नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रा मध्ये महायुतीला अपयश आलं
तर महाविकास आघाडीला मोठे यश आले 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 30 मतदार संघावर
महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले तर 17 मतदारसंघावर महायुतीचे उमेदवार
विजयी झाले एका मतदारसंघां मध्ये अपक्ष विजय झाले जर लोकसभेला मिळालेली लीड जर
विधानसभेला तशीच राहिली तर महाराष्ट्रा मध्ये काय चित्र असू शकतं कारण फक्त सहा महिन्याच्या
आत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे या लोकसभेतील मताधिक्याला फार
महत्त्व आले आहे कारण महाविकास आघाडीने घेतलेली आघाडी व महायुतीची झालेली पीछेहाट
यामुळे दोन्हीही आघाड्यांना स्वतःच्या रणनीतीमध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत याविषयी
आपण चर्चा करूया
महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आहेत सहा विधानसभा मतदारसंघाचा एक लोकसभा
मतदारसंघ असतो या हिशोबाने महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघ आहेत लोकसभेच्या
निवडणुकीमध्ये मिळालेल्या मताधिक्य यावरून आपण विधानसभेचे गणित कसं असू शकतो ते पाहूया
मराठवाडा
मराठवाड्यात एकूण 46 विधानसभा मतदारसंघ आहेत व या मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या
मताधिक्यावर विधानसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील
एकूण जागा 46
महायुतीला किती जागा मिळतील
भारतीय जनता पार्टी 3
शिवसेना 3
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 5
तर महाविकास आघाडीला
काँग्रेस 17
उद्धव ठाकरे गट 4
शरद पवार गट 10
इतर 4
मराठवाड्यामध्ये महायुतीला 11 जागा मिळू शकतात
तर महा विकास आघाडीला 31 जागा मिळू शकतात
विदर्भ
विदर्भा मध्ये एकूण 62 विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघां मध्ये लोकसभेच्या
मतांच्या लीडवर विधानसभेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील
एकूण जागा 62
महायुतीला किती जागा मिळतील
भारतीय जनता पार्टी 15
शिवसेना 1
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1
तर महाविकास आघाडीला
काँग्रेस 29
उद्धव ठाकरे गट 4
शरद पवार गट 4
व इतर चार
विदर्भा मध्ये महायुतीला एकूण 17 जागा मिळू शकतात
तर महाविकास आघाडीला 37 जागा मिळू शकतात
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रा मध्ये एकूण 48 विधानसभा मतदारसंघ आहेत व या मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या
मतांच्या लीडवर विधानसभेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील
एकूण जागा 48
महायुतीला किती जागा मिळतील
भारतीय जनता पार्टी 23
शिवसेना 5
राष्ट्रवादी काँग्रेस 2
तर महा विकास आघाडीला
काँग्रेस 8
उद्धव ठाकरे गट 1
शरद पवार गट 9
उत्तर महाराष्ट्रा मध्ये महायुतीला एकूण 30 जागा मिळू शकतात
तर महाविकास आघाडीला एकूण 18 जागा मिळू शकतात
मुंबई ठाणे कोकण
एकूण जागा 72
महायुतीला किती जागा मिळतील
भारतीय जनता पार्टी 29
शिवसेना 11
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1
तर महाविकास आघाडीला
काँग्रेस 7
उद्धव ठाकरे गट 15
शरद पवार गट 5
इतर 4
मुंबई ठाणे कोकण मध्ये महायुतीला एकूण 41 जागा मिळू शकतात
तर महाविकास आघाडीला एकूण 27 जागा मिळू शकतात
पश्चिम महाराष्ट्र
एकूण जागा 60
महायुतीला किती जागा मिळतील
भारतीय जनता पार्टी 15
शिवसेना 3
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 6
तर महाविकास आघाडी ला किती जागा मिळतील
काँग्रेस 11
उद्धव ठाकरे गट 5
शरद पवार गट 20
पश्चिम महाराष्ट्रा मध्ये महायुतीला एकूण 24 जागा मिळतील
तर महाविकास आघाडी ला एकूण 36 जागा मिळतील
अशाप्रकारे महाराष्ट्रा मध्ये लोकसभेत विधानसभा मतदारसंघां मध्ये या पक्षांना मताधिक्य
मिळाले होते यावरून आपण एकंदरीत अंदाजा बांधू शकतो की महाराष्ट्रात नेमकं कोणत्या
पक्षाला किती जागा मिळू शकतील आता पक्षनिहाय आपण पाहूया की कोणाला किती जागा मिळू शकतात
महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील
भारतीय जनता पार्टी 73
शिवसेना 23
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 15
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ला किती जागा मिळू शकतील
काँग्रेस 72
उद्धव ठाकरे गट 29
शरद पवार गट 52
महाराष्ट्रा लोकसभेला मिळालेल्या मताधिक्या प्रमाणे
महायुतीला महाराष्ट्रामध्ये 123 विधानसभेच्या जागा मिळू शकतात
तर महाविकास आघाडीला महाराष्ट्र मध्ये एकूण 153
विधानसभेच्या जागा मिळू शकतात
इतरांना महाराष्ट्रामध्ये 12 जागा विधानसभेच्या मिळू शकतात
आपण महाराष्ट्र विधानसभेचा विचार केल्यास 288 मतदार संघ आहेत व सत्तेत येण्यासाठी
बहुमताचा आकडा हा 145 चा आहे आता लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेली विधानसभा
मतदारसंघातील लीड जर विधानसभेत च्या निवडणुकीच्या वेळी अशीच कायम राहिली तर
