आज गुडघेदुखीच्या समस्या सांधेदुखीच्या समस्या या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि या मागचे कारण जर आपण पाहिले तर ते आहे आपल्या हाडांमध्ये आलेली कमजोरी किंवा आपण याला कॅल्शियमची कमतरता(Calcium deficiency) देखील म्हणू शकतो आणि यामुळे आपल्याला अनेक रोगांना सामोर जावं लागू शकते बाजारामध्ये असलेल्या केमिकल मिश्रित औषधांमुळे काही काळासाठी आपल्याला गुडघेदुखी सांधेदुखी यापासून मुक्तता मिळाल्याचे पाहायला मिळते पण याचा कायमस्वरूपी जर इलाज करायचा असेल तर आपल्याला आयुर्वेदाकडे वळणे गरजेचे आहे आज आपण पाच अशा सोप्या पद्धती पाहूया की ज्यामुळे आपल्या हाडातील कमजोरी दूर होईल(Simple home remedies to get rid of bone weakness)
एका अभ्यासाअंती असे स्पष्ट झाली आहे की भारतामध्ये सात कोटी ते दहा कोटी लोकांना ऑस्टियोपोरोसिस (osteoporosis) म्हणजेच हाडातील कमजोरीची तक्रारी मध्ये वाढ झाली आहे जर आपल्याला देखील आपल्या हाडांमध्ये त्रास होत असेल यालाच स्टिफ्ट फील (Stiff Feel) असे म्हणतात पण याला घाबरण्याची कारण नाहीये कारण की ही आता समस्या जवळपास सर्वांनाच चाळीशी नंतर येत आहे या ऑस्टियोपोरोसिस(osteoporosis) मध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे

जवळपास शंभर रुग्णांपैकी 80 यात महिला असतात बाकी देशांच्या तुलनेमध्ये भारतातील लोकांना ही समस्या जास्त जाणवते बाकी देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये ही प्रमाण अधिक आहे बाकी देशांमध्ये ऑस्टियोपोरोसिस (osteoporosis) या आजाराची सुरुवात ही पन्नास वर्षानंतर होते तर त्याच आजाराची सुरुवात ही भारतामध्ये 40 नंतरच होते जर आपल्याला ऑस्टियोपोरोसिस (osteoporosis) वर मात करायची असेल तर आपल्याला याच्या कारणांचा अभ्यास करावा लागणार आहे जर आपण या कारणांवर काम केले तर आपल्याला भविष्यामध्ये हा आजार दूर होणार नाही ऑस्टियोपोरोसिस (osteoporosis) किंवा आपल्याला देखील सांधेदुखीचा त्रास असेल तर आपणहा लेख पूर्ण वाचावा
हे हि वाचा –MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
ऑस्टियोपोरोसिस (osteoporosis) होण्याची कारणे ?
जेव्हा आपल्याला हाडांमध्ये कमजोरी जाणवायला लागते त्याचा त्रास सुरू होतो किंवा सांधे अगदी कडक झाल्यासारखे वाटायला लागते तेव्हा आपण डॉक्टर कडे जातो व डॉक्टरही आपल्याला कॅल्शियमच्या(Calcium deficiency) गोळ्या द्यायला सुरू करतात या गोळ्या घेतल्यामुळे आपल्याला काही दिवस बरं वाटतं पण गोळ्या बंद केल्यानंतर परत आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरतात(Calcium deficiency) तयार होतील व परत आपल्याला सांधेदुखीचा त्रास सुरू होतो फक्त कॅल्शियम ची गोळी घेतल्यामुळेच किंवा एखादे पेन किलर घेतल्यामुळे आपला त्रास कमी होतो असा जर आपण विचार करत असाल तो चुकीचा आहे कारण आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार शरीरामधील कुठलाही रोग हा समूळ नाश केला तर तो आजार परत आपल्या शरीरात येत नाही
त्यामुळे आपल्याला नैसर्गिक पद्धतीने हा आजारापासून दूर कसे राहता येईल हे पाहिले पाहिजे याची कॅल्शियम(Calcium deficiency) सप्लीमेंट घेतल्यामुळे आपले शरीर यामधील कॅल्शियम घेऊ शकत नाही व कॅल्शियम काही चुकीच्या जागी जाऊन साठायला सुरुवात होते हे कॅल्शियम कधीकधी धमन्यांमध्ये जाऊन जमा व्हायला सुरुवात होते ? यामुळे आपल्या शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम देखील होऊ लागतात याला पर्याय म्हणजे बायो ऍक्टिव्ह कॅल्शियम रिच फूड आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणे म्हणजे आपण नैसर्गिक पद्धतीने आपल्या शरीरामधील कॅल्शियमचे प्रमाण वाढू शकते वय नैसर्गिक पद्धत असल्यामुळे आपले शरीर हे कॅल्शियम लवकर पचवते व त्याची साठवणूक ही धामणी मध्ये होत नाही बाकी शरीराच्या कुठल्याही भागामध्ये कॅल्सिफिक होण्याची शक्यता कमी होते
हे हि वाचा –Summer Food-उन्हाळ्यात हे पदार्थ म्हणजे अमृतच!
