भारताला स्वातंत्र्य मिळाले पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताला आपले अनमोल असे
क्रांतिकारी शहीद करावे लागले व प्रयत्न अनेक आंदोलन आणि तेजस्वी नेते यांच्यामुळे भारताला
1947 चा स्वातंत्र्य मिळाले आज स्वतंत्र्याच्या इतक्या वर्षा नंतर त्या स्वातंत्रता सेनानी बद्दल राजकीय
स्वार्थापायी अपशब्द ऐकताना सामान्य माणसाच्या मनाला किती वेदना होतात याची जाण राजकारण
करणाऱ्या मंडळीला कधी येणार नाही स्वतःच्या स्वार्थासाठी या स्वातंत्र्यवीरांच्या बद्दल वाईट बोलताना
कुठलीतरी चित्र विचित्र तर्क काढायची आणि आपण कसे चांगले हुशार विचारवंत हे दाखविण्याचा
केविलवाणा प्रयत्न ही मंडळी करत असतात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा आपल्यासाठी
नेहमी प्रेरणादायी राहणार आहे या स्वातंत्र्यवीरांच्या यादीमध्ये सध्या चर्चेत असलेले नाव म्हणजे वीर सावरकर
सध्या काही राजकीय पक्ष सावरकरांबद्दल वाईट बोलता येत तर काही राजकीय पक्ष हे सावरकरांच्या समर्थनात
येत आहेत असंच काही महात्मा गांधी यांच्या बद्दल घडत आहे एक राजकीय पक्ष महात्मा गांधीं बद्दल वाईट
बोलत आहे तर दुसरा समर्थन करत आहे या महापुरुषांची उंची कमी करण्याचा किंवा गाठण्याचा केविलवाणा
प्रयत्न ही मंडळी करत असतात
सावरकरांचे बालपण (Savarkar’s childhood)
वीर सावरकर यांना त्यांच्या आयुष्यामध्ये तिरस्कार व प्रेम या दोन्ही गोष्टी सारख्याच मिळाल्या एखाद्याचे कर्तृत्व
किती मोठे असले त्या व्यक्तीला तिरस्काराचा सामना हा करावाच लागतो
28 मे 1883 ला भगरू या गावातील दामोदर सावरकर यांच्या घरी सावरकरांचा जन्म झाला त्यांचं नाव विनायक
असे ठेवले गेले तर सावरकरांच्या आईचे नाव राजाबाई होते त्यांना एक भाऊ होता त्यांचे नाव गणेश दामोदर सावरकर
हे होते या दोन्ही सावरकर बंधूंना आई-वडिलांचा सहवास व प्रेम या दोन्ही गोष्टी फार कमी काळासाठी मिळाले त्यांच्या
आई-वडिलांचे अकाली निधन झाले पण लहानपणापासून जेव्हा सावरकरांनी आपल्या प्राथमिक शिक्षणासाठी
श्री शिवाजी हायस्कूल नाशिक येथे प्रवेश घेतला नुकत वाचताच आलं की सावरकरांच्या आई-वडिलांनी त्यांना
रामायण व महाभारत ही ग्रंथ वाचायला दिली आणि इथूनच सावरकरांच्या मनामध्ये हिंदू धर्माबद्दल प्रेम जागृत झाले.
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सावरकरांनी एक सुंदर कविता लिहिली व शाळेतील शिक्षकांचे व गावातील नागरिकांचे
लक्ष हे सावरकरांवर गेले तेव्हा भारत देशावर इंग्रजांची राज्य होते जुलमी इंग्रजी राजवटीने भारतातील लोकांवर
अतोनात अन्याय करायला सुरुवात केली त्यांच्या गावामध्ये एक लाठी हल्ला झाला आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये अनेक
गावकरी जखमी झाले त्या जखमींवर इलाज करून त्यांचे नेतृत्व हे सावरकरांनी स्वतःकडे घेतले व अगदी लहान वयात
त्यांनी इंग्रजी प्रशासनाला हात दिले आणि इथूनच त्यांना गावाचे लोक वीर सावरकर असे म्हणू लागले सावरकरांच्या
जीवनावर आपण पाहायला गेलो तर सर्वात जास्त प्रभाव हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा होता व तसेच स्वतःच्या
मोठ्या भावाला गणेश सावरकर यांना ते गुरु म्हणायचे टिळकांच्या प्रेरणेने त्यांनी स्वतःच्या गावामध्ये सार्वजनिक गणपती
उत्सव साजरा केला सावरकर हळूहळू मोठे होऊ लागले पण देशभक्ती वयाप्रमाणे त्यांच्यात वाढत जात होती 1901 मध्ये
सावरकर यांचा विवाह झाला त्यांच्या पत्नीचे नाव यमुनाबाई होते घरची परिस्थिती सावरकरांची ही अत्यंत हालाकीची होती
पुढील शिक्षण घ्यायला पैसे नव्हते पण यावेळी यमुनाबाई यांचे वडील सावरकरांचे सासरे यांनी त्यांना पैशाची मदत केली
व सावकार आणि पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि इथूनच सावरकरांच्या आयुष्याला एक नवीन
कलाटणी मिळाली फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना सावरकरांनी मित्र मंडळाची स्थापना केली व पुढे हेच मित्र मंडळ
अभिनव भारत समाज म्हणून ओळखू लागल्या
सावरकरांना कॉलेजमधून काढून टाकले(Savarkar was expelled from the college)
पुण्यामध्ये असताना बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये विदेशी कपड्यांची होळी पेटवलीया
कार्यक्रमाला स्वतः लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उपस्थित होते. आपल्या गुरुला भेटण्याचा हा पहिलाच योग सावरकरांच्या
आयुष्यामध्ये आला होता या आंदोलनामधून सावरकर हे लोकमान्यच्या जवळ गेले तर हे कॉलेज प्रशासनाला मात्र आवडले नाही
व कॉलेज प्रशासनाने सावरकर यांना वाढदिवसाच्या कॉलेजमधून काढून टाकले त्या काळामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेणे
म्हणजे शंभर टक्के सरकारी नोकरी लागत होती अगदी सहज सावरकरणा सुद्धा ही नोकरी लागली असती पण मनामध्ये
असलेली देशभक्ती व आंदोलन करण्याची वृत्ती यामुळे सावरकरांना फर्ग्युसन कॉलेज सोडावे लागेल पण सावरकरां मधील
चुणूक ही बघितली की श्यामजी कृष्णा वर्मा या व्यक्तींनी
सावरकर शिक्षणासाठी लंडन येथे गेले (Savarkar went to London for education)
श्यामजी कृष्णा वर्मा यांनी सावरकरांना पुढील शिक्षण पूर्ण करण्याचे सल्ला दिला पण आपली आर्थिक परिस्थिती ही कमपत
असल्यामुळे आपल्याला ते शक्य नाही असं सावरकरांनी वर्माजिनां सांगितले पण वर्माजींनी त्यांच्या शिक्षणाची पूर्ण व्यवस्था
करण्याचा शब्द दिला व यानंतर सावरकरांनी पुढील शिक्षणासाठी तीन जुलै 1906 रोजी लंडन येथे बॅरिस्टर च्या शिक्षणासाठी
प्रवेश घेतला व यादरम्यान सावरकर हे इंडिया हाऊस मध्ये राहू लागले इंडिया हाऊस हे भारतीय विद्यार्थ्यांसाठी व स्वातंत्र सेनानी
साठी राहण्यासाठी बांधलेलं लंडन येथील घर हे सुद्धा श्यामजी कृष्ण वर्मा यांनी बांधले होते आणि येथेच सावरकरांची भेट झाली
ती क्रांतिकारी मदनलाल धिंग्रा यांच्याशी या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली या दोघांच्याही मनामध्ये देशासाठी काहीतरी करायच्या या
भावना होत्या व भारतामध्ये अन्याय करणाऱ्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याला मदनलाल धिंग्रा यांनी इम्पेरियल इन्स्टिट्यूट मध्ये
करझन वायली यांनाठार केलेयाच दरम्यान भारतामध्ये मॉरली मिंटो रिफॉर्म्स या कायद्याला भारतीयांकडून कडाडून विरोध होऊ
लागला कारण या कायद्यानुसार भारतातील मुस्लिम समाजातील लोक हे फक्त मुस्लिम उमेदवारांनाच मतदार करू शकत होते
तर हिंदू मतदार हे फक्त हिंदू उमेदवारांना मतदान करू शकत होते आणिया कायद्याला सावरकरांच्या बंधूंनी कडून विरोध केला
या विरोधामुळे त्यांचे बंधू गणेश सावरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला व त्यांना काळ्यापणाची शिक्षा ठोठावली गेली वही शिक्षा
सुनावणाऱ्या जज ची हत्या झाली व त्या हप्तेचा संबंध हा सावरकरांशी जोडला गेला कारण याची हत्या करणारे अनंत कानेर हे
अभिनव चे कार्यकर्ते होते त्यामुळे हा आरोप सावरकरांना सुद्धा आला
लंडन येथे सावरकर अटक(Savarkar arrested in London)
याच प्रकरणामध्ये सावकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला व 13 मार्च 1910 ला सावरकरांना लंडन येथे अटक झाली व त्यांना भारतात
आणण्यासाठी एक जहाज निघाले पण हे जहाज फ्रान्स या देशाच्या जवळ पोहोचताच सावरकरांनी तेथून पळ काढला व समुद्रात
उडी टाकली व पोहत ते फ्रान्समध्ये आले व त्यांनी फ्रान्स सरकारकडे मदत मागितली पण फ्रान्स सरकारने ही मदत देण्यासाठी
तेथील न्यायालयाने सावरकरांना नकार दिला व परत एकदा सावरकरांना ब्रिटिश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले
काळ्या पाण्याची शिक्षा(Punishment of black water)
जेव्हा हे जहाज भारतामध्ये आले व भारतामध्ये आल्यानंतर सावरकरांवर खटला चालला या खटल्यामध्ये सावरकरांनी आपली
बाजू मांडली पण न्यायालयाने सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली त्याकाळी काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्यांना अंदमान
येथील तुरुंगात टाकले जायचे या नियमाप्रमाणे वीर सावरकरांना अंदमानच्या तुरुंगात टाकण्यात आले येथेच सावरकरांनी
सागरा प्राण तळमळला ही कविता दिली तसेच जवळपास आठ हजार कविता सावरकरांनी लिहिल्या
सावरकरांचा माफीनामा(Savarkar’s apology)
आता आपण चर्चा करूया सावरकरांच्या माफी नाम्यावर सध्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात असते त्यावेळी कायदा होता की आपण
एखाद्या कृत्याबद्दल माफी मागितली तर ती शिक्षा माफ व्हायची सावरकरांना उभ आयुष्य जेलमध्ये घालण्याचा इच्छा नव्हती कारण
असं झालं असतं तर पुढे आपल्याला काहीच करता येणार नाही ही खदखद सावरकरांच्या मनात होती त्यामुळे त्यांनी 3 सप्टेंबर 1911
ला पहिला माफी व नामा पाठवला पण तो ब्रिटिश सरकारने खारीज केला त्यानंतर लगेच 14 नोव्हेंबर 1913 ला जेलमध्ये एक बडा
ब्रिटिश अधिकारी आला त्याला स्वतः सावरकरांनी माफीनामा हातात दिला पण तोही माफीनामा त्याआधी कारणे स्वीकारला नाही
1921 ला सावरकरांना रत्नागिरीला आणले आणि येथे नजर कैदेत ठेवले व येथेच सावरकरांना एक डिक्लेरेशन लिहून द्यावे लागले
की मी ब्रिटिश न्यायालयाने दिलेला निर्णय चांगला मानतोआणि हेच लिखित डिक्लेरेशन एक कायमस्वरूपी सावरकरां साठी डोकेदुखी
ठरले यालाच विरोधक आग माफीनामा म्हणतात वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत जेलमध्ये राहून आपण देशासाठी काय करणार यासाठी
काढलेला तो एक पर्याय होता असं सावरकर वारंवार म्हणायची
यानंतर सावरकरांनी हिंदू कोण हे पुस्तक लिहिलं आणि हे पुस्तक वादग्रस्त ठरलं कारण यामध्ये सावरकरांनी हिंदूंची व्याख्या करताना
हिंदुस्थानात जन्मतो तो हिंदू असे लिहिले व याच पुस्तकांमध्ये सावरकरांनी हिंदू धर्मातील जात व्यवस्था व वर्णव्यवस्था यावर कडाडून
लिखाण केली या पुस्तकामध्ये सावरकरांनी हिंदू धर्माला लागलेला डाग म्हणजेच जाती व्यवस्था असं लिहिलं जर ही जाती व्यवस्था वेळेत
संपवली गेली नाही तर हे धर्मासाठी घातक ठरेल असं या त्यांनी पुस्तकातील या पुस्तकाला हिंदू धर्मातील काही संघटनांनी विरोध केला.
आपल्या मनात आहे तेच सावरकर बोलायचे तसं पाहिलं गेलं तर वीर सावरकरांनी स्वतःची मरण्याची तारीख ही ठरवली होती कारण
एक फेब्रुवारी1966 ला सावरकरांनी अन्नपाणी आणि औषधांचा त्याग केला सावरकर नेहमी म्हणायची की ज्या दिवशी आपण हातात
घेतलेल्या सर्व योजना पूर्ण होतील त्या दिवशी आपण स्वतःहून जगाचा निरोप घेतला पाहिजे असं सावरकर म्हणायची मरण्याची वाट
पाहू नका असंच काही सावरकरांनी केलं व 26 फेब्रुवारी 1966 ला सावरकरांनी या जगाचा निरोप घेतला त्यांनी मरण्याआधी हिंदू
धर्माप्रमाणे तेरा दिवस शोक करू नका असे सांगितले होते
वरील लेखांमध्ये आपण सावरकरांविषयी बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे पण सूर्याला गवसली घालण्याची ताकद ही
कागदामध्ये नसतेच मला जेवढे काही सावरकर कळाले तेवढे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला याहून आपण ठरवा की
सावरकरांनी माफीला आम्हा लिहून दे सेवा केली की नाही शेवटीला एका कागदाने आपण एखाद्याचे कर्तृत्व संपवू शकत नाही
माझ्या विचारांनी सावरकरांना वीर सावरकर म्हणणे हेच मला योग्य वाटते
वीर सावरकरांना च्या विरुद्ध बोलणाऱ्यानी आधी सावरकर कोण होते हे समजून घ्या
वीर सावरकरांनी ब्रिटिश सरकारची माफी का मागितली होती ?
Add A Comment