मागील नऊ महिन्या पासून अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams)आणि त्यांचे सहकारी हे आज पहाटे एका यानाने पृथ्वीवर यशस्वी रित्या उतरल्या व एलोन मस्क यांच्या कंपनीचे सर्वत्र कौतुक होत आहे जे काम नासा(NASA)जमले नाही ते एलोन मस्क यांच्या कंपनीने करून दाखवले

हि मोहीम कशी पार पडली (How did this campaign go?)
अमेरिकेने अंतराळात 5 जून 2024 रोजी दोन अंतराळवीरांना घेऊन बोईंग कंपनीचे स्टार लाइनर या अंतराळ यानातून अवकाशात झेपावलं होतं साधारणतः एक किंवा दोन आठवड्यानंतर हे अवकाशयान पृथ्वीकडे परतीचा प्रवास चालू करेल अशी अपेक्षा शास्त्रज्ञांची होती या अंतराळ यानामध्ये भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विलमोर हे दोघे अंतराळात गेले होते पण या याणामध्ये अचानक काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे यान पृथ्वीवर येऊ शकत नव्हतं आणि त्यामुळे सुनिता विलियम्स आणि त्यांचे सहकारी हे अंतराळातच अडकले नऊ महिने आणि तेरा दिवस एवढा कालावधी ते अंतराळात होते या दरम्यान नासाने हे यान पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न केले व त्यामध्ये झालेला
तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्या प्रयत्नांना फारसी यश आले नाही आणि मग अमेरिकेमधील दुसरी कंपनी एलोन मस्क यांची स्पेसेक्स कंपनीकडे हे काम दिले गेले स्पेसेक्स कंपनीने ड्रॅगन कॅप्सूल हे यान बनविले व सुनिता विलियम्स यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी 14 मार्च 2025 रोजी हे यान अंतराळात झेपावले इंटरनॅशनल स्पेस सेंटर अर्थात ISS पासून पृथ्वीचे अंतर हे 400 किलोमीटर आहे नासाच्या शास्त्रज्ञ च्या म्हणण्यानुसार ही चारशे किलोमीटर अंतर पार करण्यासाठी साधारणतः तीन तास लागतील आणि इंटरनॅशनल स्पेस सेंटर मधून बाहेर पडल्यानंतर पृथ्वीपासून आकाशाच्या दिशेने शंभर किलोमीटर अंतरावर पृथ्वीचे वातावरण चालू होते
याच प्रवेशाला रिएन्ट्री असे म्हणतात ही प्रक्रिया सर्वात धोकेदायक आहे आणि ती घातक सुद्धा ठरू शकते जेव्हा हे यान पृथ्वीच्या जवळ येईल तेव्हा या व याना मध्ये बसविलेले पॅरॅशूट योग्य वेळेला उघडणे देखील खूप महत्त्वाचे होते आणि तेही पॅराशुट योग्य वेळेला उघडले देखील आणि हे यान सुनीता विल्यम्स (Sunita Williams)आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन फ्लोरीडिया मधील समुद्रात उतरले हे यान उतरण्यासाठी फ्लोरडिया मधील समुद्रामध्ये आठ साईट तयार करण्यात आले होते आणि यापैकी डॅल हाऊसी या साइटवर हे यान उतरले जेव्हा हे यान पृथ्वीच्या कक्षेत आले तेव्हा चार पॅराशुट द्वारे या यानाची गती कमी करण्यात आली हे यान पृथ्वीवर उतरताना पृथ्वीच्या कक्षेत मधील रीएंट्री पॉईंट व पॅराशुट उघडण्याचा पॉईंट हे दोन्हीही अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स होते या यानाचे अँगल बरोबर असल्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर या यांना कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण झाली नाही आणि पॅराशुट उघडताना देखील कुठल्याही प्रकारचे समस्या निर्माण झाली नाही आणि त्यामुळेच हे यान व्यवस्थित ठरवलेल्या जागी उतूरु शकले
पृथ्वीच्या वातावरणामध्ये आणि अंतराळातील वातावरणामध्ये खूप मोठा फरक आहे जेव्हा हे यान पृथ्वीच्या कक्षेत आले तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे घर्षण निर्माण होऊन ज्ञानाला आग लागण्याची भीती मोठी असते यासाठी या यांना PICA 3.0 HIT SHIELD हे महत्त्वाचं ठरलं जेव्हा हे यार पृथ्वीच्या कक्षेत आले तेव्हा प्रचंड उष्णता निर्माण झाली आणि ही उष्णतेची झळ यानांमध्ये बसलेल्या अंतराळवीरांना देखील बसली रिएंट्री नंतर अचानक यानाचा आणि पृथ्वीचा संपर्क पूर्णपणे तुटला सात मिनिटापर्यंत कुठलाही संपर्क यानाशी झाला नाही आणि नासाच्या कार्यालयात