आज पासून प्रयागराज येथे महा कुंभ मेळावा (Mahakumbha mela) 2025 ची सुरुवात होणार आहे यामध्ये 40 कोटीच्या आसपास भक्त प्रयागराज येथे कुंभमेलयाला (Mahakumbha mela) येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे कुंभ मेळा (Mahakumbha mela) नेमका का भरवला जातो याच्यामागे काय कारण आहेत ते आपण पाहूया
हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव म्हणून कुंभमेळ्याकडे पाहिले जाते हा कुंभ मेळा (Mahakumbha mela) दर बारा वर्षांनी भारतातील वेगवेगळ्या चार ठिकाणी भरवला जातो ही चार ठिकाणी आहेत
१)प्रयागराज २)हरिद्वार ३)नाशिक ४)उज्जैन ही ती चार ठिकाणी आहे ज्या ठिकाणी कुंभ मेळा (Mahakumbha mela)भरतो कुंभ मेळा (Mahakumbha mela)का भरवला जातो याविषयी पुरातनामध्ये दोन कथांचा मुख्यता उल्लेख आढळतो व या दोन कथांचा संबंध कुठून कुठ अमृत कलशाशी निगडित आहे वरील चार ठिकाणी अमृताचे काही थेंब तेथील नद्यांमध्ये पडल्यात त्यामुळे या ठिकाणी स्नानाला फार मोठे महत्त्व आहे

गरुड देवता व सर्पाची कथा (The story of the eagle god and the serpent)
पुरातनामध्ये असलेल्या या कथेचा संबंध कुंभमेळ्याची आहे तपस्वी ऋषी कश्यप यांच्या दोन पत्नी होत्या त्या दोघी सख्ख्या बहिणी होत्या एकीचे नाव कद्रू दुसरीचे नाव विनता होते या दोघीं समवेत गुरु आश्रमात वास्तव्यास होते एकदा कद्रू ने ऋषी कश्यप यांच्याकडे एक वर मागितला आणि तो वर कश्यप ऋषीने त्यांना दिला यामध्ये कद्रू यांनी मला शंभर अति विषारी मुलं व्हावीत असा वर मागितला ऋषि कश्यप यांनी तथास्तु म्हटलं आणि कद्रू हिला शंभर अंडी दिली व सांगितले की या अंड्यांमधून 100 अति विषारी मुलांचा जन्म होईल
कद्रू हिला दिलेले वरदान पाहून विणता हिने सुद्धा ऋषि कश्यप यांच्याकडे मला पण कद्रू च्या मुलापेक्षाही शक्तिशाली मूल जन्माला यावे असे वरदान मागितले ऋषि कश्यप यांनी सुद्धा विनता तथास्तु असं म्हटलं व तिला दोन मोठी अंडी दिली कालांतराने कद्रूला दिलेल्या अंडी मधून विषारी सापांचा जन्म झाला म्हणून आजही सापांची आई म्हणून कद्रू यांचाच उल्लेख मिळतो कद्दूला जन्माला आलेली मुल पाहून विनता च्या मनामध्ये आपल्याला कधी मूल होईल याविषयी उत्सुकता तयार झाली व या उत्सुकते पोटी विनताने दोन अंड्या पैकी एक अविकसित अंड फोडलं त्यामधून पक्षाचे तोंड व मानवाचा देह असलेला मुलगा जन्माला आला व तो उंच आकाशात लागला काही वेळाने तो जमिनीवर आला व आईला म्हणाला की जो अन्याय तू माझ्यासोबत केली माझा अंड्यातील काळ पूर्ण होण्याच्या आधी तुम्हाला बाहेर काढलं तशी चूक आता तू दुसऱ्या अंड्यासोबत करू नको त्या मुलाचे नाव होते अरुण अरुण हाच पुढे सूर्य देवाचा सारथी झाला आज आपण सूर्य देवाचे चित्र पहात असताना सात घोडे चालवणारा सारथी हाच तो अरुण

