गेल्या लोकसभेच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये
खूप मोठ्या प्रमाणात उलथा पालथ झाली यामध्येच
रावेर मतदारसंघ याच्याकडे सर्वांचे लक्ष होते कारण
मागील काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पार्टीची साथ
सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व त्यानंतर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर नाथाभाऊ यांनी
शरद पवार यांना साथ दिली मध्यंतरी विधान
परिषदेच्या उमेदवारी घेऊन नाथा भाऊ आमदार झाले
काल जाहीर झालेल्या लोकसभेच्या यादीमध्ये नाथाभाऊ
यांच्या सुनबाई रक्षाताई खडसे यांना भारतीय जनता
पार्टीने उमेदवारी जाहीर केली यामुळे प्रसार
माध्यमांमध्ये खडसेविरुद्ध खडसे असा सामना रंगणार काय
असे वाटत होते पण आज एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन तब्येतीचे कारण देत आपण लोकसभेची
निवडणूक लढविणार नाही असे जाहीर केले यामुळे सासरा विरुद्ध सून असा सामना आता रावेरमध्ये होणार नाही
पण रावेर ही जागा शरद पवार गटाला सुटली आहे त्यामुळे
शरद पवार दिलेल्या उमेदवाराला निवडून आणायची
जबाबदारी एकनाथ खडसे पार पाडतात का ते पाहावे लागेल