सोनखेड – कलयुगामध्ये चमत्कार होतात का असा प्रश्न प्रत्येकाला पडतो
पण एखाद्या देवावर जर आपली अमाप श्रद्धा असेल तर
निश्चित चमत्कार हे घडतातच असाच काही अनुभव प्रत्येक श्रद्धावान व्यक्तीला हा येतच असतो
देव वेगळे असतील श्रद्धा करण्याचे स्थान वेगळे असतील पण याचा रिझल्ट
हा नेहमी सकारात्मकच येतो
दत्तगुरूंचे अवतार साईबाबा’गजानन महाराज’श्री स्वामी समर्थ आणि इतर
या सर्वांची उपासना करणारा खूप मोठा वर्ग हा महाराष्ट्र मध्ये तसेच भारतात आहे
यामध्ये या श्रद्धावान लोकांना मोठ्या प्रमाणात अनुभव येतोच असेच
काही अनुभव आपण पाहूया लोहा नांदेड रोडवर वसलेले सोनखेडे गाव
शेती हा इथला मुख्य व्यवसाय तसेच या गावांमध्ये तुकाराम महाराजांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे
याच गावामध्ये शिवाजी( मोरे नाना) हेच स्वामी समर्थ यांचे आध्यात्मिक केंद्र चालवतात
त्यांच्या मुळे अनेक भाविक हे स्वामींची सेवा करायला लागली व बऱ्याच जणांना चांगले
अनुभव येऊ लागले व दिवसेंदिवस स्वामी भक्तांची संख्या ही वाढू लागली
परिस्थितीने त्रस्त झालेले एक जोडपे
संजू सिंग ठाकूर व त्यांच्या पत्नी सौ.शिवरानी संजू सिंग ठाकूर हे पती-पत्नी सोनखेड मध्ये राहत होते
त्यांचा विवाह 2008 मध्ये झाला घरी सर्व काही होते पण त्यांना संतती नव्हती
बरेच दिवस पूजाअर्चा करून पाहिली पण काही उपयोग झाला नाही
पण शिवाजी मोरे यांच्या संपर्कात येऊन त्यांनी स्वामींच्या नित्य सेवेचा वसा घेतला व
रोज स्वामी चरित्राचे तीन अध्याय चे वाचन केले व अकरा माळी स्वामींचा जप केला
व या उपासनेमध्ये त्यांनी खंड पडू दिला नाही
स्वामींची कृपा झाली व आठ एप्रिल 2024 रोजी त्यांना दोन जुळी मुले झाले
व त्यांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला स्वामींची सेवा करणाऱ्याला
कधीही रिकाम्या हाताने परत जावे लागत नाही याचा अनुभव ठाकूर दांपत्याला आला
आता त्यांचे दोन्ही मुले स्वस्थ आहेत
व ठाकूर दांपत्य आपले दैनंदिन व्यवहार झाल्यानंतर स्वामींची सेवा रोज करतात
भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे
या स्वामींचे वचन हे परत एकदा भक्तांसाठी त्यांनी खरे करून दाखवले आहे
म्हणून मनापासून बोलावं वाटतं श्री स्वामी समर्थ