आज होणाऱ्या लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Election)च्या या टप्प्यामध्ये मुंबईमधील सर्व
जागा चे मतदान आज होईल संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई लोकसभा मतदारसंघां
(Mumbai Lok Sabha Constituency) मध्ये आज मतदान होणार आहे
मागील दोन वर्षांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे व पुढे ढकललेल्या मुंबई महानगरपालिकेच्या
निवडणुकी मुळे नेमकी मुंबई कोणाची मुंबईचा कौल कोणाकडे आहे याविषयी तर्क वितर्क काढण्या शिवाय
दुसरा कुठलाच पर्याय हातात नव्हता कारण मागे झालेल्या राजकीय घडामोडी नंतर कोणतीही निवडणूक
मुंबईमध्ये झाली नाही व आता थेट लोकसभेची निवडणूक होत आहे त्यामुळे मुंबईमधील लोकसभा मतदारसंघां (Lok Sabha Election)
मध्ये मुंबईकर नेमकं कोणाच्या पारड्यात मत टाकतात हा विचार करून प्रत्येक उमेदवाराची धाक धुक वाढली आहे
आपण आता एका एका मतदारसंघात चा सविस्तर विचार करूया
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ (Mumbai South Lok Sabha Constituency)
या मतदारसंघां मध्ये विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे ठाकरे गटाचे (Thakre Gat) अरविंद सावंत शिवसेनेच्या फुटी नंतर
त्यांनी उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे यावेळी ठाकरे गटाने अरविंद सावंत यांनाच
उमेदवारी दिली तर दुसरीकडे महायुती ने यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे हा मुंबई दक्षिण
लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे(Shinde Gat) आहे या मतदारसंघांमध्ये दोघांमध्ये सुद्धा चुरशीची लढत होत आहे
या मतदारसंघांमध्ये खालील प्रमाणे मतदानाचा टक्का आहे
1) मराठी मतदार- 40%
2) मुस्लिम मतदार- 22 %
3)गुजराती मतदार -18%
4)उत्तर भारतीय- 11%
5)दक्षिण भारतीय -5%
6)क्रिश्चन -5%
अशा पद्धतीने या मतदारसंघांमध्ये मतदार आहेत विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना मुस्लिम व मराठी
मतदार काही प्रमाणात या पद्धतीने त्यांना मतदान पडू शकते तर त्यांच्या प्रतिस्पर्धी यामिनी जाधव यांना
मुख्यतः उत्तर भारतीय गुजराती व शिष्य व काही प्रमाणात मराठी मतदान पण त्यांना मिळू शकते कारण
या ठिकाणी गुजराती व उत्तर भारतीय यांचे प्राबल्य दिसते
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ (Mumbai North Lok Sabha Constituency)
या ठिकाणी ची जागा महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी ने स्वतःकडे ठेवली व तिथून केंद्रीय मंत्री पियुष गोयल
यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली तर महायुतीमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली तिथून
काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे
या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का कसा आहे ते पाहूया
1) मराठी मतदार-32%
2)मुस्लिम मतदार-9%
3)गुजराती मतदार-28%
4)उत्तर भारतीय मतदार-20%
5)दक्षिण भारतीय मतदार-7%
6)ख्रिश्चन मतदार -3%
या लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा मराठी मतदार हे जास्त आहेत त्यामुळे त्यांचा कल कोणाकडे आहे
यावर विजयाची गणित अवलंबून आहे तसेच नरेंद्र मोदी यांच्यामुळे जर गुजराती मतदार भाजपकडे वळाला
तर मात्र भाजपाला फायदा होऊ शकतो तसेच उत्तर भारतीय मतदार सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे
आकर्षित होऊ शकतात
मुंबईउत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ (Mumbai North Central Lok Sabha Constituency)
या लोकसभा मतदारसंघां मध्ये सुद्धा उमेदवारी निवडून नाराजीचे नाट्यसमोर आले होते शेवटीला उमेदवारी
जाहीर झाल्या यामध्ये महायुतीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीने स्वतःकडे ठेवून घेतली व महाविकास
आघाडी मध्ये ही जागाकाँग्रेसला सोडण्यात आली भारतीय जनता पार्टीतर्फे प्रसिद्ध वकील एडवोकेट
उज्वल निकम यांना भारतीय जनता पार्टीने आपली उमेदवारी दिली आहे तर काँग्रेस मधून आमदार
माजी मंत्री वर्षाताई गायकवाड यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे दांडगे जनसंपर्कामुळे वर्षा गायकवाड
यांना उमेदवारी दिली असं बोललं जात आहे
आता पाहूया या मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का कसा आहे
1)मराठी मतदार-34%
2)मुस्लिम मतदार-25%
3)गुजराती मतदार-10%
4)उत्तर भारतीय मतदार-17%
5)दक्षिण भारतीय मतदार-7%
6)ख्रिश्चन मतदार-5%
एकंदरीत या मतदारसंघांमध्ये मराठी व मुस्लिम समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदार आहे त्यामुळे या मतदारसंघां
मध्ये मराठी मतदार हा दोघांनाही मतदान करू शकतो
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ (Mumbai North West Lok Sabha Constituency)
या मतदारसंघां मध्ये ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना
शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे या मतदारसंघां मध्ये शिंदे गट (Shinde Gat)
विरुद्ध ठाकरे गट (Thakre Gat)
असा सरळ सामना होणार आहे यामुळे या मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष आहे
येथील मतदानाचा टक्का कसा आहे ते आपण पाहूया
1)मराठी मतदार-35%
2)मुस्लिम मतदार-20%
3)गुजराती मतदार-12%
