जालना -मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात यावेळी अंतरवाली सराटी इथून झाली
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण व त्यानंतरचा लाटी हल्ला व त्यानंतर उभ्या महाराष्ट्रामध्ये याचे
पडसाद उमटले पुढे शासन व जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा होऊ लागली या चर्चेमध्ये जालना
लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे कुठेही दिसले नाही
आता मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक मतदारसंघांमध्ये एक उमेदवार देणार आहेत व जालना मधून
मराठा योद्धा मंगेश साबळे हे आपली उमेदवारी दाखल करणार आहेत अशी चर्चा आहे मंगेश साबळे
या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये एडवोकेट गुणवंत सदावर्ते यांची गाडी फोडल्यामुळे चर्चेत आले होते
तसेच त्यांनी रास्ता रोको च्या दरम्यान स्वतःची चार चाकी गाडी जाळली होती
त्यानंतर मंगेश साबळे हे सतत चर्चेत असतात
तसेच एकदा मंगेश साबळे यांनी पंचायत समिती समोर दोन लाख रुपये उधळले होते कारण होतं
शेतकऱ्यांना विहीर मंजूर होत नाही
छत्रपती संभाजी नगर मधील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे साबळे सरपंच आहेत
ते उच विद्याविभूषित आहेत
मंगेश साबळे यांना उमेदवारी दिल्यास रावसाहेब दानवे यांच्यासमोर तगड आव्हान उभे राहण्याचे
चिन्ह आहेत कारण या आंदोलनातत सर्वात जास्त प्रभाव हा जालना जिल्हा व बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो