राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ संपला व देशभरात राजकीय हालचालींना वेग आला
यामध्ये महाराष्ट्रातील सहा खासदार चा कार्यकाळ संपला आज राजकीय
बलाबल पाहता भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांना पाच जागा मिळतील तर एक जागा काँग्रेसला
जाईल जर काँग्रेसने दुसरा उमेदवार दिला नाही तर ही निवडणूक बिनविरोध होईल जर
काँग्रेसने उमेदवार दिला तर निवडणूक होऊ शकते पण सध्या परिस्थिती पाहता काँग्रेस दुसरा उमेदवार देणार नाही
असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे
भारतीय जनता पार्टी यांच्याकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत
पण अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेईल असं बोललं जात आहे पण भारतीय जनता पार्टीने काही नाव ही पक्षश्रेष्ठीला कळवली आहेत
ज्या नावांची चर्चा आहे ती आहेत दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे या मागील
काही दिवसापासून नाराज असल्याचं चर्चा आहेत त्यांना पण उमेदवारी मिळू शकते दुसरे नाव आहे
विनोद तावडे यांना पक्षाने बिहारची जबाबदारी दिली होती नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीला सोडून भाजपासोबत आले
यामध्ये विनोद तावडे यांचा हात मोठा आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांना सुद्धा संधी देऊ शकते
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान मंत्री नारायण राणे यांना परत एकदा भाजपा राज्यसभेवर पाठवू शकते
कारण राणे पिता पुत्र यांचा उद्धव ठाकरे यांना असलेला उघड विरोध यामुळे नारायण राणे यांना सुद्धा संधी मिळू शकते
तसेच अन्य काही नावे चित्रा वाघ नवीन चेहरा म्हणून यांना सुद्धा संधी मिळू शकते
माधव भंडारी व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा लोकसभेच्या तोंडावर राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते
वरील नावे भाजपा प्रदेश मी दिल्लीला कळवले आहेत नेहमी धक्का तंत्र वापरणारे
भाजपा वरीलपैकी कोणाला किंवा एखादा नवीन माणूस सुद्धा देऊ शकते याची पण शक्यता आहे
पुढील काही दिवसांमध्ये हे चित्र स्पष्ट होईल