भारत हा शेतीप्रधान देश आहे पण आजच्या काळामध्ये शेती करणे शेतकऱ्यांना अत्यंत आवड जात आहे
कारण नैसर्गिक असो का मानवनिर्मित प्रत्येक संकटाचा सामना हा शेतकऱ्यांना करावाच लागतो यामुळेच
येणारी पिढी शेती करेल की नाही याबद्दल आता प्रश्नचिन्ह उभा राहत आहे याला मुख्य कारण आहे ते आहे
मुजरांची समस्या आजच्या घडीला महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये मजुराच्या समस्या वाढल्या आहेत
शेतीमध्ये काम करण्यासाठी मजूर मिळत नाही त्यामुळे शेतकरी अत्यंत त्रस्त झाला आहे पण असं म्हणतात
की जगामध्ये अशी कुठलीही समस्या नाही ज्याचं समाधान निघू शकत नाही गरज ही शोधाची जननी असते
व शेतीला देखील विज्ञानाची जोड मिळायला सुरुवात झाली आणि चिमुकल्या अशा इजराइल या देशाने इस्रायली
तंत्रज्ञान संपूर्ण जगताला दिले भारता मध्ये देखील शेतीक्षेत्रात मोठे बदल पाहायला मिळाले मजुरांवर अवलंबून
न राहता मशीनद्वारे कशा पद्धतीने शेती सोप्या पद्धतीने करता येईल याकडे शेतकऱ्यांचा तसेच शास्त्रज्ञांचा कल सध्या आहे
शास्त्रज्ञान प्रमाणे शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेती अवजारांमध्ये काही लहान सहान बदल करून आपला वेळ व पैसा
वाया जाणार नाही याकडे लक्ष दिले
ट्रॅक्टर द्वारे शेतीतली 50% कामे केली जाऊ लागली पण अद्याप सुद्धा मजुरांची गरज ही शेतीला लागूच लागली शेतीत
सगळ्यात धोकेदायक व त्रासदायक गोष्ट असते ती पिकांवर करायची रासायनिक औषधांची फवारणी अनेक वेळा या
औषध त्वचेच्या संपर्कात किंवा डोळ्यात नाका तोंडात गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला
पण आता याला सुद्धा मोठा एक पर्याय सापडलेला आहे
ड्रोन द्वारे फवारणी (Spraying by drones)
मागील काही वर्षापासून ड्रोन (drone) चा उपयोग हा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे यामध्ये मुलांच्या खेळण्यापासून ते लग्न
समारंभामध्ये शूटिंग करण्यासाठी ड्रोन चा उपयोग होऊ लागला आणि याच ड्रोन कडे शास्त्रज्ञांची लक्ष केले ड्रोन (drone) द्वारे जर
पिकांवर औषधांची फवारणी करता आली तर वेळ पैसा व मजुरांशिवाय फवारणी करता येईल ही संकल्पना शास्त्रज्ञांच्या
मनामध्ये आकार घेऊ लागली वय याच्यावर मोठे संशोधन सुरू झाले मराठवाडा तसा दुष्काळग्रस्त भाग पण
मराठवाड्यातील शेतकरी मात्र अत्यंत मेहनती मराठवाड्यातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामध्ये
ड्रोन (drone)वर माध्यमातून ड्रोन वर अभ्यास सुरू झाला व तेथील प्रमुख शेतीच्या कामामध्ये
ड्रोन(drone) चा वापर करता येतो यासाठी सखोल अभ्यास केला
ड्रोन म्हणजे नेमके काय (What exactly is a drone?)
आपल्याला ड्रोन(drone) चा अर्थ समजून घ्यायचा असेल तर सोप्या शब्दात सांगतो ड्रोन(drone) म्हणजे उडणारा रोबोट फ्लाईंग रोबोट
म्हणजेच असा रोबोट की जो उडू शकतो तसेच या ड्रोनला UAB (unmanned air vehicle) असे पण म्हणतात याचा
मराठीत अर्थ होतो मानवरहित हवाई वाहन ड्रोन(drone) ला जमिनीवर राहून सुद्धा सॉफ्टवेअरच्या मदतीने चालविता येते यामध्ये
जी पी एस टेक्नॉलॉजी तसेच सेन्सर लावलेले असतात ड्रोन चा मोठ्या प्रमाणात वापर हा सैन्यामध्ये केला जातो कारण
ज्या ठिकाणी मानवाला जाता येत नाही तेथे ड्रोन सोप्या पद्धतीने जाऊ शकतात तसेच आपल्या ग्रामीण भागामध्ये सहसा
आपण ड्रोन चा उपयोग हा लग्न समारंभामध्ये व मिरवणुकीमध्ये फोटो घेणे व व्हिडिओ घेणे यासाठी आपण करतो असे
आपण सहसा पाहिलेले आहे पण पुढे चालून शेतीमधील शास्त्रज्ञांचे लक्ष ड्रोन(drone) वर गेले कारण ड्रोन(drone) हे वापरायला सोपे
असते व याद्वारे पाहिजे ते फवारणी करता येते यामुळे शेतीमध्ये ड्रोन(drone) चा उपयोग होऊ शकतो असं शास्त्रज्ञांना वाटलं
आणि इजराइल सारख्या प्रगत देशांमध्ये ड्रोन द्वारे फवारणी करणे हे बऱ्याच जणांनी पाहिलेले आहे त्याप्रमाणेच आता
हे तंत्रज्ञान भारतामध्ये विकसित झाली आहे
पूर्णा तालुक्यामध्ये ड्रोन द्वारे फवारणी चा प्रयोग (Spraying experiment by drone in Purna taluka)
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामध्ये गोदावरी नदीचा पट्टा आहे त्यामुळे येथे शेती करण्याची संख्या जास्त आहे
व या भागामध्ये आधुनिक पद्धतीने शेती केली जाते अनेक युवक हे नोकरीच्या मागे न लागता शेतीलाच प्राधान्य
देतात येथे मोठ्या प्रमाणावर फळबाग ऊस केळीच्या बागा इत्यादी मुख्य पीक घेतले जातात यात पूर्णा तालुक्यामध्ये
आधुनिक शेती करण्यासाठी प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे धानोरा काळे या गावातील एक प्रयोगशील शेतकरी
