एप्रिल महिन्यामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकत आहे उन्हाळ्याची गर्मी प्रचंड वाढलेली आहे दुपारच्या वेळेला तापमान कमालीची वाढत आहे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे पण आपल्या आहारामध्ये काही पदार्थ रोज घेतल्यास शरीरामधील गर्मी कमी व्हायला तर मदत होईलच पण थंडावा देखील जाणवेल ही कोणती पदार्थ आहेत त्याविषयी आपण चर्चा करूया
उन्हाळा अर्थात ग्रीष्म ऋतू या ऋतूमध्ये वाढत्या तापमानामुळे आपल्याला शरीरामध्ये उष्णतेचे विकार व्हायला लागतात ज्यामध्ये पित्त वाढणे ,न लागणे,थकवा जाणवतो,नाकातून रक्त येणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विकारांना सामोरे जावं लागतं पण आपण जर नैसर्गिक रित्या तयार झालेले काही पदार्थाचे सेवन जर आपल्या आहारात(Summer Food) ठेवले तर उन्हाळ्यामध्ये देखील आपल्याला उष्णतेचा जास्त त्रास होत नाही

हे हि वाचा –MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
नाचणी(Finger Millet)
पुरातन काळापासून आपण नाचणीचा(Finger Millet) उपयोग हा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात करत होतो नाचणीला(Finger Millet) रागी असे देखील म्हणतात नाचणी(Finger Millet) हे थंड गुणधर्म आहे आणि नाचणी(Finger Millet)पचायला देखील सोपी आहे तसेच नाचणी(Finger Millet)हे इन्स्टंट एनर्जी देणारे खाद्य आहे यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते नाचणी मध्ये फॉस्फरस कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम अशा अनेक महत्त्वाचे घटक असलेले अनेक घटक नाचणी(Finger Millet)मध्ये आहेत नाचणी(Finger Millet)पचायला हलकी असल्यामुळे अगदी सहा महिन्याच्या बाळापासून देखील नाचणीचे(Finger Millet) सत्व खाऊ घातले जाते यामध्ये साखरेचे प्रमाण हे नसल्यामुळे ते डायबिटीस असलेल्या लोकांना सुद्धा नाचणी खाता येते ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी सुद्धा नाचणी(Finger Millet)खायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये आपली भूक मंदावते आणि त्यामुळे आपल्या शरीराला पोषक तत्वांची गरज असते जर नाचणीची(Finger Millet) खीर करून जर खाल्ली तर शरीराचे पोषण हे योग्य प्रमाणात होऊ शकते

ताक(Buttermilk)
ताकाला(Buttermilk)देखील पृथ्वीवरील अमृत म्हटलं गेलेला आहे ताक(Buttermilk)हे नेहमी घरी बनवलेले प्यावे कारण बाहेरून आणलेल्या ताकामध्ये(Buttermilk) चव येण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो त्यामुळे शक्यतोवर ताक(Buttermilk)हे आपण घरी व ताज बनवलेले नेहमी प्यावे ताका (Buttermilk)मध्ये आपण ओवा जिरे पूड खडीसाखर टाकावी ताक(Buttermilk) आणि त्यासोबत या घटकांमुळे शरीरामध्ये वेगळाच थंडावा निर्माण होतो ज्यांना कफाचा त्रास नाही त्यांनी दुपारी एक ते दोन ग्लास ताक(Buttermilk) प्यायलाच पाहिजे ताक(Buttermilk)आपण जेवण्याच्या आधी सुद्धा घेऊ शकतो जेवणाच्या नंतर सुद्धा घेऊ शकतो आणि जेवणाच्या मध्ये सुद्धा ताक(Buttermilk)आपण पिऊ शकतो
काकडी(Cucumber)
