मागील अनेक दिवसापासून महाविकास आघाडीचे घटक पक्षांमध्ये अनेक बैठका झाल्या या
बैठकांमध्ये महाविकास आघाडीतील घटकपक्ष यांना किती जागा द्यायच्या यावर चर्चा झाली
व सांगली व भिवंडी या दोन जागेमुळे महा विकास आघाडी मध्ये तणाव निर्माण झाला होता
कारण उद्धव ठाकरे यांच्या गटांनी सांगलीमध्ये उमेदवार जाहीर केला त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक
उमेदवार विश्वजीत कदम हे नाराज झाले
पण आज मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटप झाले यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 21
जागा तर काँग्रेस 17 तर शरदचंद्र पवार गटाला 10 जागा आता महाविकास आघाडीमध्ये मिळाले आहेत
यामध्ये कळीचा मुद्दा असलेली सांगली ही जागा ठाकरे गटाला तर भिवंडी शरद पवार गटाला देण्यात आली
त्यामुळे आघाडीमध्ये नाराजीचे सूर आहेत वर्षा गायकवाड यांनी सुद्धा या जागा वाटपावर नाराजी
व्यक्त केली आहे आता पहावं लागेल की हे तीन पक्ष एकत्रित येऊन कशा पद्धतीने महायुतीला टक्कर देतात