महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे आणि या प्रचाराच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप झाले पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाला मात्र सर्वच राजकीय पक्षांनी बगल दिल्याचे पाहायला मिळाले आहे सोयाबीनचे(SOYABEAN)पडलेले भाव हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे पण त्यालाही सत्ताधारी पक्षाने बगल दिल्याचे दिसून आले
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये केंद्रातील एनडीए सरकारला महाराष्ट्रातील कांदा उत्पादक असलेल्या लोकसभा मतदार संघामध्ये कांद्याच्या पडलेल्या भावामुळे मोठा फटका हा महायुतीला बसला होता त्याबरोबरच उत्तरेकडील राज्यांमध्ये जे कृषी कायदे आणण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारकडून झाला होता
त्यानंतर शेतकऱ्यांनी उभं केलेले आंदोलन जागोजागी झालेला लाठी हल्ला आणि आंदोलकांवर कार चढविण्यात आली यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भाजपा सरकारच्या विरोधात मतदान करायला सुरुवात केली आणि या भागामध्ये भाजपाला व एनडीएला मोठे अपयश आले महाराष्ट्रामध्ये देखील कांदा उत्पादन जास्त घेणाऱ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये कांद्याच्या पडलेल्या भावामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी महायुतीच्या विरोधात मतदान केल्याचे पाहायला मिळाले
https://youtu.be/VERBFROeM_I?si=sHGbadsz36E5RqB1
आता विधानसभा निवडणुकीमध्ये सोयाबीन (SOYABEAN)पडलेले भाव देखील चर्चेचा विषय झाला आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्वच ठिकाणी सोयाबीन (SOYABEAN) या पिकाचे कमी अधिक उत्पन्न प्रमाणात घेतले जाते पण यावर्षी सोयाबीन (SOYABEAN) पिकाला कमी भाव मिळाल्यामुळे शेतकरी चिंता दूर आहे हा भाव इतका कमी आहे की शेतकऱ्याचे लागवडीचा खर्च देखील निघण्याची शक्यता कमी आहे.यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन (SOYABEAN) पिकाच्या वाढीवर मोठा परिणाम पाहायला मिळाला आणि त्यानंतर राज्यातील बहुतांश ठिकाणी येल्लो मोजॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पन्नामध्ये 25 ते 50 टक्के घट आली आहे.आणि सोयाबीन (SOYABEAN)चे पीक जेव्हा काढणीला आले तेव्हा देखील अवकाळी पावसाचा फटका हा सोयाबीन (SOYABEAN)ला बसल्याचे पाहायला मिळाले
महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस यादरम्यान पडला होता तरीसुद्धा आलेले सोयाबीन (SOYABEAN) जेव्हा बाजारामध्ये विक्री करण्यासाठी नेले तेव्हा त्याला योग्य भाव मिळाला नाही शेतकऱ्याचे सोयाबीन (SOYABEAN) बाजारात येण्याच्या आधी सोयाबीनचे (SOYABEAN)दर हे 5000 च्या आसपास होते पण जेव्हा शेतकऱ्यांची सोयाबीन (SOYABEAN) बाजारामध्ये विक्रीला आले तेव्हा हे दर 4000 च्या खाली गेले महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी 3500 ते 4200 पर्यंतचा भाव सोयाबीन (SOYABEAN)ला मिळाला यामुळे शेतकऱ्यांच्या समोर मोठे संकट उभा राहिले याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या
पण या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान राजकीय पक्षांनी मात्र या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही असे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले संतप्त झालेला सोयाबीन (SOYABEAN) उत्पादक शेतकरी आता नेमकं काय निर्णय घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
नेमके सोयाबीनचे (SOYABEAN)भाव का पडले ?
भारत देशामध्ये मुबलक प्रमाणात सोयाबीनचे (SOYABEAN)उत्पादन घेतले जाते मुख्यतः सोयाबीन (SOYABEAN) पासून खाद्यतेल काढले जाते व खाद्यतेल काढून बाकी राहिलेल्या चौथा यापासून सोयाडीओसी तयार केले जाते की जे पोल्ट्री उद्योगांमध्ये फार महत्त्वाचा घटक आहे सोयाबीन (SOYABEAN) मध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन मिळते हे प्रोटीन पोल्ट्री उद्योगांमध्ये फार महत्त्वाचे आहे
सोयाबीन ला(SOYABEAN) योग्य दर मिळत नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार होती या तक्रारीकडे केंद्र शासनाने गांभीर्याने पाहिले नाही उलट ब्राझील सारख्या देशांमधून सोयाबीन (SOYABEAN) आयात केले जाऊ लागले देशातील शेतकऱ्यांचे सोयाबीनला (SOYABEAN) कवडीमोल भाव देऊन बाहेरच्या देशातून सोयाबीन (SOYABEAN) आयात करून केंद्र सरकारने काय साधले ? हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये पडला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा उंचावण्यासाठी अशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात की काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः भारत देश हा खाद्यतेलासाठी स्वयंपूर्ण देश झाला पाहिजे यासाठी एक प्रभावी योजना राबविण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले होते
पण त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही आजही देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेलाची आयात करून भारतीयांना लागणाऱ्या खाद्य तेलाची पूर्तता केली जाते पण जर भारतामध्येच तेल बियांचे लागवडीचे प्रमाण वाढवून व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून देशांतर्गतच मोठ्या प्रमाणामध्ये तेलबियाचे उत्पादन केल्यास खाद्यतेल आयात करण्याची गरज राहणार नाही यासाठी एका प्रभावी योजनेची गरज आहे पण असे होताना दिसत नाही
https://youtu.be/GhSTfR9j37Q?si=meh4vx1zgaa3QuUv
सोयाबीन (SOYABEAN) उत्पादन खर्चात वाढ का झाली ?