बसलेल्या शास्त्रज्ञांच्या मनात धाकधूक निर्माण झाली कारण अशाच पद्धतीने संपर्क तुटल्यामुळे भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांचे यान कोसळले होते आणि त्यामध्ये कल्पना चावला यांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला होता पण सात मिनिटाच्या नंतर हा संपर्क परत झाला जेव्हा यान पृथ्वीपासून अठरा हजार फूट वर असताना दोन पॅरॅशूट उघडले गेले आणि मग दुसरे दोन पॅरॅशूट हे हे यान जेव्हा पृथ्वीपासून सहा हजार पाचशे किलोमीटर असताना उघडले गेले आणि हे यान अलगद समुद्रामध्ये उतरले त्यावेळी भारतीय वेळेनुसार पहाटेचे 03:57 मिनिटे झाले होती
हे यान सुखरूप उतरल्यानंतर लगेच समुद्रात असलेल्या अमेरिकन सैन्याच्या बोटीने या यांना कडे जायला सुरुवात केली त्यासाठी सुद्धा अर्ध्या तासाचा वेळ लागला जेव्हा या बोटी यानाच्या जवळ गेल्या तेव्हा त्यांनी सुरुवातीला पॅराशुट च्या दोऱ्या या यानापासून दूर केल्या बोटी जवळ गेले तेव्हा त्यांना ते यान जळाल्या सारखी दिसले हे यान जळाल्यासारखे दिसण्याच्या मागचे कारण म्हणजे 2100 डिग्री सेंटीग्रेड एवढे तापमान यानाने सहन केले होते या बोटीने या यानाची संपूर्ण तपासणी केली व काही वेळानंतर या अंतराळवीरांना या यानाच्या बाहेर काढले गेले यामध्ये सर्वात आधी निक हेग नंतर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह नंतर सुनीता विल्यम्स (Sunita Williams)आणि शेवटी ला बुच विल्मोर हे याना मधून बाहेर आले यानंतर लगेचच या बोटीमध्ये तज्ञ डॉक्टरांनी अंतराळवीरांची आरोग्य तपासणी केली यामध्ये या अंतराळवीरांची तब्येत ही चांगली असल्याचे सांगितले गेले व्हिडिओच्या माध्यमातून सबंध जगाने हा थरारक लँडिंग चा प्रकार पाहिला विशेषता भारतामधील गुजरात राज्यामध्ये एकच जल्लोष करण्यात आला आणि सुनीता विल्यम्स (Sunita Williams)आणि त्यांचे सहकारी सुखरूप पृथ्वीवर पोहोचले
हे हि वाचा-vidhan parishad election-विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध?, 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध
सुनिता विलियम्स यांना पृथ्वीवर कोणत्या कोणत्या अडचणी येतील?(What difficulties will Sunita Williams face on Earth?)
नऊ महिने तेरा दिवस अंतराळात राहिल्यानंतर सुनीता विलियम्स यांना काही शारीरिक अडचणी येऊ शकतात कारण आपल्या शरीरातील स्नायू हे नेहमी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध कार्य करत असतात पण अंतराळात गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्यामुळे स्नायूंची गरज भासत नाही तेथे अंतराळवीर उडत राहतात यामुळे नऊ महिन्यापासून स्नायूचे काम नसल्यामुळे सुनीता विल्यम्स (Sunita Williams)यांचे स्नायू कमकुवत झाले आहेत आणि त्यांच्या हाडाची घनता देखील कमी झाली आहे
हे हि वाचा-Trump Zelensky Meeting -झेलेंस्की चा अपमान केला अमेरिका एकटी पडली ? झेलेंस्की ना ब्रिटन चे समर्थन
यामध्ये पाठ आणि मान यांच्या स्नायूवर परिणाम होऊ शकतो यामुळे सुनीता विलियम्स यांना पुढील काही महिने चालणे धावणे बसणे उठणे या क्रिया कठीण जाऊ शकतात असं तज्ञांचे मत आहे पृथ्वीवरील जीवनामध्ये शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या परतण्यासाठी या अंतराळवीरांना 45 दिवसापासून ते एक वर्षापेक्षाही जास्त कालावधी लागू शकतो तरी पण या अडचणींना पुढे चालून सामोर जावं लागू नये म्हणून हे अंतराळवीर जेव्हा अंतराळात असतात तेव्हा रोज किमान अर्धा तास तरी त्यांना स्नायू बळकटीची वेगवेगळे व्यायाम करावे लागतात यासाठी अंतराळ यानामध्ये विशेष साधनं देखील ठेवलेले असतात
अंतराळामध्ये सुनीता विल्यम्स यांचा दिनक्रम(Sunita Williams’ routine in space)
