Close Menu
Sankalp Today
    Recent News

    Two brothers together-ठाकरे बंधू एकत्र पण पुढे काय होणार?

    July 7, 2025

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025

    Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं

    May 26, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 7
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • खानदेश
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » Shingnapur temple Decision । आता फक्त ब्रॅण्डेड तेलाभिषेक, शिंगणापूर देवस्थानाचा निर्णय
    No Comments

    Shingnapur temple Decision । आता फक्त ब्रॅण्डेड तेलाभिषेक, शिंगणापूर देवस्थानाचा निर्णय

    भेसळीच्या तेलामुळे होणारी शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय
    Sankalp TodayBy Sankalp TodayFebruary 15, 2025
    Shani Dev mandir shani shingnapur
    शनी शिंगणापूर शनि देव

    शनि देवाच्या(Shani Dev) काही मुख्य स्थानांपैकी असलेलं महाराष्ट्रातलं एक मुख्य स्थान म्हणजे शनिशिंगणापूर(Shani Shingnapur) या गावातील स्वयंभू असलेली शनिदेवाच्या मूर्ती(Shani Dev)वर रोज हजारो भाविक तेलाचा अभिषेक करतात पण आता एक मार्चपासून या मूर्तीवर फक्त ब्रॅण्डेड तेलाचाच तैलाभिषेक करता येणार आहे असा ठराव मंदिर प्रशासनाने घेतला आहे

    Shani Dev mandir shani shingnapur
    शनी शिंगणापूर शनि देव

    अहिल्यानगर जिल्ह्याच्या ठिकाणाहून 35 किलोमीटर असलेले शनिशिंगणापूर(Shani Shingnapur) हे गाव हे गाव नेवासा तालुक्यात आहे या ठिकाणी शनि देवाची(Shani Dev) स्वयंभू मूर्ती आहे ही मूर्ती एका चौथर्‍यावर आहे या मूर्तीला दररोज हजारो भाविक तेलाचाअभिषेक करतात पण मूर्तीची होणारी झीज पाहून मंदिर प्रशासनाने यापुढे फक्त ब्रॅण्डेड तेलाचाच अभिषेक करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे येणाऱ्या भाविकांना देखील ब्रांडेड तेलच अभिषेकासाठी घेऊन यावे लागेल

    शनी शिंगणापूरचा इतिहास(History of Shani Shingnapur)
    नऊ ग्रहापैकी सर्वात ताकतवर ग्रह म्हणून शनि देवाचे(Shani Dev)पूजन केले जाते राजाचा रंक करण्याची ताकद ही शनीदेवांमध्ये(Shani Dev)असते व ज्याच्यावर शनीदेवाची(Shani Dev)कृपा होती तो रंकाचा राजा देखील होतो शनि देवाची(Shani Dev)वक्रदृष्टी ज्याच्यावर पडली त्याचा चकणाचुर झाल्याचे पाहायला मिळते महाराष्ट्रा मध्ये शनिदेवाचे दोन महत्त्वाचे स्थान आहेत यामध्ये पहिला राक्षस भवन येथील गोदातीरी वसलेले शनि देवाचे(Shani Dev)मंदिर हे मंदिर प्रभू श्री राम यांनी स्थापन केले आहे अशी आख्यायिका आहे तर दुसरे महत्त्वाचे स्थान म्हणजे शनिशिंगणापूर(Shani Shingnapur)या ठिकाणी शनि देवाची(Shani Dev) स्वयंभू मूर्ती आहे असं म्हणतात की यात गावामध्ये कधी चोरी होत नाही त्यामुळे जगातले एकमेव गाव आहे की ज्या ठिकाणी दाराला कुलूप नसतं किंवा दाराला कडी नसते तरीदेखील येथे चोरी होत नाही या गावाचं नाव पूर्वी शिंगणापूर असे होते पण मग ते गाव शनि देवाच्या(Shani Dev)नावाने का ओळखले जाऊ लागले आणि ही स्वयंभू मूर्ती शनिशिंगणापूर(Shani Shingnapur)मध्ये कशी आली कथा सांगितली जाते सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी शनिशिंगणापूर(Shani Shingnapur)मध्ये जोरदार वादळी पाऊस झाला इतका भयंकर पाऊस त्याआधी शनिशिंगणापूर(Shani Shingnapur)मध्ये कधीही झाला नव्हता नदी नाले सर्व एक झाले याच गावालगत पानस नावाचा एक ओढा होता याच ओढ्यामध्ये पाच ते सहा फूट उंचीची एक कळ्या रंगाची शिळा ही पाण्यासोबत वाहत तेथे आली व एका मोठ्या बोरीच्या झाडाला ती अडकली पूर ओसरल्यानंतर गावातील नागरिक आपल्या आपल्या शेतीच्या कामाला लागली तसेच गावातील लहान मुलं हे