काकडी(Cucumber) मध्ये देखील पाण्याची प्रमाण हे जास्त असते व काकडी(Cucumber)हे शरीराला लगेच थंडावा देणारी असते काकडी(Cucumber) मध्ये पाण्याच प्रमाण जास्त असल्यामुळे पचायला देखील खूप सोपी असते काकडी(Cucumber)आपण कोशिंबीर सॅलेड म्हणून देखील खाऊ शकतो पण कधीही काकडीला(Cucumber)उष्णतेची प्रक्रिया करू नये ज्यामुळे काकडी(Cucumber)मधील पाणी तसेच पोषक तत्व संपून जातात काकडी (Cucumber)मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते पण काकडीला(Cucumber)तापवल्यास त्यामध्ये सर्वच जवळपास खनिज पदार्थ राहत नाहीत त्यामुळे काकडी(Cucumber)ही नेहमी कच्चीच खाल्ली पाहिजे किंवा कोशिंबिरीतून उन्हाळ्यामध्ये कोशिंबीर करताना तयाचे प्रमाण देखील कमी ठेवावे कारण दह्यामध्ये उष्णता असते त्यामुळे देखील आपल्याला उष्णतेचे त्रास जास्त होऊ शकतो
हे हि वाचा –Sunita Williams पृथ्वीवर परतल्या,फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर यशस्वी लँडिंग
पुदिना(mint)
पुदिना(mint) देखील आपल्या शरीरामध्ये थंडावा तयार करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण एखादे पुदिना(mint)असलेले मिंट बेस चॉकलेट खाल्ले व त्यानंतर शरीरामध्ये हवा घेतल्यास आपल्याला लगेच थंडावा जाणवतो तसेच पुदिना(mint) हे शरीरात गेल्यानंतर शरीरामध्ये असलेली गर्मी बाहेर काढण्याचे काम हा पुदिना(mint) करत असतो पुदिना(mint)नेहमी कच्चा खायचा किंवा पुदिन्याचे(mint)सरबत देखील बनवून तुम्ही येऊ शकता पण आपल्या आहारामध्ये पुदिना(mint) नक्की ठेवा
पाणीदार फळे
गळ्यामध्ये ऋतूप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये पाणीदार फळे ही बाजारात आलेली असतात ज्यामध्ये मुख्यता कलिंगड टरबूज आणि खरबूज द्राक्ष यांसारखी पाणीदार फळे ही बाजारात उपलब्ध असतात त्याचे सेवन आपण जरूर करावे कारण या फळाच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील उष्णताही बाहेर फेकली जाती व शरीर आतून थंड होते त्यामुळे उन्हाळ्याचा त्रास जास्त होत नाही टरबूज खरबूज नेहमी दुपारच्या वेळेला खाल्ले पाहिजे जेणेकरून हे खाल्ल्यामुळे पोटामध्ये थंडावा निर्माण होईल
विविध प्रकारची शरबते
आपण लिंबाला सुपर फूड असं म्हणतो उन्हाळ्यामध्ये लिंबाचे सरबत पिल्यास आपल्याला एकदम थंड वाटायला लागते मिळाला इन्स्टंट थंडावा देण्यासाठी देखील शरबतचा उपयोग केला जातो सरबत हे लिंबासोबत पुदिना व बाकी बाजारात मिळणारे शरबती देखील आपण पिण्यासाठी वापरू शकतो तसेच फळांचा ज्यूस देखील आपण उन्हाळ्यामध्ये पिऊ शकतो विशेषता आंबा व आंब्याची रस देखील शरीर थंड ठेवण्यासाठी उपयुक्त असतात त्यामुळे आपण वर दिलेल्या सर्व प्रकारची सरबते आपण दुपारी आणि सायंकाळी पिऊ शकतो शक्यतोवर उन्हाळ्यामध्ये चहा कॉफीचे प्रमाण हे कमी ठेवणे शरीरासाठी फायदे असते
वर दिलेले काही हे सुपर फूड आहेत ज्यामुळे आपल्या शरीराला आतून थंडावा निर्माण होतो व आपले शरीर सुदृढ व निरोगी राहते त्यामुळे वाढत्या उन्हामध्ये आपण वर दिलेल्या पदार्थांपैकी सर्व किंवा काही पदार्थही आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये जरूर वापरायला पाहिजे