सध्या सोशल मीडियावर एका आय ड्रॉप ची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे या आय ड्रॉप मुळे चष्मा लागलेल्या व्यक्तींना चष्म्यापासून मुक्तता मिळू शकते नेमका हा आयड्रोप कोणता आहे व तो काम कसा करतो खरंच हा ड्रॉप टाकल्यानंतर डोळ्याला चष्म्याशिवाय दिसू शकते का व या ड्रॉप वर नेत्र तज्ञांचे म्हणणे काय आहे?आणि हा ड्रॉप बाजारामध्ये कधी येईल व त्याची किंमत किती असेल याबाबतची सविस्तर माहिती आपण घेऊया
मोबाईलची क्रांती झाली जवळपास प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आले आणि लॅपटॉप कॉम्प्युटर या गोष्टींमुळे डोळ्यांच्या समस्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे मागील काही वर्षांमध्ये पाहायला मिळत आहे आणि डोळ्यांचे डॉक्टर यामागे कारण सांगतात ते अँड्रॉइड मोबाईल मुळे डोळे वरचेवर कमजोर होत आहेत कारण मोबाईल पाहण्याचे प्रमाण हे भारतीयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागील काही वर्षांमध्ये वाढले आहे याला आपण शास्त्रीय भाषेत बोलायचं तर याला स्क्रीन टाइम असं म्हणतात म्हणजे कसं किती वेळ आपण अँड्रॉइड मोबाईल पाहतो याला स्क्रीन टाईम असे म्हणतात आणि हा स्क्रीन टाईम भारतातील जनतेचा वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये डोळ्याच्या समस्या ह्या अगदी लहान वयापासून सुरू झालेल्या आहेत
पूर्वी सहसा चाळीशीच्या नंतर डोळ्यांच्या समस्या सुरू व्हायच्या पण आपण सध्या स्थितीला पाहायला गेलो तर अगदी तीन वर्षाच्या मुलांपासून डोळ्याच्या समस्या वाढण्याचे प्रमाण वाढले आहे अगदी आपण एखाद्या शाळेच्या बाहेर थांबलो तर दहा टक्के मुलांच्या डोळ्याला चष्मा लागलेला आहे यामध्ये अँड्रॉइड मोबाईल सोबतच जीवनशैलीमध्ये झालेला मोठा बदल खाण्यामधील पोषक तत्त्वची कमतरता यामुळे देखील डोळ्यांच्या समस्येचे मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे अनेकांच्या डोळ्याला चष्मे दिसत आहेत तर काही लोकांना ज्यांना चष्मा घालने पसंत नाही पसंत नाही त्यांनी कॉन्टॅक्ट लेन्स सारखे पर्याय वापरायला सुरुवात केली आहे पण या कॉन्टॅक्टलेन्स मुळे सुद्धा आपल्या डोळ्यावर विपरीत परिणाम होतात
पण आता आपल्या देशातील एका औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीने असा दावा केला आहे की जर त्यांनी तयार केलेला ड्रॉप जर डोळ्यात टाकला तर अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला चष्म्याची गरज राहणार नाही असा दावा एका कंपनीने केलेला आहे आणि त्यानंतर सगळीकडे एकच चर्चा ही या ड्रॉप बाबतीत सुरू झालेली आहे
हा ड्रॉप कोणता आहे(What is this drop?)
प्रेस्वू नावाचा एक ड्रॉप पुण्यामध्ये असलेल्या औषध निर्मिती कंपनी एंटोड फार्मासिटिकल कंपनी मुंबई यांनी हा ड्रॉप तयार केलेला आहे व हा ड्रॉप बनवलेला आहे मराठमोळ्या निखिल मसुरकर व किशोर मसुरकर यांचीही कंपनी आहे मागील काही वर्ष संशोधन करून या मसुरकर बंधूंनी हा ड्रॉप तयार केला आहे हा ड्रॉप येण्यापूर्वी डोळ्यात टाकायचे सर्व ड्रॉप हे प्रेस्वू या ड्रॉप प्रमाणे काम करत नव्हते आपल्याला डोळ्यातील इन्फेक्शन घालवणे व डोळे पाणीदार ठेवणे यासाठी काही ड्रॉप चा उपयोग आपण करत होतो पण ड्रॉप टाकल्यावर जवळचे स्पष्ट दिसायला लागेल अशा प्रकारचा कोणताही क्रॉप बाजारात उपलब्ध नव्हता पण आता प्रेस्वू च्या रूपामध्ये आपल्याला चष्म्यापासून मुक्ती मिळणार आहे
हा ड्रॉप काम कसं करतो(How does this drop work?)
जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं शरीरामधील भाग एक कमजोर व्हायला लागतात त्याप्रमाणेच आपले डोळे देखील कमजोर व्हायला लागतात आणि डोळे व्यवस्थित रहावेत यासाठी सकस आहाराची गरज असते पण मागील अनेक वर्षापासून खाण्यामधली पौष्टिकता ही कमी झाली त्यामुळे विविध आजारांप्रमाणेच डोळ्यांचे आजार देखील वाढलेले आहेत विशेषता चाळीशीच्या नंतर प्रेसबायोपिया हा आजार होतो हा आजार वयाशी संबंधित आजार आहे चाळीशी नंतर हळूहळू आपल्या डोळ्याची क्षमता कमी व्हायला लागते यालाच प्रेसबायोपिया असे म्हणतात
यामध्ये जवळच्या गोष्टी बघण्यासाठी त्रास होतो किंवा त्या व्यवस्थित दिसत नाहीत मग यानंतर आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर ते जवळचा नंबर असलेला चष्मा देतात आणि आपण तो चष्मा वापरायला लागतो कधी कधी व्यवस्थित काळजी घेतली तर या चष्मा चा नंबर देखील कमी होऊ शकतो पण असे होताना दिसत नाही वरचेवर वय वाढेल तसे नंबर सुद्धा वाढत जातात प्रेसबायोपिया या रोगामुळे अंदाजा जगभरात 200 कोटी लोक हे प्रभावित झालेले आहेत
पण प्रेस्वू आय ड्रॉप मुळे या समस्येपासून मुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सदरील ड्रॉप ला ड्रग्जकंन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि सेंट्रल ड्रग्ज स्ैंडर्ड कंन्ट्रोलऑर्गनायझेशनच्या कमिटीनं यांनी मान्यता दिलेली आहे मान्यता दिल्यानंतर याचे उत्पादन सुरू झालेले आहे
हा ड्रॉप पायलोकापिंन कंटेंट पासून बनवलेला आहे सदरील हे पायलोकापिंन कंटेंट हे मागील 70 वर्षापासून डोळ्याचे ड्रॉप बनवणाऱ्या औषधांमध्ये वापरले जाते पायलोकापिंन हे कंटेंट पायलोकार्पस इंडिकस या झाडापासून तयार केले जाते पूर्वी हे औषध काच बिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना वापरण्यात येत होते पायलोकापिंन या कंटेंटमुळे डोळ्याची बाहुलीचा आकार लहान होऊन स्पष्ट दिसायला लागते व याचा प्रभाव हा सहा ते सात तास राहू शकतो म्हणजे सहा तास आपल्याला चष्मा लावायची गरज लागत नाही व चार-पाच तासानंतर परत एकदा ड्रॉप टाकल्यास बारा तासापर्यंत चष्मा लावण्याची गरज नाही अशी माहिती पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी काही समाज माध्यमांशी बोलताना सांगितले दुसरी महत्वाची गोष्ट डॉक्टर लहाने यांनी सांगितली ती म्हणजे या ड्रॉप चा पीएच हा 3.5 ते 5.5 केलेला आहे त्यामुळे हे डोळ्यासाठी अगदी सेफ आहे हा ड्रॉप वापरल्यामुळे तुमच्या डोळ्याचे आरोग्य चांगले राहते डोळ्यांमधील पाण्याचे प्रमाण वाढते व स्नायू अधिक बळकट होतात या औषधाचे जास्त साईड इफेक्ट नाहीत पण एखाद्या वेळेला डोळ्यांमध्ये जळजळ होणे आणि डोकं दुखणे यासारखे काही साईड इफेक्ट पाहायला मिळतात पण ते हळूहळू कमी होतात ज्यांची डोळ्याची ऑपरेशन झालेले आहेत त्यांना सुद्धा हा ड्रॉप वापरता येईल त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत 40 वर्षाच्या वरीलच नाही तर ज्यांना ज्यांना चष्मा आहे त्या सर्वांनाच हा ड्रॉप वापरणं सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा आहे
हा ड्रॉप ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भारतातील सर्व मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होईल पण हा ड्रॉप मेडिकल वरून घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची व त्यांच्या चिठ्ठीची गरज असेल तरच तुम्हाला हा ड्रॉप मिळेल नाहीतर हा ड्रॉप तुम्हाला मिळणार नाही
म्हणजे एकंदरीत वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास हा डोळ्याचा ड्रॉप हा एक प्रकारची संजीवनीच ठरणार आहे यामुळे चष्म्यापासून तर मुक्ती मिळणारच आहे पण डोळ्यांच्या आरोग्य देखील यामुळे सुधारणार आहे हा ड्रॉप ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सर्व मेडिकल स्टोअर्स विक्रीला उपलब्ध होईल आणि याची किंमत सामान्यातल्या सामान्य माणसाला परवडेल अशी म्हणजे साडेतीनशे रुपये अशी ड्रॉप ची किंमत असेल त्यामुळे प्रत्येकाच्या खिशाला हा ड्रॉप परवडेल
या सृष्टीचे सौंदर्य जर आपल्याला बघायचे असेल तर आपले डोळे खूप काळापर्यंत चांगले राहणे गरजेचे आहे यामुळे या ड्रॉप सोबतच आपण आपल्या आहारामध्ये विटामिन चे प्रमाण असलेले खाद्य जास्त वापरावे जेणेकरून आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगले राहील व डॉक्टरांनी वेळोवेळी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे आणि वेळोवेळी डोळ्याची तपासणी व्यवस्थित करणे हे करून आपण आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगले ठेवू शकतो या बाबीकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे तसेच मोबाईल लॅपटॉप आणि कॉम्प्युटर चा वापर टीव्हीचा वापर हा कमीत कमी आणि योग्य अंतर ठेवूनच करावा जेणेकरून आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगले राहील असे मला वाटते हा ड्रॉप बाजारात आल्यानंतर वापरल्यानंतर याचे रिझल्ट आपल्याला कळतील पण यामुळे एक अशीच किरण मात्र निर्माण झालेला आहे
नोट –सदरील लेख हा फक्त माहितीस्तव आहे वैद्यकीय उपचारांसाठी नाही हा ड्रॉप वापरण्यापूर्वी आपण नेत्रस तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा सदरील लेख हा वेगवेगळ्या माध्यमांमधील माहिती गोळा करून आम्ही लिहिलेला आहे