नवी दिल्ली-केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राज्यसभेच्या(Rajya Sabha)निवडणुकीचे निकाल
जाहीर केले सदरील ही निवडणूक ही राज्यसभेच्या(Rajya Sabha) 12 जागांसाठी झाली आणि
3 सप्टेंबरला या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार होती पण आज बाराच अर्ज आले म्हणून
ही निवडणूक प्रक्रिया ही बिनविरोध पार पडली
राज्यसभेच्या(Rajya Sabha) एकूण 12 जागांसाठी मतदान प्रक्रिया ही 3 सप्टेंबरला पार पडणार होती
21ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होता व आज बिनविरोध 12 जागांचे निकाल जाहीर केले
यामध्ये एनडीए ला एकूण बारा जागा पैकी 11 जागा मिळाल्या तर काँग्रेसला एक जागा मिळाली
राज्यसभेमध्ये(Rajya Sabha) एनडीएला(NDA) स्पष्ट बहुमत मिळाले
आज आलेल्या निकालानंतर भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए(NDA) ला काहीसा दिलासा मिळणार आहे
कारण आता राज्यसभेमध्ये(Rajya Sabha) एनडीए(NDA) ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे मागील काही वर्षापासून
भारतीय जनता पार्टीला राज्यसभेमध्ये(Rajya Sabha) बहुमत सिद्ध करण्यासाठी बी आर एस, बीजेडी,
जगमोहन रेड्डी यांची वाय आर एस काँग्रेस आणि ए आय ए डी ए के अशा काही पक्षांवर निर्भर रहावं
लागत होतं पण आज आलेल्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेमधील(Rajya Sabha)
खासदारांची संख्या वाढून 96 झाली आहे
तर एनडीए ची राज्यसभेतील(Rajya Sabha) खासदारांची संख्या ही आता 112 वर पोहोचलेली आहे
राज्यसभेची रचना कशी आहे?
राज्यसभेमध्ये(Rajya Sabha) एकूण सदस्यांची संख्या ही 245 आहे त्यापैकी आठ जागा ह्या रिक्त आहेत या
रिक्त जागांमध्ये जम्मू व काश्मीर या राज्यांमधील चार जागा आहेत या राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक
झाली नाही म्हणून या ठिकाणच्या चार जागा रिक्त आहेत तर राज्यसभेमध्ये(Rajya Sabha) मनोनित
सदस्यांच्याही चार जागा सध्या रिक्त आहेत
यामुळे राज्यसभेमध्ये बहुमताचा आकडा हा 119 सदस्यांचा आहे सध्या भाजपा आणि एनडीएकडे(NDA)
एकूण 112 सदस्य आहेत व त्यांना सहा मनोनित सदस्यांचा पाठिंबा आहे व एक अपक्षचा देखील पाठिंबा आहे
यामुळे भारतीय जनता पार्टी व एडीए राज्यसभेमध्ये(Rajya Sabha) एकूण 120 सदस्यांचे समर्थन आहे
राज्यसभेत काँग्रेसची विरोधी पक्षाची जागा पक्की
(Opposition party’s seat in Rajya Sabha is certain)
भारतीय जनता पार्टी व एनडीएला राज्यसभेमध्ये बहुमत मिळाले आहे तर
काँग्रेसला देखील आता विरोधी पक्ष नेतेपद राहणार आहे
या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला देखील काही दिल्यास देणारी बातमी आलेली आहे कारण राज्यसभेच्या
एकूण जागा पाहता राज्यसभेमध्ये(Rajya Sabha) विरोधी पक्ष नेता होण्यासाठी किमान 25 जागा असणे
आवश्यक आहे आणि आता आज आलेल्या निकालात मध्ये एक जागा ही काँग्रेसला मिळाली आहे त्यामुळे
काँग्रेसची राज्यसभेतील(Rajya Sabha) संख्याबळ हे 27 वर गेले आहे यामुळेच काँग्रेसला राज्यसभेमध्ये
(Rajya Sabha) विरोधी पक्षनेता पद त्यांचं कायम राहणार आहे
आज आलेल्या निकालामध्ये कोणाला किती जागा
आज राज्यसभेच्या(Rajya Sabha) आलेल्या निकालामध्ये 12 जागांपैकी भारतीय जनता पार्टीला तब्बल नऊ
जागा मिळाल्या आहेत
तर काँग्रेसला एक जागा मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार यांच्या पक्षाला एक जागा मिळाली आहे
तर आर एल एम या पक्षाला एक जागा मिळाली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा एनडीए(NDA) चा घटक पक्ष असल्यामुळे व महाराष्ट्रत असलेल्या सरकारमध्ये
तो घटक पक्ष असल्यामुळे ही जागा एनडीएकडे जाती आणि त्यामुळे एनडीएला(NDA) आजच्या निवडणुकीमध्ये
तब्बल दहा जागा वर विजय मिळाला आहे
आज झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र मधून दोन जागा आसाम मधून दोन जागा बिहार मधून दोन जागा हरियाणा
एक मध्यप्रदेश मधून एक ओडिसा एक राजस्थान एक त्रिपुरा एक तेलंगाना मधून एक जागा
आसाम मधील दोन जागांपैकी 1) मिशन रंजनदास २)रामेश्वर तेली आसाम मधील या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टीचे
उमेदवार विजयी झाले
बिहार मधून दोन जागांपैकी 1) मनन कुमार मिश्रा हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते तर २)उपेंद्र कुशवाह हे
आर एल एम या पक्षातर्फे विजयी झाले आहेत
हरियाणा मधील एकाच जागेवर भारतीय जनता पार्टीच्या किरण चौधरी या विजयी झाल्य आहेत
तर मध्य प्रदेश मधून एका जागेवर जॉर्ज कुरियन हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत
महाराष्ट्र मधून दोन जागांपैकी 1) धैर्यशील मोहिते पाटील(dhairshil mohite patil)
2) नितीन पाटील(Ntin Patil) हे भारतीय जनता पार्टीचे व राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार विजयी झाले आहेत