नंतर कालांतराने विनताला दिलेले दुसरे अंडे फुटले व त्या अंड्यामधून गरुडांचा जन्म झाला शरीर मानवाचे तर फक्त मुंडक हे पक्षाचे गरुड हे प्रचंड शक्तिशाली होते त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी पाहिले की त्यांची आई कद्रू आणि तिचे शंभर मुले म्हणजे साप यांची दासी झाली होती हे पाहून गरुडाला प्रचंड राग आला त्यांनी कद्रू व तिच्या मुलांना आपल्या आईला दासीत्वामधून मुक्त करण्यासाठी काय पाहिजे ते विचारले तर कद्रू आणि सापांनी आम्हाला वैकुंठा मधून अमृत आणून दे त्यानंतर आम्ही तुझ्या आईला दासित्वामधून मुक्त करतो असे वचन दिले गरुड वैकुंठाला गेले व त्यांनी तेथील अमृत कलश उचलून ते पृथ्वीकडे वापस निघाले यादरम्यान सर्व देवांनी गरुडांना थांबविण्याचा प्रयत्न केला पण गरुड हे महा शक्तिशाली होते त्यांनी त्या सर्वांचा पराभव केला नंतर सर्व देवगन हे भगवान विष्णूकडे गेले व त्यांना सर्व वृत्तांत सांगितला भगवान विष्णू स्वतः गरुडाशी युद्ध करण्यासाठी आले आणि गरुड आणि भगवान विष्णू मध्ये युद्ध सुरू झाले पण या युद्धाच्या दरम्यान गरुड अमृतकलशां मधील अमृत पीत नव्हता तर फक्त हातात धरलेले होते
हे हि वाचा-MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
यावर भगवान विष्णूनी गरुडाला प्रश्न विचारला की तू हे अमृत पीत का नाहीयेस तेव्हा गरुड आणि सर्व हकीकत भगवान विष्णूंना सांगितली त्यावर भगवान विष्णूंनी सांगितले की तू हा अमृत कलश घेऊन पृथ्वीवर जा पण हा अमृत कलश पृथ्वीवर ठेवल्यानंतर तू माझा वाहन होशील गरुडाने सुद्धा ते मान्य केले गरुड तो अमृत कलश घेऊन कद्रूसमोर आला व त्याने तो कलश जमिनीवर ठेवला त्याच वेळेला भगवान विष्णू ने मायेने तो अमृत कलश तिथून गायब केला गरुडाने कदुरा दिले वचन पूर्ण झाले होते त्यामुळे कडू ने त्याच्या आईला दासीत्वामधून मुक्त केले पुढे आज गरुड भगवान विष्णू यांचे वाहन झाला तर गरुड आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये झालेल्या युद्धाच्या दरम्यान अमृताचे काही थेंब हे चार ठिकाणी पडले हे चार ठिकाणच म्हणजे जेथेकुंभ मेळा (Mahakumbha mela)भरतो
हे हि वाचा-केंद्र सरकारचा जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा पाच लाख पर्यंत मिळणार मोफत इलाज
समुद्रमंथनाची कथा (The story of sea churning)
देवगन आणि राक्षसगण यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन चालू केले यासाठी भगवान विष्णू यांनी ज्या पर्वताच्या साह्याने समुद्रमंथन केले जाणार होते तो पर्वत स्वतःच्या पाठीवर घेतला तोच हा भगवान विष्णू यांचा कृम अवतार समुद्रमंथन सुरू झाले व 14 रत्न यामधून निघाले यामध्ये महाभयंकर विष देखील निघाले ते विष भगवान शंकराने प्राशन केले म्हणून भगवान शंकरांना नीलकंठ असे देखील म्हटले जाते हे समुद्रमंथन करण्यासाठी दोरी म्हणून वसुकी नागाचा उपयोग केला गेला होता सगळ्यात शेवटी समुद्रमंथनामधून भगवान धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन बाहेर आले त्यावेळी देव आणि दानव या दोघांमध्ये तो अमृत कलश घेण्यासाठी झटापटी होऊ लागल्या यामध्ये देवांनी तो अमृत कलश पळवला व जाणव त्यांचा पाठलाग करू लागले या सर्व घडामोडींमध्ये बारा दिवसाचा कालावधी लागला हे बारा दिवस म्हणजे बारा वर्षे होते त्यामुळेच कुंभ मेळा (Mahakumbha mela)हा प्रत्येक बारा वर्षांनी होतो
याच दरम्यान देवांनी तो अमृत कलश हा चार ठिकाणी ठेवला होता व ते चार ठिकाण म्हणजे जेथे आज दर बारा वर्षांनीकुंभ मेळा (Mahakumbha mela)भरविला जातो
वरील दोन कथा या कुंभमेळ्या (Mahakumbha mela)संदर्भात हिंदू धर्मग्रंथांमध्ये सापडतात 2025 चाकुंभ मेळा (Mahakumbha mela)हा उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे भरणार आहे यासाठी साधुसंत आखाड्यांचे प्रमुख व महामंडलेश्वर हे सर्व ऋषी हे प्रयागराज येथे दाखल झाले असून उद्या म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीला पहिले शाही स्नान संपन्न होईल शाही स्नानाला राजयोग स्नान असेही म्हटले जाते शाही स्नानासंदर्भात सुद्धा काही नियम आहेत

यामध्ये सर्वात आधी नागा साधू हे शाही स्नान करतात त्यानंतर शाही स्नान करण्याचा दुसरा मान हा संत समाजाला असतो व त्यानंतरच गृहस्थ आश्रमात म्हणजेच सामान्य व्यक्तींना सुद्धा नाही स्नान त्यानंतर करता येते शाही स्नान हे कधीही साधारण मानवाने नागा साधू किंवा संत समाजाच्या आधी करू नये तसेच महा कुंभमेळ्याच्या दरम्यान स्नान करत असताना साबण शाम्पू या गोष्टी वापरता येत नाहीत या कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा या खालील प्रमाणे आहेत 13 जानेवारी त्यानंतर दुसरे शाही स्नान 14 जानेवारी त्यानंतरच्या स्नानाची तारीख 29 जानेवारी त्यानंतर 3 फेब्रुवारी आणि शेवटचे साई स्थान हे 26 फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी होईल व यात नंतर कुंभमेळाची(Mahakumbha mela) सांगता होईल
या वरील दोन कथा या कुंभमेळ्याच्या(Mahakumbha mela) संदर्भात सांगितल्या जातातकुंभ मेळा (Mahakumbha mela)का साजरा केला जातो तो दर बारा वर्षांनी का साजरा केला जातो याविषयी आपल्या मनात असलेल्या प्रश्नांना उत्तर निश्चित मिळाले असेल
कुंभमेळ्याचा(Mahakumbha mela) उल्लेख हा जगातील सर्वात मोठा मेळावा की ज्यामध्ये करोडो भक्त हे स्नानासाठी कुंभमेळ्याच्या ठिकाणी येतात एवढी गर्दी एका जागी दुसऱ्या कुठल्याही आयोजनामध्ये पाहायला मिळत नाही ही खरोखरच आपल्याला गौरवास्पद गोष्ट आहे आपणा सर्वांना संकल्प टुडे च्या वतीने कुंभमेळ्याच्या (Mahakumbha mela) हार्दिक शुभेच्छा