लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पार्टीला(BJP) चांगली गळती लागलेली दिसत आहे कारण
मागील काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते हे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहे थोडक्यात
सांगायचं तर भारतीय जनता पार्टी मधून आउटगोइंग सुरू झाली तर सर्वात जास्त इन्कमिंग ही शरद पवार
(Sharad Pawar)यांच्या गटात चालू आहे असं काय होत आहे?
लोकसभेच्या आधी भाजपात इन्कमिंग चालू होती
लोकसभेच्या आधी अनेक बड्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाणे पसंत केले. यामध्ये सर्वात मोठे नाव
राहिले ते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे लोकसभेच्या आधी भाजपाचे(BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना तुमच्या जिल्ह्यातील छोटे पक्षामधील कार्यकर्ते भाजपामध्ये घ्या
व छोटे पक्ष संपून टाका असे आव्हान त्यांनी कार्यकर्त्यांना केले पण आता मात्र उलटे वारे वाहत आहेत आता
भारतीय जनता पार्टी सोडून जाण्यामध्ये अनेक मोठे नेते आहेत मागील दोन अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली
राजकीय उलथापालक एकनाथराव शिंदे व अजितदादा पवार यांचा बंड व परत एकदा भारतीय जनता पार्टी
सत्तेत येणे अशी काही समीकरणे ही लोकसभेच्या आधी जुळून आली
भारतीयजनता पार्टीला मोठी खिंडार
राजकारणामध्ये प्रत्येकाची दिवस येतात हेच शाश्वत सत्य आहे कारण लोकसभेच्या आधी सुरू जरी
भारतीय जनता पार्टी मधील इन्कमिंग लोकसभेनंतर मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये आउटगोइंग मोठ्या प्रमाणात
सुरू झालेली आहे यामध्ये प्रामुख्याने दोन वेळा आमदार राहिलेले सुधाकर भालेराव यांनी शरद पवार
(Sharad Pawar)गटामध्ये प्रवेश केला तर यानंतर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील व माजी मंत्री माधवराव किन्हाळकर
यांनी सुद्धा घर वापसी करणे योग्य समजले तेही शरद पवार(Sharad Pawar) गटांमध्ये सामील झाले
आता सध्या समरजीत घाडगे,हर्षवर्धन पाटील,मधुकर पिचड,
बबनराव पाचपुते.वैभव पिचड,व संजय सावकारे यांसारखे मोठे नेते हे शरद पवार(Sharad Pawar) गटामध्ये
सामील होणार अशी जोरदार चर्चा आहे यातल्या काही जणांनी शरद पवार(Sharad Pawar) यांची भेट देखील
घेतली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठी खिंडार पडू शकते व अनेक देवेंद्र फडणवीस
यांची विश्वासू व अनेक बडे नेते हे महाविकास आघाडी मधील घटक पक्षांमध्ये जाऊ शकतात याच्यामागे काही कारण
आहेत ते पाहूया
महायुती मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असलेले नेते
विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी(BJP) व शिवसेना यांची युती होती आणि या वेळेला
जागा वाटपासाठी रस्सीखेच झाली नसल्याचे पाहायला मिळाले. पण आता मात्र महायुतीमध्ये आणखीन दोन मोठ्या
पक्षांची भरती झालेली आहे त्यामुळे जेव्हा ही तीन पक्षाची मंडळी जागावाटपासाठी बैठका करतील तेव्हा आपला मतदार
संघ हा दुसऱ्या कोणाच्या वाटेला जातो की काय अशी भीती भारतीय जनता पार्टीच्या(BJP) कार्यकर्त्यांमध्ये आहे ही एक
प्रमुख कारण आहे की यामुळे भारतीय जनता पार्टी(BJP) मधील नेते हे दुसऱ्या पार्टीत जात आहे स्वतःच राजकीय अस्तित्व
जर सिद्ध करायचं असेल तर विधानसभेची निवडणूक लढविणे जरुरी आहे असा विचार करणाऱ्या नेत्यांची संख्या
यामध्ये जास्त आहे एकाच मतदारसंघांमध्ये महायुतीतील तिन्ही जगात पक्षांचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात आहेत
व प्रत्येकाची इच्छा आहे की आपल्या पक्षाच्या नेत्याला उमेदवारी मिळावी पण महायुतीमध्ये त्यांना हे अशक्य वाटतं
ते भारतीय जनता पार्टी व महायुतीला सोडून महाविकास आघाडीकडे जात आहे
भाजपाकडे(BJP) 102 आमदार आहेत व महायुतीमध्ये ज्या जागी आमदार आहेत त्या जगात या पक्षाला सोडण्याचा
निर्णय झालेला आहे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी(BJP) शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांची गोळा बेरीज
केल्यास 202 जागा या सध्या महायुतीकडे आहेत आता वाटाघाटी करण्यासाठी फक्त 86 जागा शिल्लक आहेत त्यामुळे
सुद्धा आपल्याला उमेदवारी भेटण्याची शक्यता कमी असल्यामुळे मोठे नेते हे दुसऱ्या पक्षा कडे वळत आहेत
लोकसभेला शरद पवार गटाचा अभूतपूर्व विजय
लोकसभेला दहा जागा लढवून शरद पवार(Sharad Pawar) गटाने तब्बल आठ जागी विजयी संपादित केला बदल
