अंतरवाली सराटी -मराठा बांधवांनी स्वतःच ठरवावं की कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचे मी लोकसभे साठी उमेदवार देणार नाही अशी घोषणा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज केली
काही दिवसापूर्वी प्रत्येक मतदारसंघांमध्ये आपण एक उमेदवार मराठा बांधवांची चर्चा करून देऊ अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती त्यानंतर घडामोडींना वेग आला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशजी आंबेडकर व वसंत मोरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली पण आपण आपला निर्णय हा 30 तारखेला सांगू असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपण लोकसभेला उमेदवार देणार नाही तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा असे सांगितले पहावं लागेल मराठा समाज आता काय निर्णय घेतो