मुंबई–प्रख्यात उद्योजक समाजसेवक श्री रतन टाटा(RATAN TATA)जी यांनी मुंबई मधील ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला त्यांचे वय 86 वर्ष होते त्यांच्यावर आज वरळी येथील स्मशानभूमी मध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,उद्योग मंत्री उदय सामंत,प्रसिद्ध अभिनेते आमिर खान,उद्योजक कुमार बिर्ला,मुकेश अंबानी,नीता अंबानी तसेच शरद पवार,सुप्रिया सुळे,राज ठाकरे,उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती
भारतातील अग्रगण्य टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा जगातील एक मोठे उद्योजक समाजसेवक रतन टाटा(RATAN TATA)यांचे निधन झाले आहे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे रतन टाटा(RATAN TATA)यांची ओळख प्रत्येक उद्योजक म्हणून तर आहेत पण आपल्या विविध सामाजिक उपक्रमांमधून रतन टाटा(RATAN TATA)यांनी देशांमधील अनेक गोरगरिबांना मदत देखील केली रतन टाटा(RATAN TATA)यांचे राहणीमान अत्यंत साधे होते जगातील अग्रगण असलेल्या हॉटेलचे ते मालक होते तरी पण मुंबईमधील कुलाबा परिसरामध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होते
रतन टाटा यांचे बालपण(Childhood of Ratan Tata)
रतन टाटा(RATAN TATA)यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये उद्योग क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या टाटा घराण्यामध्ये झाला ते पारसी समाजाचे होते त्यांचे वडील नवल टाटा हे एक प्रसिद्ध उद्योजक होते तर त्यांच्या आई सोनी टाटा या ग्रहणी होत्या
रतन टाटा(RATAN TATA)यांच्या घराण्याचा विचार करायला गेलो तर दोनशे वर्षांपूर्वी 1822 मध्ये गुजरात राज्यातील एका खेडे गावामध्ये पारसी कुटुंबामध्ये एका मुलाचा जन्म झाला त्याचे नाव होते नसरवानजी टाटा हे लहानपणापासून अत्यंत महत्त्वकांक्षी होते त्यांची स्वप्न मोठमोठी होती आणि आपल्या स्वप्नांची पूर्तता ही या छोट्या गावात होऊ शकत नाही म्हणून त्यांनी अवघ्या विसाव्या वर्षी आपले गाव सोडले व भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आले त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व एक मुलगा देखील मुंबईमध्ये आले
त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा होती त्यामुळे त्यांना अवघ्या सतराव्या वर्षी त्यांना एक मुलगा देखील झाला होता मुंबईमध्ये आल्यानंतर नसरवानजी टाटा यांनी कापसा चा व्यवसाय चालू केला या व्यवसायामध्ये त्यांना चांगलीच सफलता मिळाली व त्यांनी कापूस निर्यात करायला सुरुवात केली हळूहळू त्यांचा या व्यवसायामध्ये चांगलाच जम बसू लागलातसेच त्यांनी आपला मुलगा त्यांच्या मुलाचे नाव होते
जमशेदजी टाटा यांना चांगले शिक्षण द्यायचे ठरवले त्यांनी त्यांना इंग्रजी शाळेमध्ये दाखला दिला 18 वर्षाचे झाल्यानंतर जमशेदजी यांना त्यांच्या वडिलांनी हॉंगकॉंग ला उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला वयाच्या विसाव्या वर्षी जमशेदजी हॉंगकॉंग ला शिक्षणासाठी गेले त्यावेळी जमशेदजी यांचाही विवाह झाला होता त्यांना एक मुलगा देखील होता हॉंगकॉंग मधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर जमशेदजी यांनी भारतामध्ये परत येऊन 1874 मध्ये स्वतःची पहिला कारखाना चालू केला तो नागपूर मध्ये येथे त्यांनी कापूस प्रक्रिया करायला सुरुवात केली त्यानंतर टाटा समूह प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरून आपली छाप वाढत चालला होता भारतातील पहिले फर्स्ट हॉटेल त्यांनी मुंबईमध्ये मांडले हे पहिले हॉटेल आहे की ज्यामध्ये लाईट आली होती
