आमिर खानच्या दंगल चित्रपटातील छोट्या बबीता ची भूमिका साकारणारी
अभिनेत्री सुहानी भटनागर च दिल्ली येथे निधन झाले ती फक्त 19 वर्षाची होती
दंगल या चित्रपटामुळे सुहानी अचानक प्रसिद्ध झोतात आली दंगल चित्रपट बॉक्स
ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला आमिर खान सोबतच चिमुकली बबीता उर्फ सुहानी
भटनाकर हिचाही अभिनयाची प्रचंड तारीफ त्यावेळी झाली
पण नियतीला काही वेगळेच मान्य होते अवघ्या 19 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला
काही काळापूर्वी तिचा अपघात झाला व तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले
होते उपचारादरम्यान घेण्यात आलेल्या औषधांमुळे तिच्या शरीरामध्ये पाणी साचायला लागले
नंतर तिला उपचारासाठी दिल्ली एम्स मध्ये नेण्यात आले तेथे उपचार चालू असताना
तिची मृत्यूची झुंज अपयशी ठरली व तिने अवघ्या 19 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला
तिच्या या जाण्याने बॉलीवूड वर शोककळा पसरली आहे