नांदेड– महाराष्ट्र राज्याला सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहे सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे विधानसभा निवडणुकी सोबतच महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक(By-election of Nanded Lok Sabha Constituency) ही विधानसभेसोबतच होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार कोण असावेत यासाठी विचारमंथन चालू केले आहे आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण(Late MP Vasantrao Chavan)यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण(Ravindr Chavan)यांना उमेदवारी देण्याचे प्रस्ताव संमत केला आहे
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या(By-election of Nanded Lok Sabha Constituency)2024 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव चव्हाण(MP Vasantrao Chavan)यांना उमेदवारी देण्यात आली होती तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतापराव पाटील चिखलीकर(Prataprao Patil Chikhlikar)यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि एडवोकेट अविनाश भोसीकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते या तिघांमध्ये झालेल्या लढतीमध्ये स्व.वसंतराव चव्हाण(Late MP Vasantrao Chavan)हे विजयी झाले होते लोकसभेच्या आधी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले होते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता पण तरीही याचा फारसा परिणाम या निवडणुकीमध्ये झाल्याचे दिसून आले नाही वसंतराव चव्हाण हे विजयी झाले पण वसंतराव चव्हाण(Late MP Vasantrao Chavan) यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हैदराबाद मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण 26 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले वनांदेड लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची जागा रिक्त झाली या रिक्त जागेसाठी विधानसभा निवडणुकी सोबतच नांदेड लोकसभा मतदारसंघाची(By-election of Nanded Lok Sabha Constituency) ही निवडणूक होणार हे जवळपास निश्चित आहे यामुळे प्रमुख राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार शोधण्याचे काम चालू केले आहे यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षाचा समावेश आहे काल झालेल्या काँग्रेस कमिटीची बैठकीमध्ये स्वर्गीय वसंतराव चव्हाण(Late MP Vasantrao Chavan)यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण(Ravindr Chavan)यांनाच उमेदवारी देण्याचे प्रस्ताव हा एकमताने पारित करण्यात आला पण या जागेसाठी आणखीन काही उमेदवार इच्छुक असल्याची चर्चा होती यामध्ये प्रामुख्याने माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचेही नाव आघाडीवर होते तसेच त्यांच्या सुनबाई डॉक्टर मीनल ताई खतगावकर यांचेही नाव चर्चेत होते पण काँग्रेस कमिटीने एक मताने रवींद्र चव्हाण(Ravindr Chavan)यांच्या नावाला पसंती दिलेली आहे हा प्रस्ताव पुढे राज्याच्या नेतृत्वाकडे पाठविण्यात येणार आहे या बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बि.आर.कदम यांनी ठराव मांडला तर माजी आमदार हनुमंतराव बेटमोगरेकर यांनी या ठरावाला अनुमोदन दिले याप्रसंगी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर
आमदार मोहन अण्णा हंबर्डे जे पी पाटील श्याम दरक दिलीप पाटील बेटमोगरेकर एकनाथराव मोरे डॉक्टर रेखा चव्हाण व माझी महापौर अब्दुल सत्तार यांनी या ठरावाच्या बाजूने आपले मत व्यक्त केले रवींद्र चव्हाण(Ravindr Chavan) हेच काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे
तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोण उमेदवार येणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर(Prataprao Patil Chikhlikar)यांचा पराभव झाल्यानंतर चिखलीकर यांनी विधानसभेची तयारी देखील सुरू केली होती मग आता चिखलीकर हे लोकसभेची निवडणूक लढविणार की विधानसभेची याबाबतीत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सर्व काही पक्षश्रेष्ठींच्या मनावर असल्याचे सांगितले भारतीय जनता पार्टीची पक्षश्रेष्ठी पुन्हा एकदा प्रतापराव पाटील चिखलीकर(Prataprao Patil Chikhlikar)यांना उमेदवारी दिली की दुसऱ्या कोणत्या नावाचा विचार होऊ शकतो ही सध्या चर्चा जोरात चालू आहे
भारतीय जनता पार्टीकडे लोकसभेसाठी अनेक चेहरे आहेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचेही नाव चर्चेत आहे त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टी लोकसभेला उमेदवारी देऊ शकते कारण भारतीय जनता पार्टीसाठी नांदेडची जागा ही अत्यंत महत्त्वाची आहे केंद्रामध्ये स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीला एक एक जागा महत्त्वाची आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी या वेळेला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार नाही तसेच संजय कौडगे यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे ते भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते आहेत तसेच अनेक दिवसापासून सक्रिय राजकारणात आहेत
पण सध्या प्रतापराव पाटील चिखलीकर(Prataprao Patil Chikhlikar)हे भाजपाचे नांदेड लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे प्रतापराव पाटील चिखलीकर(Prataprao Patil Chikhlikar)व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चिखलीकर यांचे संबंध चांगले असल्यामुळे परत एकदा त्यांना भाजपाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे
मध्यंतरी ही पोट निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशीही इच्छा काही राजकीय मंडळींनी व्यक्त केली होती पण असं होताना दिसत नाहीये सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून कसा आणता येईल यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठी कामाला लागलेली आहे
या बैठकीला उपस्थित असणारे काँग्रेस अल्पसंख्यांक कमिटीचे अध्यक्ष शरफोद्दीन शेख यांनी संकल्प टुडेशी बोलताना सांगितले की मागील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या बाजूने मुस्लिम मतदार हा खंबीरपणे उभा राहिला होता आणि आता येणार आहे निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज हा काँग्रेस पक्षाच्या बाजूने उभा राहील असा ठाम विश्वास शरफोद्दीन शेख यांनी संकल्प टुडे शी बोलताना व्यक्त केला
भारतीय जनता पार्टीने सुद्धा ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे आणि याला कारण आहे केंद्रामध्ये स्पष्ट बहुमत नसल्यामुळे या जागेकडे भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींचे विशेष लक्ष असेल त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा ही अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे भारतीय जनता पार्टी सुद्धा फार विचार करून उमेदवार निश्चित करेल कारण विधानसभे सोबत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा या भारतीय जनता पार्टीच्या कशा निवडून येतील याकडे भारतीय जनता पार्टीच्या पक्ष श्रेष्ठीचे लक्ष लागले आहे नांदेड जिल्ह्यात राज्यसभेचे दोन खासदार आहेत अशोकराव चव्हाण व डॉक्टर अजित गोपछडे यांच्या रूपाने या जिल्ह्याला दोन राज्यसभेचे खासदार लाभलेले आहेत आणि महायुतीचे चार आमदार असल्यामुळे या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीची पकड ही चांगलीच मजबूत आहे
तर काँग्रेस पक्षाचे संभावित उमेदवार रवींद्र चव्हाण(Ravindr Chavan)यांच्या बाजूने मतदारांची सहानुभूती असल्यामुळे त्यांनाही निवडणूक सोपी जाईल असे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे स्व वसंतराव चव्हाण(Late MP Vasantrao Chavan)यांचे र्वच राजकीय पक्षांमधील पुढार्यांसोबत अत्यंत चांगले संबंध होते त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठा प्रभाव असताना सुद्धा त्यांनी नांदेड लोकसभेची जागा ही खेचून आणली आता त्यांचे पुत्र रवींद्र चव्हाण(Ravindr Chavan)यांना मतदार अशी साथ देतात का ते पाहावे लागेल
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला यश मिळण्याचे जर आपण कारण पाहिले तर यामध्ये प्रमुख कारण होते ते मराठा समाजाची महायुती बद्दलची नाराजी ही जनतेने मतपेटीतून व्यक्त केली होती तसेच मुस्लिम समाज देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिल्याचे पाहायला मिळाले येणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी सुद्धा मराठा समाज हा चांगलाच आक्रमक झालेला दिसत आहे पण जर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले तर मात्र चित्र बदलण्याची शक्यता आहे आणि जर मनोज जरांगे पाटील यांनी जर उमेदवार उभे केले नाही तर मराठा समाज हा महायुतीच्या बाजूने जातो की महाविकास आघाडीच्या बाजूने जातो यावर विजयाचे गणित अवलंबून आहे
पण सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे प्रतापराव पाटील चिखलीकर(Prataprao Patil Chikhlikar)व रवींद्र चव्हाण(Ravindr Chavan) हे दोघेही मराठा समाजाचे आहेत त्यामुळे मराठा समाज नेमकं कोणाच्या मागे उभे राहतो हे पाहावे लागेल भारतीय जनता पार्टी काही करिष्मा करून ही जागा परत स्वतःकडे घेते की सहानुभूतीच्या लाटेवर रवींद्र चव्हाण(Ravindr Chavan) हे विजयी होतात का ते आता पहावे लागेल मतदार नेमके कल कोणाच्या बाजूने देतील हे विधानसभा व लोकसभेच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईलच पण नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक(By-election of Nanded Lok Sabha Constituency) ही महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही प्रतिष्ठेची करणार हे मात्र नक्की