महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी
आपल्या पक्ष सदस्याचा राजीनामा दिला आहे मागील काही दिवसापासून
अशोकराव चव्हाण हे काँग्रेस नेतृत्वावर नाराज आहेत अशा प्रकारच्या चर्चा होत्या
त्यामुळे अशोकराव चव्हाण राजीनामा देणार हे राजकीय वर्तुळात निश्चित मानला
जात होतं आज त्यांनी आपल्या पक्ष सदस्याचा राजीनामा नाना पटोले यांच्याकडे दिला आहे
अशी माहिती मिळत आहे
मागील काही वर्षांपासून पहिले शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस
मधून अजित पवार यांचा गट बाहेर पडला पण काँग्रेसची मात्र पडझड झाली
नव्हती पण आता मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसचे मोठे नेते अशोकराव चव्हाण यांनीच
आपल्या पक्ष सदस्यता चा व आमदारकीचा दोन्ही राजीनामा दिला आहे त्यामुळे
हा काँग्रेसला फार मोठा धक्का आहे