उद्यान पंडित प्रतापराव काळे यांच्या प्रयत्नामुळे दोन दिवसापूर्वी ड्रोन(drone) द्वारे फवारणीचे प्रत्यक्ष काळे धानोरा येथे
आयोजित केले होते मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रा मानी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रात्यक्षिकाच्या
आयोजन करण्यात आले होते
मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांनी हरियाणा येथील डॉक्टर शंकर गोयंका यांची कंपनी गो ग्रीन कृषी विमान या
कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला होता त्या मध्ये ग्रामीण भागात जाऊन ड्रोन(drone) द्वारे प्रात्यक्षिक दाखविणे व
शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देणे व या तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करणे हा या मागचा उद्देश होता
त्याप्रमाणे काळे धानोरा येथे पहिला प्रयोग केला गेला तसेच या कंपनीद्वारे भाडेतत्त्वावर ड्रॉन(drone) द्वारे फवारणी करण्याचाही करार आहे
याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चित होऊ शकतो याप्रसंगी उद्यान पंडित प्रताप काळे यांच्या शेतामध्ये ऊस या पिकावर या
फवारणीचा प्रयोग घेण्यात आला याप्रसंगी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होता विद्यापीठाद्वारे डॉक्टर स्मिता सोळंकी
या उपस्थित होत्या त्यांनी शेतकऱ्यांना ड्रोन(drone) द्वारे फवारणी किती महत्त्वाची आहे याबाबतीत मार्गदर्शन केले तसेच याप्रसंगी
हेमचंद्र शिंदे पूर्णा तालुका कृषी अधिकारी प्रवीण काळे यांचेही मार्गदर्शन याप्रसंगी शेतकऱ्यांना लाभले सुरेश दुधाटे
‘पंढरीनाथ शिंदे’संभाजीराव भोसले’जनक काळे’अनिकेत काळे’,बालाजी काळे हे उपस्थित होते
कृषी योद्धा शेतकरी उत्पादन कंपनी लिमिटेड या कंपनीच्या वतीने या दोन प्रत्यक्षकाचे आयोजन करण्यात आलेले होते हे प्रात्यक्षिक
दाखविण्यासाठी ग्रो ग्रीन कंपनीचे राहुल मगदूम कोल्हे साहेब व ड्रोन(drone) पायलेट आर्यविर ठाकूर हे उपस्थित होते यांनी अत्यंत उत्तम
पद्धतीने शेतकऱ्यांना समजेल अशा शब्दांमध्ये या ड्रोन(drone) द्वारे करण्यात येणाऱ्या फवारणी बद्दल माहिती दिली ऊस या पिकावर
अत्यंत सोप्या पद्धतीने व कमी वेळेमध्ये ही फवारणी केली गेली या फवारणी द्वारे आपला वेळ पैसा आणि परिश्रम कसे वाचतात
व हायटेक शेती कुठल्या पद्धतीने करता येईल याविषयी उपस्थितांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कृषी योद्धा कंपनीच्या वतीने
आयोजित केलेले या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना येणारे नवनवीन तंत्रज्ञान हे आत्मसात झाले व येणारा काळ हा शेतकऱ्यांचा आहे
शेतीला चांगले दिवस येणार याविषयी मनामध्ये चांगल्या भावना याप्रसंगी शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झाले आहेत निश्चित
आपला देश हा शेतीप्रधान देश आहे व पुढे चालून फक्त शेतीशिवाय पर्याय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण सध्या दिसत आहे
फक्त शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची साथ धरून या मजुरांच्या समस्या वर तंत्रज्ञानाद्वारे या समस्येवर मात करावी अवघ्या काही
तासांमध्ये कुठल्याही केक प्रकारचे केमिकल नाकात तोंडात न जाता स्वतःच्या जीवावर उदाहरण होता करण्यात आलेल्या
फवारणीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे उद्यान पंडित प्रतापराव काळे हे दरवेळेला शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान हे
कशा पद्धतीने सहजरित्या उपलब्ध होईल यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र
सरकारने आत्तापर्यंत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे तसेच मानाचा समजला जाणारा उद्यान पंडित हा पुरस्कारही
त्यांना मिळालेला आहे आणि शेतीचा असलेला दांडगा अभ्यास व अधिकाऱ्यांशी असलेले संपर्क या दोघांचा ताळमेळ बसून
प्रतापराव काळे यांनी अनेक योजना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली आहेत या झालेल्या प्रात्यक्षिकामुळे
पूर्णा तालुक्यातील लोकांची शेतीमधील एक नवीन तंत्रज्ञान पाहावयास मिळालेले आहे
प्रतापराव काळे व मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रा मानी यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे तरी
शेतकऱ्यांनी सुद्धा या ड्रोन(drone) फवारणीचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून याचा लाभ आपण निश्चित घ्यावा
अशी विनंती संकल्प टुडे आपल्याला करत आहे
Recent News
प्रताप काळे यांच्या प्रयत्न मुळे काळे धानोरा येथे ड्रोन द्वारे फवारणी चा प्रयोग झाला यशस्वी
ड्रोन च्या साहाय्याने शेतात फवारणी करणे झाले सोपे