हाडांमधील कमजोरी दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय(Simple home remedies to get rid of bone weakness)
यामध्ये मुख्यतः आपल्याला आपल्या रोजच्या आहारामध्ये पालेभाज्या आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे यामध्ये पालक मेथी ब्रोकली यांचा समावेश होती यामध्ये कॅल्शियम जे मोठ्या प्रमाणात असते की जे आपले शरीर सहजरित्या घेऊ शकते आणि त्यासोबतच वरील भाज्यांमध्ये मॅग्नेशियम विटामिन आणि फॉस्फरस यासारखे घटक असतात त्याचाही फायदा आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात होतो आणि आपली हाडे स्ट्रॉंग बनायला लागतात तसेच यामध्ये

तसेच दुसरा गोष्ट म्हणजे तीळ आणि चिया सीड्स अगदी पुरातन काळापासून तीळ कॅल्शियमचे एक मोठे स्तोत्र मानले जात आहे भारतीय आहारामध्ये तिळाचा समावेश हा मोठ्या प्रमाणात होतो भारतीय लोक हे प्रत्येक भाजीमध्ये तिळाचा खूप टाकतात त्यामुळे त्यामध्ये असलेले कॅल्शियम व चांगले तेलाचे प्रमाण यामुळे आपल्या सांध्यांमधील लवचिकता वाढते व तिळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपली कॅल्शियमची गरज देखील पूर्ण होते याच पद्धतीने चीया सीड्स मध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते त्यामुळे आपण रोजच्या आहारामध्ये तीळ आणि त्यातील चा उपयोग केला पाहिजे
तसेच बदामा मध्ये देखील मोठ्या प्रमाणे मध्ये कॅल्शियम असते आणि त्यासोबत बदामामध्ये मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात असते आणि या दोन घटकांमुळे हे कॅल्शियम आपले शरीर सहज त्या पचवु शकते कोलेजन (collagen) की जे आपल्या शरीरातील मेन प्रोटीन आहे या प्रोटीनचे काम हे आपल्या हाडांमध्ये लवचिकता आणणे व हाडाची घनता वाढविणे ही दोन कामे कोलेजन(collagen) करतात जर आपण आपल्या आहारामध्ये कोलेजन(collagen) ची मात्रा घेत नसाल तर आपल्या शरीरामधील हाडे हे ठिसूळ होतात व सांध्यामधील लवचिकता देखील कमी होते यासाठी महत्त्वाचे आहे ते आपल्या आहारामध्ये K2 हे विटामिन जास्त असलेले पदार्थ खावेत व कोलेजन(collagen)चे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खावेत यामध्ये विटामिन K2 चे प्रमाण हे मोड आलेली धान्य पालक ब्रोकली अंडे चिकन यामध्ये जास्त असते कोलेजन(collagen) चे प्रमाण हे अंड्यामध्ये माशांमध्ये लसन स्ट्रॉबेरीज आणि संत्रे यामध्ये
कोलेजन(collagen)हे अधिक प्रमाणामध्ये असते
