- वरळी येथे सर्वपक्षीय विजयी मेळावा संपन्न झाला याप्रसंगी तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र (Two brothers together)एकाच व्यासपीठावर दिसले आणि त्यानंतर एक नवीन राजकीय युती झाल्याची घोषणा या दोघांनी केली पण या राजकीय युतीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर काय पडतील याविषयी आपण चर्चा करूया

वीस वर्षाचा दुरावा हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून संपला दोन्ही भाऊ एकत्र(Two brothers together)एका व्यासपीठावर येऊन मराठी ह्या एका विचाराला धरून दोघेजण एकत्र आले. साधारणता वीस वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी त्यांचे काका शिवसेना प्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीमध्ये शिवसेना पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा देत आपली नवीन कारकीर्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाने चालू केली पहिल्याच निवडणुकी मध्ये राज ठाकरे यांना अभूतपूर्व यश आले त्यांचे तब्बल 13 आमदार निवडून आले नाशिक महानगरपालिकेवर त्यांनी एक हाती सत्ता देखील मिळवली पण त्यानंतर राज ठाकरे यांचा आलेख काहीसा उतरता झाला
हे हि वाचा-Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?
आज विधानसभेमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकही आमदार नाही मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील पराभूत झाले.अमित ठाकरे यांच्यासाठी महायुती ती जागा सोडतील असे वाटत होते कारण राज ठाकरे यांनी महायुतीला बिन शर्त पाठिंबा हा लोकसभेला दिला होता त्याचा बराच फायदा हा महायुतीला मुंबई ठाणे, पुणे, नाशिक आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात झाला पण महायुतीने अमित ठाकरे यांच्याविरुद्ध उमेदवार दिलाच
हे हि वाचा-Benefits of Soaking:या गोष्टी भिजवून खा व निरोगी राहा
तसेच महायुती मध्ये असलेले घटक पक्ष शिवसेना एकनाथराव शिंदे गट यांनी तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन बंड केला व भारतीय जनता पार्टी सोबत सत्ता स्थापन केली व मुख्यमंत्री झाले भारतीय जनता पार्टी ने या दोन्हीही ठाकरे बंधूंना धोका दिल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी वारंवार केला
मधल्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही एकत्र(Two brothers together)आणण्याचे प्रयत्न अनेकांनी केले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी देखील या चिमण्यांनो परत फिरा असे म्हणत राज ठाकरे यांना परत यावे असे संकेत दिले होते पण राज ठाकरे यांच्याकडून कुठलंही उत्तर दिले गेले नाही

हिंदी सक्तीमुळे दोन्ही भाऊ एकत्र(Both brothers together due to Hindi compulsion)
इयत्ता पहिली पासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय शासनाने घेतला यापूर्वी इयत्ता पाचवीपासून हिंदी ही द्वितीय भाषा होती पण या नवीन शासनाच्या निर्णयाप्रमाणे इयत्ता पहिलीपासून मराठी इंग्रजी व हिंदी ही तीन भाषा विषयी शिकण्याची सक्ती केली गेली होती आणि याच सक्तीच्या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांनीही कडाडून विरोध केला शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची व्यक्तिशः भेट घेऊन त्यांना आपला मुद्दा समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण राज ठाकरे यांनी हिंदीच्या सक्ती विषयी कुठलं दुसरं धोरण स्वीकारायला नकार दिला
त्यानंतर राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाच जुलै रोजी आपण एक सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन गिरगाव चौपाटीपासून ते मंत्रालयापर्यंत करणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली व सर्व राजकीय पक्षांना त्यांनी निमंत्रण पाठवायला सुरुवात केली.या मोर्चासाठी आपण उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आणि त्यानंतर मनसे व शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आणि हे दोन भाऊ एकत्र(Two brothers together)येणार या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या
शासनाने हिंदीचा निर्णय रद्द केला(Government cancels Hindi decision)
हिंदी सक्तीच्या विरुद्ध संपूर्ण राज्यामध्ये आंदोलने सुरू झाली सरकारने देखील दोन पावलं मागे सरकत हिंदी सक्तीचे दोन्हीही जीआर रद्द केले व एका समितीची घोषणा केली यामध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली या समितीच्या निर्णयाच्या नंतरच राज्यामध्ये हिंदीसक्ती विषयी निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले हा शासन निर्णय जरी रद्द झाला असला तरी शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांनीही विजयी मेळावा घेण्याचे जाहीर केले
वरळी मध्ये जमली लाखोंची गर्दी(A crowd of lakhs gathered in Worli)
तब्बल वीस वर्षानंतर हे दोन भाऊ एकत्र येणार(Two brothers together)या घोषणेमुळे मुंबईमधील मराठी माणसाच्या मनात एक आशेच्या भावना निर्माण झाल्या व पाच जुलै रोजी लाखोंच्या संख्येमध्ये मुंबईमधील तसेच महाराष्ट्रातील मराठी मतदार हा वरळी डोमच्या दिशेने निघाला रस्त्यावर उभ्या केलेल्या एलईडी मध्ये सुद्धा दोन मराठी नेत्यांना पाहण्यासाठी अलोट गर्दी होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा व्यासपीठावर आले त्यावेळेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या व आता आम्ही दोघे भाऊ यापुढेही एकत्रच राहू(Two brothers together)अशी घोषणा देखील उद्धव ठाकरे यांनी केली .
दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारणावर काय परिणाम होतील?(What will be the impact on Maharashtra politics due to the two Thackerays coming together?)
महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच मराठी माणसाचा मुद्दा हा मुंबईमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस या एका घोषवाक्यखाली मुंबईमधील मराठी एकत्र करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेच्या स्थापनेपासूनच मुंबईमधील मराठी माणूस हा शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने कायम उभा राहताना दिसला पण वीस वर्षांपूर्वी राज ठाकरे यांचं वेगळा पक्ष स्थापन करणे आणि त्यापूर्वी नारायण राणे छगन भुजबळ यांसारखे दिग्गज नेते शिवसेनेला सोडून गेल्यामुळे मराठी मताचे विभाजन व्हायला सुरुवात झाली आणि इथूनच भारतीय जनता पार्टी ला याचा फायदा झाला गेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 82 जागा मिळाल्या तर शिवसेनेला 84 जागा मिळाल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सात जागा मिळाल्या याचा अर्थ शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये फक्त दोन जागांचे अंतर होते आता मराठीच्या मुद्द्यावरून एकवटलेला मराठी समाज या मराठी माणसाला परत आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे त
र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना मात्र राज ठाकरे यांची साथ मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मनोबल वाढलेले निश्चित असेल गत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 28 टक्के मतदान पडले होते तर भारतीय जनता पार्टीला 27% मतदान झाले होते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आठ टक्के मतदान झाले होते आता दोन ठाकरे बंधू एकत्र(Two brothers together)आल्यामुळे या दोघांकडे 36 टक्के मतदान झाले आहे तर भारतीय जनता पार्टीकडे 27 टक्के मतदान आहे हे चित्र महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत बदलू शकते आपण आज फक्त हे दोन भाऊ एकत्र(Two brothers together)आल्यामुळे काय घडू शकते याविषयी चर्चा करत आहोत निश्चित या दोन भावांच्या एकत्र(Two brothers together)येण्यामुळे या दोघांनाही मोठा फायदा होईल आज आपण राजकीय दृष्ट्या विचार केला तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासमोर फार पर्याय उपलब्ध नाहीत त्यामुळे देखील हे दोघं एकत्र(Two brothers together)आले असावेत अशी शक्यता आहे तसेच आपण महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलो तर या दोन भावांच्या एकत्रित(Two brothers together)येण्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेगळे चित्र उभे राहू शकत
कारण उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघटन कौशल्य आहे तर राज ठाकरे यांच्याकडे एक वेगळी भाषण शैली आहे आता हे पहावे लागेल की भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने या दोन भावांच्या युतीला सामोरे जाते भारतीय जनता पार्टी सोबत शिवसेनेचा 80% गट हा त्यांच्या बाजूने आहे तोही एक सकारात्मक मुद्दा हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडे आहे येणारी मुंबई महानगरपालिकेची व इतर महानगरपालिकांच्या निवडणुका या अत्यंत अतिठटीच्या होणार हे मात्र निश्चित आता कोणता पक्ष कोणती रणनीती आखून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यामध्ये यशस्वी होतो ते पाहावे लागेल पण एकंदरीत हे दुरावलेले दोन भाऊ एकत्र(Two brothers together)आल्यामुळे मात्र मराठी माणसाला मात्र चांगले वाटले आहे