Close Menu
Sankalp Today
    Recent News

    UNESCO listed forts of Maharashtra युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील गड किल्ले

    August 10, 2025

    Two brothers together-ठाकरे बंधू एकत्र पण पुढे काय होणार?

    July 7, 2025

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, August 13
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » सीमेवर जवान बांधणार नांदेड कंधार मधील बहिणींनी पाठवलेली राखी दत्ताञय येमेकर यांचा अभिनव उपक्रम
    No Comments

    सीमेवर जवान बांधणार नांदेड कंधार मधील बहिणींनी पाठवलेली राखी दत्ताञय येमेकर यांचा अभिनव उपक्रम

    जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले दत्ताञय येमेकर यांच्या उपक्रमाचे कौतुक
    Sankalp TodayBy Sankalp TodayAugust 19, 2024

    आज राखी पौर्णिमा भावा बहिणीच्या प्रेमाचा हा दिवस या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्याकडून स्वतःची
    रक्षण करून घेण्याची वचन भावाकडून घेत असते भावा-बहिणीच्या या राखी पौर्णिमेच्या दिवशी आपण देशांमध्ये राखी पौर्णिमा
    रक्षाबंधन साजरे करतो पण आपल्या सुरक्षिततेसाठी आपले जवान हे सीमेवर डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करत असतात साधत्यांना
    स्वतःच्या बहिणीकडून या दिवशी राखी बांधून घ्यायला घेण्याचं योग त्यांना येत नाही त्यामुळे अशा भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असणाऱ्या
    जवानांना राखी पाठवण्याचा अभिनव उपक्रम मागील दहा वर्षापासून मन्यार खोऱ्यातील कंधार येथून आदरणीय दत्तात्रय येमेकर हे 14 बटालियन
    मधील 263 फिल्ड रेजिमेंट सह सैनिकांना 3333 त्याबरोबरच शालेय विद्यार्थिनींनी लिहिलेले सदिच्छा पत्र त्याबरोबरच 15 फुटाची विशाल काय राखी
    हे प्रतिवर्षी सीमेवर पोलीस स्टेशन कंधार येथून पाठवतात या वेळेला नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत यांनी या उपक्रमाचे कौतुक
    केले व स्वतः दत्तात्रय येमेकर यांची जिल्हाधिकारी कार्यात भेट घेऊन त्यांच्याशी या कार्याविषयी चर्चा केली व त्यांच्याजवळ एक अभूतपूर्व असं अल्बम आहे
    की ज्यामध्ये त्यांनी भारत पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या कर्गील युद्धातील अनेक वर्तमानपत्रांमध्ये आलेले कात्रण हे दत्तात्रय येमेकर यांनी जतन करून ठेवलेले आहेत
    सदरील गोळा केलेले कात्रण पाहून अभिजीत राऊत देखील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले त्यांनी दत्तात्रय येमेकर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व डिजिटल
    जमान्यात हा ठेवा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल तसेच आपल्या सैनिकांची शौर्यगाथा ही विद्यार्थ्यांना व पुढील पिढीला अनुभवता येईल अशी प्रतिक्रिया या वेळेला
    जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली तसेच दत्तात्रय येमेकर यांनी कंदार शहरात राष्ट्रकुल संस्कृती महोत्सव शासनाने घेऊन राष्ट्रकुल कालीन कंधारचा भुईकोट किल्ला
    याचे जतन करून जलविर यासारखे उपक्रम राबवावेत अशी विनंती देखील याप्रसंगी दत्तात्रय येमेकर यांनी केली जिल्हाधिकारी यांचा सत्कार वैजनाथ सादलापूरे,
    डाॅ.रामभाऊ तायडे,प्रा.डाॅ.गंगाधर तोगरे,वृक्षमित्र शिवसांब घोडके यांनी वृक्षाचे रोप देऊन सत्कार केला.दिलेल्या वेळे नुसार आमची सर्व टिम मा.वैजनाथ सादलापुरे,
    डाॅ.रामभाऊ तायडे, वृक्षमित्र शिवसांब घोडके,भारतीय सैनिक शिवहार कागणे भोजुचीवाडीकर, माजी मुख्याध्यापक जी.जी.रुमाले सर,सेवानिवृत्त कॅप्टन कस्तुरे नांदेड,
    साधाना हायस्कूल देगलूर, बालिका पंचायत राज मोहिम अग्रक्रमाची प्राथमिक शाळायेरगी,एम.जे.पी.महाविद्यालय मुखेड,पब्लिक स्कूल कमळेवाडी,
    श्री शिवाजी हायस्कूल कंधार, म.फुले प्राथमिक शाळा संभाजी नगर, गणपतराव मोरे विद्यालय कंधार,
    नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय पानभोसी जि.प.प्राथमिक शाळा पानभोसी,जि.प.प्राथमिक शाळा वळसंगवाडी,श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ,शिवशंकर विद्यालय पांगरा,
    जि.प.प्राथमिक शाळा लालवाडी,
    शिवाजी विद्यालय सिडको नांदेड, कुसुमताई विद्यालय सीडको नांदेड, गुजराती हायस्कूल नांदेड,सावित्रीबाई हायस्कूल नांदेड,शाकुंतल एक्सलन्स नांदेड,
    होलीसीटी इंग्लिश स्कूल नांदेड,श्री शिवाजी ज्युनियर काॅलेज नांदेड,
    एक्सलन्स नांदेड, मानव्य विकास विद्यालय देगलूर,गुजराती विद्यालय नांदेड, होलीसिटी इंग्लिश मीडियम स्कूल नांदेड ,कुसुमताई विद्यालय सीडको नांदेड,
    श्री शिवाजी हायस्कूल कंधार, अशा अनेक शाखेतील बहिनींनी सैनिक बांधवास हस्तकलेतून राख्या तयार करून
    सलग अकरा वर्षापासून सैनिकांना विशालकाय राखी पाठवणारा अवलिया-दत्तात्रय एमेकर
    माता कुसुमबाई गोपाळराव एमेकर माऊलीच्या उदरी दत्तात्रय यांचा जन्म झाला. शालेय जीवन हालाखीत झाले विद्यार्थी दशेत असतांना त्यांना शनिदेव मंदिर गल्लीत
    त्यांच्या शेजारी राहणारे कलाध्यापक केशवराव डांगे, श्री शिवाजी हायस्कूल हतईपुरा यांच्याकडून कलेची आवड निर्माण झाली. शिक्षण पदवी पर्यंत कसे बसे झाले.
    घरची परिस्थिती बेताची, एक वेळ जेवणाची सुद्धा परिस्तिथी न्हवती
    क्रांतिभुवन बहाद्दरपूरा , ता. कंधार या चळवळीच्या नगरीत एमेकर परिवारात महालक्ष्मीची सजावट अख्या गावात सुंदर करत असत. त्यावेळी परिवारातील ज्येष्ठ मंडळी
    सजावट करत असतांना ते पहायला जायचे, मदत करु लागायचे परंतु त्यांना कान धरून त्या सजावट खोलीतून हाकलून लावत असत. तेव्हा ते ५ वी/६ वित असतील,
    त्या वेळी ते रडत-रडत एका कोप-यात बसले, दुस-याच क्षणी रडू थांबवून निश्चय केला. एक ना एक दिवस मी ही अशी सजावट करेल की पूर्ण गांव महालक्ष्मी
    सजावट पहाण्यासाठी येईला आणी तसेच झाले. ही आयुष्यातली पहिली जिद्द