महाराष्ट्रा मध्ये महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते असं काही चित्र सध्या दिसत आहे
पण लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकी मध्ये खूप मोठा फरक पडू शकतो
त्यामुळे हे चित्र हसत राहील अशी शक्यता फार कमी असते
जर वरील कल लक्षात घेतले तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस मोठी मुसंडी मारताना दिसत आहे
कारण काँग्रेस थेट 40 वरून 72
जागा जिंकताना दिसत आहे महाविकास आघाडीच्या दोन्हीही घटक पक्षांमध्ये शिवसेना व
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडली होती
पण काँग्रेसमध्ये अशा पद्धतीने फुटाफुटीचे राजकारण पाहायला मिळाले नाही काँग्रेसचे माजी
प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण वगळता अन्य कुठलाही काँग्रेसचा
मोठा नेता हा पक्ष सोडून जाताना दिसला नाही याच एकजुटीचा फायदा कुठे ना कुठे काँग्रेसला
झालेला दिसत आहे
मराठा आंदोलन असो की कांदा प्रश्न यामुळे मतदारांनी महायुतीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे
व विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल अशी कुठलीही शक्यता
दिसत नाहीये त्यामुळे मराठा समाधान महायुतीवर नाराज राहू शकतो
जरी महाविकास आघाडी सत्तेत आली तरीही उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहील
कारण उद्धव ठाकरे गटाच्या प्रत्येक मेळाव्यात व प्रचार सभेत उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे पुढचे
मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार केला गेला त्यामुळे उद्धव ठाकरे
यांच्या पक्षाला काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या तर काँग्रेस उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करेल अशी
शक्यता कमी दिसत आहे
तसेच महाविकास आघाडी एकत्र राहावी यासाठी शरद पवार यांनी अनेक वेळा दोन पावलं मागे घेण्याची
भूमिका घेतली होती त्यामुळेच ही आघाडी लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळवताना दिसली तर दुसरीकडे
महायुतीमध्ये जागा वाटपावरून अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये नाराजी सूर उमटले व यामुळे या लोकसभेच्या
जागा महायुतीच्या हातून निसटल्या
महायुतीची आता काय करेल
महाविकास आघाडीला आलेले यश यामुळे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमतापासून दूर राहावं लागलं
त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेते यांचे संपूर्ण लक्ष
महाराष्ट्रावर लागल आहे कारण पुढील सहा महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत हा झालेल्या पराभवाचा
वचपा काढण्याची संधी व देशभरामध्ये कमबॅक करण्याची एक नामी संधी भारतीय जनता पार्टीच्या समोर आहे
त्यासाठी महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत बदल होऊ शकतात व ज्या कारणांमुळे महायुतीला अपयश आले
त्या कारणांचा अभ्यास करून ती दूर करण्यासाठी केंद्रीय स्तरावर सुद्धा प्रयत्न होऊ शकतात
देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई व औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला महाराष्ट्र राज्य याकडे संपूर्ण
देशाचे लक्ष लागून असते मागील पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणा मध्ये अनेक अनपेक्षित राजकीय घटना घडल्या
उद्धव ठाकरे यांची भारतीय जनता पार्टी सोबत असलेली युती तोडून महाविकास आघाडी मधून मुख्यमंत्रीपदाची शपथ
घेणे असेल व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा बंड असेल व त्या नंतर झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधील
अजित पवार यांचा बंड या कारणांमुळे मागील पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र कायम चर्चेत राहिला आता विधानसभेच्या
निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रामध्ये काही मोठे राजकीय भूकंप होण्याची ही शक्यता आहे कारण सगळ्याच पक्षांमध्ये
नाराज असलेले नेते मंडळी पक्ष बदलून इकडे तिकडे जाऊ शकतात आणि कांदा प्रश्न असेल आरक्षणाचा प्रश्न असेल
यावरूनही महाराष्ट्राची राजकीय स्थिती काय होईल हे सध्या तरी सांगता येणार नाही पण निश्चित भारतीय जनता पार्टी
व महायुती या प्रश्नांकडे गांभीर्याने बघून तो सोडवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करणार आहे त्यानंतर महाराष्ट्राचे खरे चित्र
स्पष्ट होईल
आम्ही या लेखांमध्ये लोकसभे मध्ये झालेली मतदानाच्या टक्केवारी वरून विधानसभेत चित्र नेमकं काय राहू शकत
याविषयी चर्चा केली आहे आता आपल्याला पहावं लागेल की विधानसभेच्या आधी कुठल्या घडामोडी घडवून महाराष्ट्रा
मध्ये महायुतीचं सरकार येतं की महाविकास आघाडीचे हे पाहावे लागेल
Recent News
महाराष्ट्रात कोण सतेत कोण येणार ?
लोकसभेतील मताधिक्या प्रमाणे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील