट रिपोर्ट सध्या व्हायरल होत आहे तो काय आहे व खरंच प्रसादामध्ये अशा पद्धतीने अशुद्ध गोष्टींचा वापर केला गेला काय ?
कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचे स्थान असलेले तिरुपती बालाजी मंदिर(Tirupati Tirumala Temple Devotion) हे जगातील सर्वात श्रीमंत धर्मस्थळापैकी एक या ठिकाणी दररोज लाखो भाविक भगवान वेंकटेश्वराचे दर्शन घेतात व या दर्शनाच्या नंतर भक्तांना प्रसादरुपी एक लाडू दिला जातो हा लाडू जगप्रसिद्ध आहे याच्यासारखी चव कुठल्याही लाडूला नंतर आल्याचे आपल्याला पाहायला मिळत नाही

मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा आरोप
(Allegation of Chief Minister Chandrababu Naidu)
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू(Chief Minister Chandrababu Naidu)यांनी एका कार्यक्रमांमध्ये बोलताना आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळामध्ये तिरुपती तिरुमला देवस्थानाच्या (Tirupati Tirumala Temple Devotion)वतीने बनविण्यात येणारे लाडू यामध्ये मुख्यतः या लाडूसाठी जी बुंदी तयार केली जाते ती शुद्ध तुपामध्ये तयार केली जाते पण चंद्रबाबू नायडू(Chief Minister Chandrababu Naidu)यांच्या आरोपानुसार मागील काही वर्षापासून तुपामध्ये भेसळ आहे आणि ही भेसळ ही माशाचे तेल चरबी(Fish oil and animal fat)यांसारखे घटक त्या मिसळ युक्त तुपामध्ये होते असा आरोप चंद्रबाबू नायडू(Chief Minister Chandrababu Naidu)यांनी केला आणि एकच खळबळ उडाली सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला कारण भगवान बालाजीला मानणारा खूप मोठा वर्ग हा भारतात तसेच भारताच्या बाहेर आहे आणि जिथे श्रद्धा येतील तेथे अशा पद्धतीचे विभाग याची चर्चा भरपूर होत
असते चंद्रबाबू नायडू(Chief Minister Chandrababu Naidu) यांनी केलेल्या आरोपानंतर दुसऱ्याच दिवशी सोशल मीडिया व प्रसारमाध्यमां मध्ये तो नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड अर्थात एनडीबीबी चा एक अहवाल येत आहे की ज्यामध्ये तिरुपती तिरुमल्ला देवस्थान(Tirupati Tirumala Temple Devotion)च्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या लाडू मध्ये माशाचे तेल व चरबीयुक्त पदार्थ(Fish oil and animal fat)असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे संकल्प टुडे या अहवाला ची पुष्टी करत नाही
या अहवालानंतर मात्र आरोप प्रति आरोप सुरू झाले आहेत माजी मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या पक्षातील काही नेत्यांनी या गोष्टीचे खंडन केले आणि असे काही घडले नाही असे सांगितले आहे

तसेच या रिपोर्टच्या आधारे खाद्य मंत्री जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू(Chief Minister Chandrababu Naidu)यांच्याशी फोनवरून संपर्क केला व नेमके हे प्रकरण काय आहे याविषयी चर्चा केली व हा रिपोर्ट केंद्र सरकारला पाठवायचे सांगितले व या घटनेची चौकशी आता FSSAI कडून केली जाणार असल्याची सांगितले आहे पण प्रत्येक गोष्टीप्रमाणे याही प्रकरणांमध्ये राजकारण सुरू झाले आहे खरं पाहायला गेले तर आज तिच्या ठिकाणी राजकारण नसावं पण आपल्या देशामध्ये असं घडताना दिसत नाही
या रिपोर्ट मध्ये काय लिहिले आहे
एनडीडीबीने दिलेल्या रिपोर्टमध्ये माशाचे तेल चरबीयुक्त(Fish oil and animal fat)पदार्थ असल्याचे स्पष्ट संकेतके यांनी दिली आहे तसेच या सोबतच जर समजा एखादे जनावर अशक्त असेल तर त्याच्या दुधामध्ये चरबीचे प्रमाण हे येऊ शकते असाही खुलासा केला आहे तसेच जनावरांमधील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जी ट्रीटमेंट दिली जाते त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दुधामध्ये चरबी येत असते असाही खुलासा यामध्ये आहे