    I शालेय जीवनात असतांना एका वर्षी मांडीला मोठा गड्डा आला त्यावेळी जयक्रांति क्रिकेट टिमचे जिंकलेले पैसे जमले त्यातले पैसे सर्व मित्रांनी दिले आणी इलाज केला
    त्यात मुक्तेश्वरभाऊ धोंडगे,अनिल कुरुडे, प्रशांत रुमाले आदी मित्रांनी पुढाकार घेतला होता. नंतर १९८६-८७ ला डॉ.अरुण कुरुडे यांचे कडे त्यांनी कंपाउंडर म्हणुन नोकरी केली.
    भाई दत्तात्रयराव कुरुडे यांनी स्थापन केलेल्या कै.उल्हास कुरुडे सार्वजनिक वाचनालयात 30 रुपये महिना या मानधनावर ग्रंथालयात ग्रंथपाल पदी १९८८ ते १९९९ पर्यंत काम केले.
    ग्रंथालयात सेवा देत असताना दररोज वर्तमानपत्र डॉ भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या घरून आणावे लागत असे.
    त्यांच्या जीवनातली पहिली सुबक आरास १९९१ च्या गणेशोत्सवात पहिल्यांदाच मुक्तेश्वरभाऊ धोंडगे यांच्या पुढाकाराने म.बसवेश्वर गणेश मंडळ टावरच्या ईशान्य दिशेला
    मनोहर पेठकरच्या दुकानात नारळाच्या सालटा पासून श्रीफळाची निर्मिती केली. त्यात गणपती बसवला त्या समोर शांतीघाट बहाद्दरपुरा नेहरु बालोद्यानाची प्रतिकृती तयार केली
    येथे त्यांची व्दितीय जिद्द अक्टिव्ह करण्याची संधी मिळाली.
    १९९३ साली साक्षरता अभियानात स्वयंसेवक म्हणून काम केले. त्याचे प्रशिस्ती पत्र मिळाले. हे काम करत पदवीचे शिक्षण पुर्ण केले.
    पण हे सर्व करत असतांना त्यांच्या अंगी असलेल्या कलाकाराचा गुण यांबला नाही. १९९३ साली म. बसवेश्वर
    गणेश मंडळ बहाद्दरपुरा येथे देहू-आळंदी येथील नियोजित प्रवेशव्दाराची प्रतिकृती आरास साकार त्याच साली
    जयक्रांति बाल गणेश मंडळा पुढे हेमाडपंती मंदिर साकार श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार यासंस्थेच्या वतीने म उलिंग पेट्टी श्री सरस्वती-गणेश मंडळ व्दादशभुजा
    देवी मंदिर, सर्वलोकाश्रय मंडपात गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती, शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्य यांची विज्ञाननिष्ठ पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिक
    कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे ही पृथ्वीची आरास साकारली. पुढे त्यांची १६ जुन १९९४ साली श्री शिवाजी विद्यालय बारुळ या विद्यालयात ग्रंथपाल पदी
    नेमणूक झाली. विविध भितिपत्रके त्यात क्रांति मुक्ताई, सावित्रीदेवी, शब्दांमृत आत्मकथन हस्तलिखित अशी अनेक हस्तलिखिते विदयार्थ्याच्या साहित्यिक कला गुणांना वाव मिळावा
    यासाठी भितीपत्रके व हस्तलिखितं विविध कार्यक्रमाच्या औचित्याने प्रकाशित केली भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ५० वर्ष पुर्ण झाले त्यावेळी सुवर्ण महोत्सवाच्या
    श्रीगणेशा ही सजावट तयार केली, म.उर्लिंग पेद्दी श्री सरस्वती गणेश मंडळापुढे हुतात्मा स्मारकाची प्रतिकृती साकारून ज्यागावात हुतात्मा त्या गावी हुतात्मा स्मारक उभारण्यात
    यावे ही मागणी डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून साकारली