तसेच आहारामध्ये मॅग्नेशियमचे देखील कमतरता असल्यामुळे देखील हाडांच्या समस्या उद्भवतात आपल्या शरीरामध्ये मॅग्नेशियमचे काम असते की आहारामधून कॅल्शियम आपल्या शरीराला पुरवठित करणे हे काम मॅग्नेशियम करत असते त्यामुळे कॅल्शियम सोबत मॅग्नेशियम देखील तितकेच महत्त्वाचे असते जर शरीरामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असेल तर कॅल्शियम अन्नपदार्थांमधून आपले शरीर घेऊ शकत नाही मॅग्नेशियमची कमतरता असेल तर आपण कितीही कॅल्शियम घेतले तरी त्याचा काही उपयोग होत नाही मॅग्नेशियमचे सर्वाधिक प्रमाण हे चीया सीड पालक बदाम सर्व प्रकारची डाळी यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते ते आपण आहारामध्ये रोज समाविष्ट केले पाहिजे

यानंतरचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे ते विटामिन डी हे विटामिन डी आपल्याला सूर्यप्रकाशा मधून मिळते सूर्यप्रकाशाच्या शिवाय आपल्या शरीरामध्ये विटामिन डी तयार होऊ शकत नाही आपले शरीर हे सूर्यप्रकाशापासून शरीरामध्ये विटामिन डी तयार करते की जे कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये पोहोचविण्या साठी मदत करते विशेषतः ही समस्या ज्या ठिकाणी प्रदूषण जास्त आहे त्या ठिकाणी विटामिन डी ची कमतरता जाणवू शकते तसेच मोठ्या प्रमाणामध्ये सनस्क्रीन लोशनचे वापर देखील विटामिन डी च्या कमतरतेसाठी कारणीभूत ठरू शकते यासाठी सकाळी लवकर उठून आपण सूर्यप्रकाश हा घेतलाच पाहिजे
तसेच हाडांच्या समस्या येण्याच्या मागील कारण असते ते शारीरिक हालचाली न करणे आपण बऱ्याच वेळेस पाहिले असेल की काही लोक हे त्यांची शारीरिक हालचाली खूप खूप कमी करतात त्यामुळे सांध्यांमधील लवचिकता देखील कमी होते आहे सांध्यांना व्यायाम नसल्यामुळे देखील सांधे कडक व्हायला सुरुवात होते झोपेत आपण हाडांवर दबाव टाकणार नाही तोपर्यंत हाडही मजबूत होत नाहीत बैठी कामे केल्यामुळे हाडांची घनता कमी होते यासाठी आपल्याला महत्त्वाचे आहे ते चालणे धावणे योगासने सायकल चालविणे व जिम मध्ये जाऊन कसरत करणे यांसारखे उपाय करून आपण आपल्या हाडांची काळजी घेऊ शकतो व एक रोगमुक्त जीवन देखील जगू शकतो वर सांगितलेले सर्व उपाय हे आपण आपल्या आयुष्यामध्ये करावेत जेणेकरून आपल्याला हाडांच्या समस्या उद्भवणार नाही व आपण आरामशीर चालत फिरत आयुष्य जगू शकतो
विशेष सूचना
सदरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध असलेले व्हिडिओ लेख व इतर माहितीच्या आधारे बनविलेला आहे या लेखामध्ये आम्ही कुठल्याही वैद्यकीय उपचार सुचवलेले नाहीत इंटरनेटच्या माध्यमातून काढलेल्या माहितीचे अधिकारी हा लेख लिहिला गेलेला आहे ही माहिती फक्त आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आहे वैद्यकीय उपचारासाठी नाही
3 Comments
Pingback: Pahalgam Terror Attack-भारत पाकिस्तानातून कोणत्या वस्तू आयात करतो ? - Sankalp Today
Pingback: MLA Ratnakar Gutee-आ.रत्नाकर गुट्टे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले ? - Sankalp Today
Pingback: Anemia:एनीमिया प्रकार, लक्षण, कारण आणि इलाज - Sankalp Today