    हे हि वाचा-KAILAS MANSAROVAR YATRA कैलासा मानसरोवर यात्रेला भारत व चीन या देशांची सहमती

    नित्यक्रमाप्रमाणे आपली गुरढोरं घेऊन नदीकाठी चारायला निघाली या नदीकाठीत गुरढोरं चारत असताना त्यांचे लक्ष त्या मोठ्या अशा काळ्या शिळेवर गेले आणि त्यातला एका मुलाने जाऊन आपण पाहू एवढी मोठी शीळ कशाची आहे म्हणून त्या शिळे जवळ जाऊन पोहोचले ती शीळ थोडी वेगळी दिसल्यामुळे एका गुराख्या मुलाने त्यावर आपल्या हातातील काठी टोचवायला सुरुवात केली तर ती काठी त्या शिळे मध्ये जायला लागली आणि अचानक त्या शिळेमधून रक्त यायला लागले हे पाहून मुलं चांगलीच घाबरली व त्यांनी तिथून पळ काढला व ते थेट गावात येऊन पोहोचले गावात आल्याबरोबर त्यांनी गावातील काही वरिष्ठ मंडळीला झालेला संपूर्ण प्रकार सांगितला पण रात्र झाल्यामुळे आपण त्या शिळे कडे सकाळी जाऊ असे गावकरी मंडळींनी ठरवले व त्याच रात्री त्या गावातील एक शनि देवाचा(Shani Dev) भक्त होता जो अखंड शनि देवाचे(Shani Dev)नामस्मरण करत होता याच भक्ताच्या स्वप्नामध्ये साक्षात शनिदेव(Shani Dev)आले व त्यांनी त्या भक्ताला सांगितले की मी तुमच्या गावांमध्ये राहायला आलो आहे

    ओढ्यामध्ये जी शीळ आहे त्या शेळीची स्थापना ही गावाच्या मध्यभागी करा तो खडबडून जागा झाला व दिवस उजडायची वाट पाहू लागला कधी एकदा दिवस उगवतो आणि कधी एकदा ती शीळ आणून गावाच्या मध्यभागी स्थापन करतो अशी उत्सुकता त्या भक्ताला लागली सकाळी उठल्याबरोबर त्यांनी सर्व गावकऱ्यांना आपले स्वप्न सांगितले सर्व गावकरी वाजत गाजत बैलगाड्या घेऊन त्या शिळेजवळ आले गावातील काही तरुण मुलांनी ती शीळ उचलण्याचा प्रयत्न केला पण शिळ इंचभर सुद्धा हल्ली नाही दिवसभर प्रयत्न केल्यानंतर शीळ काही हल्ली नाही म्हणून गावकरी परत गावामध्ये गेले त्या रात्रीच त्या भक्ताच्या स्वप्नामध्ये परत एकदा शनी देव(Shani Dev)आले आणि त्यांनी सांगितले की शेळ उचलण्या साठी मामा व भाच्यांनीच ती शीळ उचलावी व ज्या बैलगाडीमध्ये ती शीळ ज्या बैलगाडीची बैल जोडी ही देखील मामा भाच्याचीच असावी व ती बैल जोडी काळ्या रंगाची असावी नंतर गावकऱ्यांनी मामा भाचे हे नाते असलेले एक बैल जोडी हुडकून काढली व एका मामा भाच्याला घेऊन परत वाचत गाजत त्या ओढ्याच्या ठिकाणी आले मामा भाच्यांनी त्या शेळीच्या पाया पडून ती शीळ उचलली जी शीळ 25 माणसांना उचलत नव्हती ती मामा भाच्यांनी अगदी सहज उचलली व ती बैलगाडी ठेवली वाजत गाजत ती मूर्ती गावात आणि व गावाच्या मध्यभागी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली रोज पूजा पाठवू लागली आणि ज्यांना शनि देवाची(Shani Dev) साडेसाती चालू आहे ते या आल्यानंतर त्यांची साडेसाती दूर होऊ लागली अडचणी दूर होऊ लागल्या म्हणून भक्तांचा ओढा हा शनिशिंगणापूरच्या(Shani Shingnapur)दिशेने येऊ लागला विशेष म्हणजे शनिशिंगणापूर(Shani Shingnapur) येथे मंदिर नाही त्या मूर्तीवर छत नाही