2015 पासून ते 2024 पर्यंत शेतीसाठी लागणाऱ्या खताच्या किमती या दुप्पट झाल्या आहेत पुढील पाच वर्षांमध्ये या किमती तिप्पट देखील होतील असा अंदाज कृषी अभ्यासक व्यक्त करत आहेत तसेच सोयाबीन (SOYABEAN)च्या बियाण्याच्या भावामध्ये मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे हा भाव देखील प्रतिवर्षी पाच ते दहा टक्के वाढताना दिसत आहे तसेच सोयाबीन (SOYABEAN)ला लागणारे रासायनिक औषध यांच्या भावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे त्यानंतर सोयाबीन (SOYABEAN) काढणीसाठी देखील मजुरांकडून मोठ्या प्रमाणात पैसे मागितले जातात त्यामुळे सोयाबीन (SOYABEAN) उत्पन्न खर्चामध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे
हा विषय जेव्हा प्रचार सभांमध्ये शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना प्रश्न विचारला सुरुवात केल्यानंतर सोयाबीन (SOYABEAN) या पिकाबाबतीत आपण बोललंच पाहिजे असा दबाव राजकीय पक्षांवर आला महायुतीने अशी घोषणा केली की जी बेस प्राईस शासनाने ठरवून दिलेली आहे त्यापेक्षा जर समजा कुठल्याही शेतीमाला चे भाव खाली आले तर मधला फरक हा शासन त्या शेतकऱ्याच्या खात्यात मध्ये टाकेल पण या गोष्टीवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही
MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
याला कारण ठरतं ते जेव्हा रासायनिक खतांवरची सबसिडी बंद केली तेव्हा ती सबसिडी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात टाकू अशा पद्धतीचा शब्द देखील सरकारने शेतकऱ्यांना दिला होता पण अद्यापही शेतकऱ्यांना ते पैसे मिळाले नाहीत त्यामुळे आता या नवीन गोष्टीचे पैसे मिळतात की नाही याविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे
भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष दोघेही गांभीर्याने पहात नाही ही वस्तुस्थिती आहे.फक्त निवडणुका आल्यानंतरच शेतकऱ्यांची आठवण ही राजकीय पक्षांना येताना दिसते आज आपण महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचाही जाहीरनामा पाहिला तर आपल्याला असे लक्षात येईल की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कडे दोघांचे लक्ष फक्त निवडणुकीतच गेल्याचे चित्र आहे.पण कर्जमाफी पेक्षाही महत्त्वाचा मुद्दा आहे
तो शेतीमालाला योग्य भाव देणे उत्पादन खर्च वगळून शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा आला पाहिजे तरच शेतकरी नफ्यात येईल नाहीतर शेती हा व्यवसाय तोट्याचाच व्यवसाय झाला आहे.एखाद्या वेळेला कर्जमाफी मिळते पण पुढील चार-पाच वर्ष शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी चिंता दूर नेहमीच असतो आता या वाढलेल्या औषधांच्या रासायनिक खताच्या किमती या गोष्टी सत्ताधारी पक्षाच्या लक्षात येतात शेतीचा उत्पादन खर्च नेमका किती आहे.
याचाही अभ्यास सत्ताधारी पक्षाला असतो मग या प्रश्नांकडे सत्ताधारी पक्ष गांभीर्याने लगेच का पाहत नाही यासाठी एखादी निवडणूकच यावी लागते ही अत्यंत खेदाची बाब आहे.
आताही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोयाबीन (SOYABEAN) उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सिद्ध होणार आहे.जो पक्ष या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणार नाही किंवा त्याला बगल देण्याचा प्रयत्न करेल त्या पक्षाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.एकीकडे महिन्याला हजारांमध्ये पैसे वाटायचे आणि शेतीमध्ये मात्र लाखो रुपयांचं नुकसान होतं या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांच्या मनात आहेत
आज हा लेख लिहिताना बाजार समितीमध्ये चौकशी केली असता 3500 ते 4100 एवढा भाव सोयाबीन (SOYABEAN)ला मिळत आहे अनेक ठिकाणी अगदी बाजार समित्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे ज्या शेतीवर भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे त्या शेतीला दुर्लक्षित करून कोणत्याही राजकीय पक्षाला सत्ता मिळवता येणार नाही खऱ्या अर्थाने सत्तेची चावी ही शेतकऱ्यांकडे आहे हे प्रत्येक राजकीय पक्षांनी लक्षात ठेवावे