तिरुपती तिरूमला देवस्थानाचे काय म्हणणे(What to say about Tirupati Tirumala temple)
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू(Chief Minister Chandrababu Naidu)यांनी जेव्हापासून हा गंभीर आरोप केला आहे त्यानंतर तिरुपती तिरुमला देवस्थानाच्या(Tirupati Tirumala Temple Devotion) वतीने एक खुलासा करण्यात आला आहे यामध्ये देवस्थान आणि हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत व देवस्थानातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की अत्याधुनिक सोयीने युक्त असलेल्या एक लॅब ही जेथे लाडू बनविले जातात त्याच्या बाजूला आहे दिवसभरामध्ये बनणाऱ्या लाडू ची गुणवत्ता आणि त्यासाठी वापरली गेलेली सामग्री याची तपासणी प्रत्येक लॉटला तपासली जाते आणि तूप वापरण्यापूर्वी या तुपाच्या गुणवत्तेची ही तपासणी अत्यंत सखोल पद्धतीने केली जाते हा लॅब अत्याधुनिक असल्यामुळे या लॅबच्या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित करणे निरर्थक आहे
तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडूचा इतिहास(History of Ladoo of Tirupati Balaji Temple)
सगळ्यात आधी हा लाडू 1480 ला बनविण्यात आला होता सुरुवातीला या लाडूला मनोहरन असेल म्हटले जायचे
हा लाडू बनविण्यासाठी जवळपास 51 प्रकारची सामग्री लागते पण यामध्ये मुख्यतः बेसनाचे पीठ तूप साखर काजू विलायची व किशमिश या गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो तसेच बुंदी तयार झाल्यानंतर याला लाडूचा आकार देण्याचे काम हे तिरुपती तिरूमला देवस्थानामधील पुजारीच करतात व येथे तयार झालेल्या लाडूला सर्वप्रथम भगवंताला प्रसाद म्हणून दाखविला जातो आणि त्यानंतरच त्याचे वितरण व विक्री केली जाते या लाडूला 300 वर्षाची परंपरा आहे
https://youtube.com/shorts/P8mbjy4-Aqg?si=ejUxvjFRcQvECbfX
हे लाडू बालाजी मंदिरामध्ये जेथे बनवले जातात त्या स्थानाला पोटु असे म्हटले जाते हा लाडू किती प्रसिद्ध आहे याचे उदाहरण तुम्हाला द्यायचे असेल तर 2009 मध्ये मानाचा समजला जाणारा जे आय हे मानांकन सुद्धा या लाडूला मिळालेले आहेत म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेटर
अत्यंत प्रतिष्ठेचा समजले जाणारे हे मानांकन आहे
तसेच या लाडूची चव ही आपल्याला आणखीन कुठेही पाहायला मिळत नाही याच्याशी मिळतील जुळती चौकी बिहार राज्यातील पटना मधील महावीर मंदिरा मधील दिला जाणाऱ्या प्रसादाला तिरुपती बालाजी मधील लाडू प्रसादा सारखाच स्वाद असतो कारण पटनामध्ये जे आचारी लाडू बनतात ते तिरुपतीचेच आचारी असतात
तिरुपती बालाजी मंदिराचा इतिहास(History of Tirupati Balaji Temple)
पर्वणी कथेनुसार श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी हे शेषनागावळ विराजमान होते श्रीहरींना झोप लागली तितक्या तेथे भृग ऋषी आले व श्रीहरींना झोपलेले पाहून त्यांनी जोरात त्यांच्या छातीवर लाथ मारली श्रीहरी उठले आणि त्यांनी ऋषींना विचारले की आपल्या पायाला काही त्रास तर नाही झाला नाही या गोष्टीवर नाराज होऊन माता लक्ष्मी तिथून निघून गेल्या त्यांच्या शोधामध्ये भगवान विष्णू देखील लोकांवर आले आणि आंध्र प्रदेश मधील सप्त पर्वतावर विराजमान झाले हे 1 ) शेषाद्री 2)निलाद्री 3)गरुडाद्री 4)अंजनाद्री 5)वृषभा द्री 6)नारायणाद्री 7)वेंकटाद्री
तसेच पद्मावती देवीची विवाह करण्यासाठी भगवंताला कुबेराकडून कर्ज घ्यावे लागले त्यामुळे या ठिकाणी आजही भक्त भरभरून दान देतात ज्यामुळे भगवंताचे कर्ज फिटेल
पण लाडू मध्ये वापरले गेलेल्या चरबीमुळे(Fish oil and animal fat) सध्या भक्तांमध्ये तसेच साधुसंतांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे एवढ्या पवित्र अशा मंदिरामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे भक्तांमध्ये मोठी नाराजी आहे भक्तांची एवढी अपेक्षा आहे की या आस्थेच्या प्रश्नावर राजकारण न करता अशा पद्धतीच्या भेसळयुक्त तूप देणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा संपूर्ण भारतातील भक्तगण करत आहेत आता केंद्र सरकार व राज्य सरकार या गोष्टीची सखोल चौकशी करणार आहे तरी पण हा लॅब चा रिपोर्ट जो एनडीडीबी मी दिला आहे हा कधीचा आहे व जर तो रिपोर्ट जुना असेल तर तो सर्वांसमोर का आला नाही असे काही प्रश्न सध्या जनतेच्या मनामध्ये आहेत
जेपी लड्डा यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की आम्ही या प्रकरणावर खूप गंभीर आहोत आणि या प्रकरणाची चौकशीही लवकरात लवकर व उच्चस्तरीय होईल की ज्यामुळे करोडो भारतीयांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरामध्ये तर ते अत्यंत चिंताजनक आहे एवढ्या पवित्र ठिकाणी अशा पद्धतीच्या अपवित्र गोष्टी आल्यास कसे याचीही सखोल चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी सांगितले आहे
या मंदिरामध्ये लाखो भाविक तर रोज दर्शन घेतातच पण त्याबरोबरच संपूर्ण भारतातून महत्वाचे मंत्री उद्योगपती राजकारणी लोक अभिनेते अभिनेत्री नेहमी दर्शनासाठी येत असतात
नोट वरील दिलेली माहिती ही वेगवेगळ्या सोशल मीडिया व प्रसार माध्यमांमधून मिळवलेली आहे