    हे हि वाचा—गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज

    शनेश्वर देवस्थान मंडळांनी घेतला कोणता निर्णय ?(What decision was taken by the Shaneshwar Devasthan Mandals?)
    शनिशिंगणापूरमध्ये (Shani Shingnapur)चौथर्‍यावर जाऊन शनि देवाचे दर्शन घेऊन मूर्तीवर तैलाभिषेक केला जातो मात्र तेलातील भेसळीमुळे या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचे लक्षात आले आणि त्यामुळे ही झीज रोखण्यासाठी संस्थानाने एक मोठा निर्णय घेतला आहे यामध्ये एक मार्च 2025 पासून शनिदेवाच्या(Shani Dev) चौथ्यावर जाऊन अभिषेक करणाऱ्या भाविकांना आता ब्रांडेड तेल आणावे लागेल अन्य कुठलीही भेसळयुक्त तेलाने अभिषेक करण्याची परवानगी दिली जाणार नाही एक मार्च पासून अभिषेकासाठी सुटे तेल वापरण्याची परवानगी देण्यात येणार नाही हा निर्णय घेण्याच्या मागे विश्वस्त मंडळाने सांगितले की अन्न व भेसळ खात्याच्या तपासणी अहवाला मध्ये असे आढळले की असे भेसळयुक्त तेल मूर्तीवर अर्पण केल्यामुळेच मूर्तीची झीज होत आहे त्यामुळे हा मोठा निर्णय विश्वस्त मंडळांनी घेतला आहे या या निर्णयाच्या अंमलबजावणी साठी पंधरा दिवसांच्या वरचा वेळ दिल्यामुळे भाविकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे तसेच शनिशिंगणापूर(Shani Shingnapur)मध्ये शेकडो तेल विक्री ते करणाऱ्यांची दुकाने आहेत त्यांना सुद्धा हा पंधरा दिवसाचा कालावधी हा पुरेसा ठरणार आहे होणारी मूर्तीची झीज रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरांमधून स्वागत होत आहे

    शनिशिंगणापूर(Shani Shingnapur)मध्ये दाराला कोंडी व कुलूप लावत नाहीत ही आगळीवेगळी परंपरा आजही कायम आहे येथे असलेल्या शनि देवाच्या(Shani Dev) स्वयंभू मूर्तीच्या वर कुठलेही मंदिर नाही क्त एका चौथर्‍यावर या स्वयंभू मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे लाखो भाविकांचे श्रद्धा असलेले शनिशिंगणापूर येथे आपल्या कष्ट निवारणासाठी व शनि देवाची(Shani Dev)मनोभावे पूजा करण्यासाठी दररोज लाखो भक्त हे शनिशिंगणापूरकडे(Shani Shingnapur)येत असतात विशेषतः शनि अमावस्येला तर या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते शनिशिंगणापूर(Shani Shingnapur)हे स्थान शिर्डी पासून अवघ्या साठ किलोमीटरवर असल्यामुळे आलेल्या

     

    भाविकांना शिर्डी येथे सुद्धा दर्शनाला जाता येते मंदिर प्रशासनाने मूर्तीची झीज होऊ नये म्हणून ब्रँडेड तेलाचाच वापर करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचे स्वागतच केले पाहिजे कारण लाखो भक्तांच्या कष्टाचे हरण करणाऱ्या शनि देवाची(Shani Dev) मूर्ती ही हजारो वर्ष अशीच राहिली पाहिजे हीच प्रत्येक शनिदेवाच्या (Shani Dev) भक्ताची मनस्वी इच्छा आहे

    Post Views: 240
    shani dev Shani Shingnapur Shani Shingnapur news Shingnapur temple Decision
    Add A Comment

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024926 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024580 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024885 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024366 Views

    गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज

    September 7, 2024686 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024926 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024580 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024885 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    148528
    Views Today : 209
    Who's Online : 5
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.