    १९९७ रोजी आदर्श गणेश मंडळ कंधार व लोहा येथील राष्ट्रीय एड्स नियंत्रण या स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम व्दितीय मिळाला.१९९८ साली उल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार
    अंतर्गत आदर्श गणेश मंडळ कंधार येथे पाणी आडवा पाणी जिरवा देखावा सादर. याच वर्षी १५ ऑगस्ट १९९८ साली गावात रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले.
    आदर्श गणेश मंडळ कंधार येथील गणेश मंडळा समोर व्यसन मुक्तीचा देखावा तयार केला. १९९९ साली बारदाण्या पासून किल्ला निर्माण करुन त्यात कालिया मर्दन करणारा
    श्री गणेश साकार करतांना भ्रष्टाचार, वर्णद्वेष, जातिभेद, अस्पृश्यता, व्यसनाधिनता, दहशतवाद याचे मर्दन करणारा गणेश साकारला, डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या आलेल्या
    वर्तमानपत्रातल्या बातम्यांचे कात्रण जमा करून शिवजयंती, म. बसवेश्वर जयंती व व्दादशभुजा देवी यात्रा महोत्सवानिमित्य समाजमंदिरामधे मुक्ताई कला दालन प्रदर्शन साकारले
    १९९९च्या भारत-पाकिस्तान कारगील युद्धात भारतीय शूर जवानांची कारगील युद्धात बजावलेल्या कामगिरीवर वर्तमानपत्र व मासिक साप्ताहिकात आलेल्या ९०० छायाचित्र कारणाये
    कारगिल विजय दिन हा प्रदर्शनी हॉल, बहाद्दरपुरा, फुलवळ आणि गुराखीगड या ठिकाणी प्रदर्शन भरवून तरुणांना देशसेवेसाठी प्रवृत केले. २००० साली चंदन तस्कर विरप्पनने
    अभिनेता राजकुमार यांचे अपहरण केले होते, त्यावर देखाव्यात तामिळनाडू व आंध्रप्रदेश या दोन राज्यांना विरप्पन दरवेशी बनून आपल्या तालावर कसा नाचवतोय हा देखावा
    प्रेक्षकवर्गाना खुप भावला. २००१ या साली के उल्हास मेमोरियल ट्रस्ट अंतर्गत आदर्श गणेश मंडळ कंधार येथे प्रदुषणाचा भस्मासुर हा देखावा कंधार शहरात गाजला.
    २००२ साली गुजरात दंगलीवर कॅन्सरग्रस्त भारत माता हा देखावा सादर करतांना भलामोठा खेकडा भारत मातेला चावतोय आणी त्यावेळी भारत मातेच्या डोक्यातून अश्रू लाईव
    ओघळत आहेत हा देखावा सादर केला. २००४ साली मौजे गऊळ ता. कंधार येथे फुटका हनुमान होता, त्यास अक्षयतृतियाच्या शुभमुहूर्तावर भाई पीडगे साहेब यांच्या संकल्पनेतून
    घड हनुमान शिळावर कोरून साकार. २००५ व २००६ या सलग दोन वर्षी आकाशवाणी वर प्रसारित झाली
    महाराष्ट्रात कधी न झालेला शालेय उपक्रम म्हणजे ज्ञानमाता मातोश्री मुक्ताई घोडगे यांच्या २०१० साली झालेल्या पुण्यतिथी कार्यक्रमात चक्क विद्यार्थ्यांनी १२ भारतीय भाषेत चरित्रात्मक
    भाषणे एका मराठी शाळेत करन इतिहास घडविला. बहाद्दरपुरा ता. कंधार या नगरीत विविध सण-उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम करतांना विविध आरास
    कलापथकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. क्रांतिटावर भोवती दिड क्विंटल पिठाची रांगोळी साकार, अण्णा हजारे यांची व्यक्तिरेखा साकारतांना सत्याग्रहाचा जिवंत देखावा
    श्री संत सावता माजी गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीत. तेव्हा पासून त्यांच्या कविमनाचा वाढदिवस 6 सप्टेंबर रोजी साजरा होतो.
    अशी कितीतरी लक्षवेधक आरास तयार करून कलेची छाप गावावर पडली. हस्तकलेतून निर्माण कलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, अलंकारिक गणेशाचे चित्र प्रदर्शन या अशा विविध
    प्रदर्शनानी गुराखी साहित्य संमेलनाची शोभा वाढवून संत तुकाराम महाराज गोरक्षनाथ महाराज सेवालाल महाराज, शिवाजी महाराज गाडगे महाराज, उर्लिंगपेट्टी महाराज,
    संत निवृती महाराज बसवेश्वर महाराज म.फुले जिजाऊ माँसाहेब छ. संभाजी महाराज वीर नगोजी नाईक संत रोहिदास महाराज यांच्या सहित अनेक
    जवळपास ३०-३५ सिमेंट- रांगोळीचे माध्यम वापरून पुतळे निर्माण केले. आमचे प्रेरणास्त्रोत संयोजक डॉ भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या संकल्पनेतून योग्य त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली.