जागांमध्ये सुतारी या पक्षचनाशी साम्य असलेले ड्रमपेठ ला पडलेल्या मतामुळे उर्वरित दोन जागी महायुतीचे उमेदवार
निवडून आले त्यामुळेच शरद पवार(Sharad Pawar) गटाचा स्ट्राइक रेट बघून ही मंडळी शरद पवार(Sharad Pawar)
गटामध्ये सामील होण्यास इच्छुक आहेत यातलं दुसरं कारण म्हणजे की जे नेते हे भारतीय जनता पार्टीला सोडून महाविकास
आघाडी त्यातल्या त्यात शरद पवार(Sharad Pawar) गटाकडे येण्यासाठी इच्छुक आहेत यातले बहुतांश नेते हे काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून पक्ष सोडून गेलेले आहेत मोदी लाटे मध्ये आपले राजकीय भवितव्य टिकेल की नाही या
भीतीने त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पण एवढे करून देखील उमेदवारी
आपल्याला भेटत नाही यामुळे सुद्धा पक्षामध्ये पक्ष सोडून देण्याची संख्या मोठी आहे
2019 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जो पण आमदार विजयी झाले होते पण पुढे अजित दादा पवार यांच्या
बंडारानंतर 42 आमदार हे अजित दादा पवार यांच्यासोबत गेले तर बारा आमदार हे शरद पवार(Sharad Pawar)
यांच्याकडे राहिले पण शरद पवार(Sharad Pawar) यांनी केलेले वक्तव्य यापुढे तरुणांना संधी दिली जाईल असे वक्तव्य
केले त्यामुळेच अनेक दिग्गज नेते हे महायुती मधून शरद पवार(Sharad Pawar) गटामध्ये सामील होण्यास इच्छुक आहेत
अजित दादा पवार हे महायुतीत आल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवी संघ यांच्यासहित अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते हे नाराज होते
यात प्रामुख्याने संघाचे मुखपत्र ऑर्गनायझर या मुखपत्रांमध्ये अजित दादा पवार यांना महायुती घेतल्यामुळे लोकसभेला फटका
बसला अशी नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच अजित दादा पवार यांच्यावर असलेले आरोप हे भारतीय जनता पार्टीने
केलेले होते त्यामुळे आता त्यांच्यासोबतच मंत्रिमंडळात कसे काम करायचे यामुळे सुद्धा अनेक नेते नाराज होते एकनाथराव शिंदे
यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीने जेव्हा सत्ता स्थापन केली भारतीय जनता पार्टी व शिवसेना मिळवून भाऊ मताचा
आकडा त्यांना अगदी सहज गाठता आला पण यानंतर गरज नसताना राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेण्याचा निर्णय
भारतीय जनता पार्टीच्या काही बड्या नेत्यांना आवडला नाही त्यामुळे हे नाराज असलेल्या नेत्यांनी दुसरी वाट धरण्याचा निर्णय
घेतला त्याचाही फटका खूप मोठा महायुतीला बसताना आता दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केलेले
गंभीर आरोप या आरोपानंतर नवाब मलिक यांना झालेली अटक सध्या नवाब मलिक हे वैद्यकीय जामीनावर कारागृहाच्या बाहेर
आहेत व मागील अधिवेशनामध्ये ते सत्ताधारी बाकावर येऊन बसले त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी आता नवाब मलिक तुम्हाला
चालतात का असा प्रश्न विचारला यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित दादा पवार यांना एक पत्र लिहून नवाब मलिक यांच्या
विषयी काही मागण्या केल्या पण अजित दादा पवार यांनी या मागण्यांना केराची टोपली दाखवली आता नवाब मलिक हे
अजित दादा पवार यांच्या सर्व कार्यक्रमांमध्ये दिसत आहेत त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतदार नाराज होईल अशी भीती
काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे हे सुद्धा एक कारण आहे
मोदी लाटेच्या भरोशावर अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस रामराम करत
भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला पण तेथे त्यांना फारसे मोठे राजकीय यश आले नाही त्यांनी सुद्धा आपल्या स्वग्रही जाण्याचा
निर्णय घेतलेला आहे
आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी नेमके किती लोक हे भारतीय जनता पार्टी व महायुतीला सोडून महाविकास आघाडीमध्ये
सामील होतील हे आता पहाव लागेल व पक्षाला लागलेली ही गळती देवेंद्र फडवणीस कशा पद्धतीने हाताळतात की ही आता पाव
लागेल पण एकंदरीत सध्याची राजकीय परिस्थिती बघता भारतीय जनता पार्टीला लागली कळ ती व शरद पवार गटांमध्ये सुरू
झाली भरती असेच म्हणावे लागेल
Recent News
भाजपामध्ये आउटगोइंग जोरात तर शरद पवार गटात इनकमिंग जोरात
अनेक बडे नेते भाजपा सोडून शरद पवार गटाकडे जाण्यास इच्छुक?