हे पहिले हॉटेल होते की जिथे वर्णभेद न करता प्रत्येकाला या हॉटेलमध्ये यायची मुभा होती जमशेदजी यांचे स्वप्न होते की स्वतःचा स्टील प्लांट त्यांना लावायचा होता पण त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले व त्यांचे स्वप्न त्यांचा मुलगा दोराबजी टाटा यांनी 1910 मध्ये ते स्वप्न पूर्ण केले टाटाचा स्टील प्लांट देशांमध्ये उभा राहिला दोराबजी टाटा यांच्यानंतर त्यांचे भाऊ जहांगीर रतन टाटा(RATAN TATA)हे टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा झाले आपण त्यांना जे आर डी टाटा म्हणून ओळखतो त्यांचा जन्म फ्रान्समध्ये झाला होता ते एक पायलेट होते जी आर डी टाटा यांनी भारतामध्ये पहिली विमानसेवा देणारी कंपनी बनवली त्याचे नाव होते
टाटा एअरलाईन्स पुढे हीच कंपनी एअर इंडिया म्हणून देखील ओळखली जाऊ लागली 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले पण त्याआधी १९४५ ला टाटा मोटर्सची स्थापना झाली त्याकाळी टाटा रेल्वे इंजिन बनवण्याचे काम करत होते 1968 मध्ये त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस टाटा कन्सल्टन सर्विसेस ची स्थापना केली जीआरडी टाटा 52 वर्ष टाटा ग्रुपचे चेअरमन राहिले त्या काळामध्ये टाटाच्या एकूण 95 कंपन्या होत्या जमशेदजी टाटा यांचे नातू होते रतन टाटा(RATAN TATA)यांना सर्वात आधी रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारी टाटाची कंपनी नेल्को या कंपनीला फायद्यामध्ये आणण्याचे काम दिले त्यांनी हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले व सर्वांचे लक्षात आले की रतन टाटा(RATAN TATA)यांचे विचार खूप मोठे आहेत व त्यांना 1981 मध्ये टाटा इंडस्ट्रीज चे अध्यक्ष केले होते
यानंतर रतन टाटा(RATAN TATA)यांनी 1991 ते 28 डिसेंबर 2012पर्यंत टाटाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे चेअरमन म्हणून काम पाहिले यानंतरची जबाबदारी सायरस मिस्त्री यांच्यावर आली पण त्यांनाही काही दिवसांमधून या पदावरून काढण्यात आलं रतन टाटांनी टाटा स्टील टाटा मोटर्स टीसीएस टाटा केमिकल्स टाटा ग्लोबल बेवरजज अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले
रतन टाटा यांनी केलेली काही महत्त्वाची कामे (Some important works done by Ratan Tata)
स्वतःची कंपनी विक्री करण्यासाठी रिटर्न टाटा हे एका बड्या कार उत्पादन करणाऱ्या कंपनीकडे गेले तेव्हा त्या कंपनीच्या अध्यक्षांनी रतन टाटा(RATAN TATA)यांना सांगितले की तुम्हाला जर कार बनवता येत नसेल तर कशाला प्रयत्न करतात रतन टाटा(RATAN TATA)परत मायदेशी आले व त्यांनी भारतातील सर्वात जास्त विक्री झालेली कार टाटा इंडिका संपूर्ण भारतीय बनावटीची कार भारताच्या कार बाजारात आणली व ही कार सर्वात जास्त विक्री झालेली कार ठरली नंतर 2008 मध्ये राटन टाटा यांनी लक्झरी कार म्हणून ओळखली जाणारी जग्वार व लँड ओव्हर या दोन मोठ्या कंपन्या खरेदी केल्या
