मुंबई – लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे
तसं तसं सर्वच राजकीय पक्षांमध्ये बैठकीचे सत्र सुरू झाले आहे
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर होते याप्रसंगी
त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या
दोघांशीही जागा वाटपाबाबतीत चर्चा केली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस
व शिवसेना या दोघांना एक आकडी जागा मिळण्याची शक्यता आहे
शिवसेनेकडे बारा खासदार आहेत व त्यांना नऊ जागा मिळण्याची
शक्यता आहे यामुळे कोणत्यातरी तीन विद्यमान खासदारांचा पत्ता
कट होणार आहे असं बोललं जात आहे
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना चार जागा
मिळण्याची शक्यता आहे अशा बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत
पण शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे की आपण किमान 15 ते 18
जागा लढविल्या पाहिजेत पण जागा वाटपामध्ये शिवसेनेला एवढ्या
जागा मिळण्याची शक्यता कमी आहे परत एकदा एकनाथराव शिंदे
अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमध्ये भाजपाच्या पक्षश्रेष्ठींसोबत
अजून एक बैठक होणार आहे त्यानंतरच जागा वाटपाचा तीडा सुटणार आहे
दरम्यान माध्यमां मधल्या चर्चा ऐकून मतदार मात्र शिवसेनेच्या कोणत्या
तीन खासदारांचा पत्ता कट होतो त्याची चर्चा करत आहेत