अंतराळामध्ये सुनीता विल्यम्स (Sunita Williams)आणि त्यांचे सहकारी हे साधारणतः सकाळी साडेसहा वाजता झोपेतून उठत असत व त्यांना खाण्यासाठी काही पॅकेट असायचे व पिण्याच्या पाण्यासाठी ते स्वतःची लघवी व शरीरातील घाम यांना रिसायकल करून त्याचे रूपांतर शुद्ध पाण्यात करून तेच पाणी पिण्यासाठी वापरत असत स्नायूंच्या बळकटीसाठी रोज किमान अर्धा तास व्यायाम हा केला जायचा
सुनीता विल्यम्स (Sunita Williams)यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी ओहायो राज्यातील युक्लीड येथे झाला नाही त्यांचे वडील हे भारतीय वंशाचे आहेत त्यांचा जन्म गुजरात राज्यामध्ये झाला त्यांचे नाव दीपक पांडे व सुनीता विल्यम्स (Sunita Williams)यांच्या आईचे नाव बॉनी पांडे सुनीता विल्यम्स (Sunita Williams)यांना दोन भाऊ आहेत सुनीता विल्यम्स (Sunita Williams)या सगळ्यात लहान आहेत त्यांनी युनायटेड स्टेट्स नेव्हल अकॅडमीत प्रवेश घेतला, जेथे त्यांनी १९८७ साली भौतिकशास्त्रात बॅचलर ऑफ सायन्स पदवी यशस्वीरित्या प्राप्त केली.१९९५ साली, त्यांनी फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये मास्टर ऑफ सायन्स हि पदवी मिळवली. त्यांचे लग्न मायकेल जी.विलियम्स यांच्याशी झाले 1989 मध्ये सुनीता विल्यम्स (Sunita Williams)या नौदल वैमानिक बनल्या हेलिकॉप्टर कॉम्बॅट सपोर्ट स्क्वाड्रन मध्ये नियुक्त करण्यात आले. येथे त्यांनी को-पायलट आणि विमान कमांडर म्हणून देखील सेवा केली.1998 मध्ये सुनीता विल्यम्स (Sunita Williams)यांची निवड नासामध्ये झाली त्यांची पहिली अंतराळ मोहीम ही 2006 साली सुरू झाली यामध्ये त्यांनी 195 दिवस अंतराळात पूर्ण केले अंतराळात चालण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला सात वेळा त्या अंतराळात चालल्या 50 तास 40 मिनिटे एवढा वेळ त्या अंतराळात चालल्या दुसरी अंतराळ मोहीम दुसरी अंतराळ मोहीम ही 15 जुलै 2012 या रोजी त्या दुसऱ्या मोहिमेसाठी अंतराळात झेप घेतली यामध्ये त्यांनी तीन वेळा अंतराळात चालण्याचा विक्रम केला 77 तास56 मिनिटे या मोहिमेदरम्यान त्यांनी अंतराळातून पृथ्वीवर येणाऱ्या भूकंपांचा अभ्यास केला व ती माहिती जमा केली
सुनीता विल्यम्स यांना मिळालेले पुरस्कार(Awards received by Sunita Williams)
१)पद्यभूषण पुरस्कार २००८
२)नासा अंतराळ उड्डाण पदक २००७ व २०१२
३)नासा असाधारण नेतृत्व पदक २००२
४)नासा असाधारण सेवा पदक २००२
५)हावर्ड इन्स्टिट्यूट स्कुल ऑफ गोव्हरमेंट अल्युमिनियम अचिव्हमेंट अवार्ड २००८
६)इंडियन अमेरिकन अवार्ड २००७
७)स्टीव्हन्स इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि मेडल २०११
अमेरिकेचा भ्रमाचा भोपळा फुटला
हॉलीवुड मधील आपण काही चित्रपट पाहायला गेलो तर आपल्याला असे दिसते की त्या चित्रपटांमध्ये अंतरिक्ष मधून कुठलातरी हल्ला हा पृथ्वीवर होतो आणि त्या हल्ल्यामधून फक्त नासा(NASA)अमेरिकेचे अंतराळ संशोधन केंद्र वाचू शकते अशा प्रकारचे चित्रपट होते पण सुनीता विलियम्स आणि बाकी अंतरिक्ष यात्री यांच्यासोबत मागील नऊ महिन्यापासून जे चालू आहे ते पाहून असं वाटतं की नासाने या अंतराळ वीरांना स्पेस मध्ये नेऊन सोडले पण त्यांना वापस नासाला आणता आलं नाही नऊ महिन्यापासून हजारो प्रयत्न नासाने केले पण त्यांना यश आले नाही शेवटीला अमेरिकन सरकारला मदत घ्यावी लागली ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यांची अंतराळामध्ये अडकलेल्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams)आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शेवटीला एलोन मस्क यांची कंपनी स्पेसेक्स यशस्वीरित्या पृथ्वीवर वापस आणले त्यामुळे अमेरिकेचा भ्रमाचा भोपळा फुटला असं म्हणावं लागेल स्पेसेक्स ही एक खाजगी कंपनी आहे तर नासा(NASA)हे अमेरिकन सरकारचे आहे तरीपण जे काम नासाला करता आलं नाही ते स्पेसेक्स सहजरित्या करून दाखविले आता नासापेक्षा सुद्धा स्पेस चे महत्व हे वाढले आहे
1 Comment
Pingback: Summer Food-उन्हाळ्यात हे पदार्थ म्हणजे अमृतच! - Sankalp Today