4)उत्तर भारतीय मतदार-21%
5)दक्षिण भारतीय मतदार-7%
6)ख्रिश्चन मतदार-3%
या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय व मुस्लिम मतदार असल्या मुळे या दोघांना आपल्याकडे
बोलण्यासाठी दोन्हीही उमेदवारांनी अतोनात प्रयत्न केले आहेत पण इथे एकंदरीत पाहता उत्तर भारतीयांचे मतदान
हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुळे हे मतदार भारतीय जनता पार्टीकडे जाताना दिसत आहेत तर मुस्लिम मतदार
हे महाविकास आघाडीकडे जाताना दिसत आहे काही जरी झालं तरी दोघांमध्ये निवडून यायचे अंतर मात्र फार कमी असेल
मुंबई दक्षिण मतदार संघ (Mumbai South Constituency)
या ठिकाणाहून महायुतीने ही जागा शिंदे गटाला (Shinde Gat) सोडली आहे इथून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे
तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने अरविंद सावंत यांना उमेदवारी ठाकरे गटाची(Thakre Gat) मिळाली आहे या दोघांमध्ये
सुद्धा काटे की टक्कर होणार आहे
येथील मतदानाचा टक्का कसा आहे ते पाहूया
1)मराठी मतदार-40%
2)मुस्लिम मतदार-20%
3)गुजराती मतदार-3%
4)उत्तर भारतीय मतदार-14%
5)दक्षिण भारतीय मतदार-12%
6)ख्रिश्चन मतदार-2%
या मतदार संघामध्ये मराठी मताचा टक्का जास्त आहे त्यामुळे मराठी मताला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अत्यंत
जास्त प्रयत्न करावे लागतील त्यानंतर उत्तर भारतीयांचा मतदान सुद्धा निर्णय घेणार आहे
ठाणे लोकसभा मतदारसंघ (Thane Lok Sabha Constituency)
ठाणे लोकसभा मतदारसंघा मधून महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला(Thakre Gat ) सोडण्यात आली आहे तेथील
विद्यमान खासदार राजन विचारे यांना परत एकदा ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे राजन विचारे
व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मैत्रीचे किस्से आपण बरेच ऐकले असतील पण जेव्हा एकनाथराव शिंदे यांनी बंड केला
तेव्हा मात्र राजेंद्र विचारे यांनी त्यांच्या बाजूला न जाता उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे थांबण्याचा निर्णय घेतला यामुळे या
मतदारसंघां मध्ये राजन विचारे यांना ठाकरे(Thakre Gat ) गटाकडून परत एकदा उमेदवारी देण्यात आली आहे तरमहायुतीमध्ये ही जागा
शिवसेना शिंदे गटाकडे आहे त्यांनी या वेळेला नरेश मस्के यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे राजन विचारे यांनी
प्रचारामध्ये चांगलीच मुसंडी मारली आहे तर नरेश मस्के यांनी पण शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचारामध्ये जोर पकडला होता
कल्याण लोकसभा मतदारसंघ (KALYAN लोकसभा CONSITITUENCY)
कल्याण लोकसभा मतदार संघामधून विद्यमान खासदार व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे
यांना अगदी शेवटच्या टप्प्यांमध्ये उमेदवारी देण्यात आली त्यांच्याही उमेदवारीवर बऱ्याच दिवस सस्पेन्स कायम होता
पण शेवटीला श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी महायुतीच्या वतीने देण्यात आली तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये
ही जागा ठाकरे गटाकडे(Thakre Gat) गेली व इथून वैशाली दरेकर यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली मुख्यमंत्र्याचे सुपुत्र
या मतदारसंघां मध्ये उभे असल्या मुळे या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे आता पाहावं लागेल शिवसेनेच्या
वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर या मतदारसंघातील मतदार कोणाला कौल देतात
पालघर लोकसभा मतदारसंघ (Palghar Lok Sabha Constituency)
या मतदारसंघा मधून महायुती कडून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून हेमंत सारवा यांना उमेदवारी देण्यात आली आहे
कारण महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आलेली आहे हेमंत सारवा यांच्या विरुद्ध
महाविकास आघाडीच्या वतीने भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे येथे सुद्धा अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे
भिवंडी लोकसभा मतदारसंघ (Bhiwandi Lok Sabha Constituency)
भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला देण्यात आली आहे व
भारतीय जनता पार्टीने कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये भिवंडी ची जागा आहे
शरद चंद्र पवार गट यांच्या वाट्याला आली आहे तिथून शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे येथे सुद्धा
अत्यंत अटी त्याची सामना होऊ शकतो
मुंबईमधील मतदारांनी कौल कोणाला दिला आहे हे आपल्या चार्जिंगला कळेल पण अशा पद्धतीचे मिश्र मतदार असल्यामुळे
कुठल्याही राजकीय पक्षाला छाती ठोकणे आम्ही निवडून येणार असे सांगता येणार नाही त्यामुळे आपल्याला चार जून पर्यंत
ची वाट पाहावी लागणार आहे पण योगी आदित्यनाथ व नरेंद्र मोदी हे स्वतः गुजरात मधून येतात त्यामुळे उत्तर भारतीय मतदान
व गुजराती मतदान यांना आकर्षित करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला व महायुतीला यश येतं का तेच पाहावं लागेल आर्थिक
राजधानी नेमका कोणाच्या बाजूने कह देते हे आपण चार जून रोजी पाहूया
Recent News
मुंबई मधील सहा लोकसभा मतदारसंघात आश्या होतील लढती
मुंबई मधील सहा लोकसभा मतदारसंघात होत आहेत शिवसेना वि ठाकरे गट