तर ओडिसा मधून भारतीय जनता पार्टीच्या ममता मोहनता या विजयी झाले आहेत
तर राजस्थान मधून केंद्रीय मंत्री रमणीत सिंग बिट्टू हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत
त्रिपुरा मधून भारतीय जनता पार्टीचे राजू भट्टाचार्य हे विजयी झाले आहेत
तर तेलंगणा मधून काँग्रेसचे अभिषेक मनुसिंगवी विजय झाले आहेत
महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक(Rajya Sabha Elections in Maharashtra)
महाराष्ट्र मधील दोन रिक्त जागांसाठी निवडणूक पार पडली या दोन्हीही जागा वरचे उमेदवार लोकसभेला निवडून
आल्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या यापैकी पहिली जागा पियुष गोयल हे मुंबईमधून लोकसभेमध्ये विजयी झाले
तर साताऱ्या मधून उदयनराजे भोसले हे लोकसभेला विजय झाल्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या
जेव्हा राज्यसभेचा(Rajya Sabha) एखादा खासदार लोकसभेमध्ये विजयी होतो तो विजय झाल्याबरोबर त्याची
राज्यसभेचे सदस्य पद राजीनामा न देता ही गेलेले असते त्यामुळे ह्या दोन जागा रिक्त होत्या
धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले आहेत धैर्यशील मोहिते पाटील(dhairshil mohite patil) हे
विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदार संघामधून
निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आणि याच जागेसाठी धैर्यशील मोहिते पाटील
(dhairshil mohite patil) हे इच्छुक होते पण जेव्हा निंबाळकर यांना उमेदवारी द्यायचे पक्के झाले तेव्हा
धैर्यशील मोहिते पाटील(dhairshil mohite patil) यांनी शरद पवार यांची भेट घेतली व ते शरद पवार गटातून
लोकसभेची निवडणूक लढवतील अशा चर्चा होत्या पण यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जाऊन त्यांची समजूत
काढली व त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील(dhairshil mohite patil) यांना राज्यसभेची(Rajya Sabha) ऑफर
देण्यात आली होती यानंतर दिलेल्या शब्द भारतीय जनता पार्टीने पाळत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावावर
शिक्का मूर्तब केला त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला या जागी दुसरा कोणताही उमेदवार नसल्यामुळे
धैर्यशील मोहिते पाटील(dhairshil mohite patil) हे बिनविरोध विजयी झाले आहेत
नितीन पाटील राज्यसभेची(Rajya Sabha) ही जागा भारतीय जनता पार्टीची होती पण लोकसभेला
राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणाव्या
तेवढ्या जागा महायुतीमध्ये मिळाला नाही त्यामुळे ही राज्यसभेची(Rajya Sabha) जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
अजित दादा पवार गट यांना दिली व या जागेसाठी नितीन पाटील(Ntin Patil) यांचे नाव अजितदादा पवार यांनी
निश्चित केले नितीन पाटील(Ntin Patil) हे वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत व ते जिल्हा मध्यवर्ती
बँकेचे अध्यक्ष आहेत मुळात साताऱ्याची लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची होती पण हा उदयनराजे भोसले
(Udaynraje bhosle)यांचा मतदारसंघ असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने ते स्वतः कडे ठेवून घेतली आणि या
बदल्यांमध्ये एक राज्यसभेची(Rajya Sabha) जागा द्यायची महायुतीमध्ये नक्की करण्यात आले होते त्यामुळे
महायुतीमध्ये ही जागा अजितदादा पवार यांना दिली व लोकसभेमध्ये या जागेसाठी नितीन पाटील(Ntin Patil) हे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक होते पण अजितदादा पवार यांनी त्यांचे समजूत काढली व उदयनराजे भोसले(Udaynraje bhosle)
यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना अजितदादा पवार यांनी भर सभेमध्ये नितीन पाटील(Ntin Patil) यांना शब्द
दिला की तुम्ही उदयनराजे भोसले(Udaynraje bhosle) यांना निवडून आणा मी तुम्हाला राज्यसभेवर(Rajya Sabha)
खासदार करतो आणि शब्द दिल्याप्रमाणे अजित दादा पवार यांनी नितीन पाटील(Ntin Patil) यांना उमेदवारी दिली
व ते बिनविरोध राज्यसभेवर निवडून आले
राज्यसभेच्या(Rajya Sabha) निवडणुकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची छाप मोठ्या प्रमाणावर दिसली
कारण महाराष्ट्र हरियाणा मध्ये होणाऱ्या विधानसभे निवडणुकीमुळे जातीय समीकरण पाहून उमेदवार देण्यात आले
त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये धैर्यशील मोहिते पाटील व नितीन पाटील(Ntin Patil) या दोघांना उमेदवारी देण्यात आली
दोन केंद्रीय मंत्री हे राज्यसभेचे किंवा लोकसभेचे सदस्य नव्हते त्यामुळे त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने या
निवडणुकीमध्ये संधी दिली आता हे पाहावं लागेल की या घेतलेल्या निर्णयाचे काय परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये
सकारात्मक दिसतात ते नकारात्मक दिसतात हे पहावे लागेल राज्यसभेमध्ये बहुमत मिळाले आहे तर