    ड्रा .ए .पी .जे .अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणदिन दिन म्हणून साजरी केली त्यावेळेस मुख्यमंत्रीचे अभिनंदन करतांना १०१ पोस्टकार्ड विद्याथ्र्यांनी लिहून मुख्यमंत्री
    महाराष्ट्र राज्य विधानभुवन मुंबई या पत्यावर पाठवणारी पहिली शाळा ठरली. तेथेही मितिपत्रके आणि हस्तलिखिते विद्यार्थ्याकरवी करुन घेतले त्या कालखंडात खंदारी वात्रटिका २०००
    व “मन्याडी फणका १०० कंधारी आग्याबोड ५०० “शब्दबिंब ३०० आणि बोलकं शल्य, आत्मकथन, यंदा देशभक्तीमय उपक्रमाला सलग ९ वर्ष पुर्ण झाली. कोरोना काळात ही देशभक्तीचा
    जागर सुरुच राहिला त्यामुळे दरवर्षीच शालेय भगिनींसाठी शालेय रसद म्हणजे वही, पेन, पेन्सिल,रबर शापनर आदी साहित्य भेट स्वरुपात येतात सुंदर अक्षर कार्यशाळेस आभार पोहचतात.
    तसेच सैनिकांनी देखील भाऊ ओवाळणी म्हणून वॉटर प्युरिफायर भेट दिली
    श्री शिवाजी हायस्कूल कंधार येथे २०१७ या वर्षी बदली झाली कंधार येथील हायस्कूल मध्ये मातोश्री मुक्ताई धोंडगे यांची आत्मकथनातून व्यक्तीरेखा साकारण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकवर्षी
    मार्गदर्शन केले. प्रत्यक्षात मातोश्री मुक्ताई स्वगत विद्यार्थ्यीनी कडून करवून घेतले
    व्हॅलेन्टाईन दिन प्रत्येक वृक्षांना गुलाबपुष्प देवून सत्काररूपी अनोखा दिवस साजरा केला तर रक्षाबंधना निमित्त शाळेतील वृक्षांना राख्या बांधुन पर्यावरण रक्षणाचे साकडे घालत रक्षाबंधन
    साजरा करण्यात आला. हस्तकलेतून मयुर, फुलदाणी, वाघाचे शिल्प, अनेक काष्ठशिल्प, चित्रे, कल्पक अक्षरालय चित्र प्रदर्शन म्हणजेच सुत्रसंचलन, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला,
    भाषण कला, व्यक्तीमत्व विकास, रांगोळी, लेखन कला, विद्याथ्र्यांत
    कंधार येथील वैकुंठ धाम स्मशान भूमीत दिवे लावून दिवाळी साजरी केली त्यांना, विविध कलेमुळे त्यांना आज पर्यत “समाजभूषण “दिव्यांग रत्न मन्याड़ भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
    कंधार येथील स्मशानभूमीत दिवाळी साजरी करतांना सुत्रसंचलन ववृक्तत्वात निष्णात करण्याचा छंदच आहे. दिव्यांग पणाचा बाऊ न करता सदा उत्साहाने आनंदीत राहात मस्क्यूलर डिस्ट्रॉपी
    या जिवघेण्या आजारासोबत जीवन जगतांना कधीही अपंग असल्याची खंत त्यांना कधी जाणवली नाही. त्यांच्या वाटचालीचे प्रेरणास्त्रोत डॉ. भाई केशवराव धोंडगे साहेब, माजी आमदार
    भाई गुरुनाथराव कुरुडे, आई-कुसूमबाई, वडील गोपाळराव मित्र स्वतः (डॉ. डोम्पले) भाई दताजयराव कुरुडे, अँड मुक्तेश्वरराव घोंडगे प्रा. डॉ.भाई पुरुषोत्तमराव धोंडगे,
    पेंटर सावळाम कुरुडे आणि दत्तात्रयाची पत्नी सौ. संगीता, मुलगा दृष्टांत, मुलगी कु.दृष्टी बंधु संजय एमेकर व बालाजी एमेकर व बहिण सौ. अनिता गरुडकर या सर्वाचे
    वेळोवेळी सहकार्य लाभले. आश्या सामाजिक प्रश्नांची जाण असणारया या कलावंतास संकल्प टूडे चा मानाचा मुजरा जय क्रांती

    Post Views: 290
    raksha bandhan
    Add A Comment

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024580 Views

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024926 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024885 Views

    Tirupati Latest News तिरुपति बालाजी मंदिरा मध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत?

    September 25, 2024172 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024366 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024580 Views

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024926 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024885 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    150625
    Views Today : 1591
    Who's Online : 2
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.