रतन टाटा(RATAN TATA)यांनी 1991 ते 2012 पर्यंत ते टाटा समूहाचे अध्यक्ष राहिले
रतन टाटा(RATAN TATA)यांनी टीसीएस सारख्या कंपनीला संपूर्णपणे स्वातंत्र्य दिल्यामुळे ही कंपनी आज जगातील अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे
टाटा स्टील हे देखील जगातील एक अग्रगण्य कंपनी आहे
रतन टाटा(RATAN TATA)यांच्या बद्दल आणखीन एक किस्सा सांगितला जातो की आपल्या शेजारी देश पाकिस्तानी टाटा मोटर्स कडे त्यांची प्रसिद्ध गाडी टाटा सुमो याच्या 25 लाख गाड्यांची ऑर्डर टाटा मोटर्सला दिली यामध्ये टाटा मोटर्स चा करोडो रुपयाचा फायदा होणार होता पण रतन टाटा(RATAN TATA)यांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका घेतली जो देश सतत माझ्या देशाच्या विरुद्ध असतो त्या देशासोबत मला कुठलाही व्यवहार करायचा नाही म्हणून त्यांनी ही डील नाकारली
रतन टाटा यांना मिळालेले पुरस्कार (Awards received by Ratan Tata)
रतन टाटा(RATAN TATA)यांना 2003 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले गेले तर 2008 मध्ये रतन टाटा(RATAN TATA)यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केले गेले 2009 मध्ये त्यांना ब्रिटिशि एम्पायर चा महत्वाचा पुरस्कार मिळाला तसेच 2012 मध्ये मानाचा समजला जाणारा इंटरनॅशनल हेरिटेज फाउंडेशन चा लाईफ टाईम अचीमेंट अवॉर्ड देखील मिळाला
रतन टाटा(RATAN TATA)हे अविवाहित होते रतन टाटा(RATAN TATA)यांचे नाव कधीही कुठल्याही घोटाळ्यामध्ये आले नाही व्यवसाय करायचा पण आपल्या रतन टाटा(RATAN TATA)यांचे ब्रीदवाक्य होते एकदा रस्त्याने जात असताना मोटरसायकलवर त्यांनी एकाच घरातील पाच व्यक्तींना बसलेल्या बघितले व त्यांच्या डोक्यामध्ये मोटरसायकलच्या किमतीमध्ये कार सर्वसामान्यांना उपलब्ध करून द्यायची असा विचार आला व त्यांनी नॅनो कार ची निर्मिती चालू केली व त्याची किंमत देखील एक लाख रुपये ठेवली गेली पण ही कार बाजारात जास्त दिवस चालली नाही
मुंबईमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये हॉटेल ताजमहालचे अतोनात नुकसान झाले होते रतन टाटा(RATAN TATA)यांनी हॉटेल ताज महल मध्ये जाऊन संपूर्ण पाहणी केली व या घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेतली त्यांची साधना केली व त्यांना आर्थिक मदत देखील केली तसेच या हल्ल्यामध्ये हॉटेल ताजमहल च्या बाहेर गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ चे काही फेरीवाले देखील जखमी झाले होते मृत पावले होते त्यांच्याही कुटुंबीयांना रतन टाटा(RATAN TATA)यांनी मोठी मदत केली होती
आपले संबंध आयुष्य हे त्यांनी लोककल्याणासाठी खर्च केले त्यांच्या उत्पन्नातील बहुतांश हिस्सा हा समाजातील गोरगरिबांच्या मदतीसाठी दिलेला असायचा मुंबईमध्ये टाटांनी कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून आजवर लाखो कॅन्सर झालेल्या रुग्णांचा इलाज केला आहे
रतन टाटा(RATAN TATA)यांच्या जाण्याने उद्योग क्षेत्राचेच नाही तर सबंध देशाचेही मोठे नुकसान झाले आहे संकल्प टुडे च्या वतीने रतन टाटा(RATAN TATA)यांना भावपूर्ण श्रद्धांजली