नवी दिल्लीमध्ये-अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन(Marathi Literature Conference) उद्घाटनाचा दिवस गाजला तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्या उपस्थितीमुळे

मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन (Inauguration of Marathi Literature Conference)
नवी दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले गेले होते या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर तर संमेलनाचे स्वागत अध्यक्ष हे शरद पवार (SHARAD PAWAR)हे होते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच मराठी साहित्यातील इतर मान्यवर देखील उपस्थित होते या साहित्य संमेलनाची चर्चा झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)व शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे एरवी राजकीय सभांमध्ये एकमेकांवर टीका करणारे देशातील दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर होते
आणि त्या दोघांनी एकमेकांशी गप्पादेखील मारल्या सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)यांनी शरद पवार (SHARAD PAWAR)यांना बसण्यासाठी खुर्ची दिली तर खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी शरद पवार (SHARAD PAWAR)यांना पाण्याचा ग्लास देखील भरून दिला व भाषणाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)व शरद पवार (SHARAD PAWAR)यांनी एकमेकांविषयी त्यांनी केलेल्या कार्याविषयी तारीफ देखील केली पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)यांनी शरद पवार (SHARAD PAWAR)यांना दिलेला हा आदर पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले व दिल्लीमध्ये झालेल्या मैत्रीपूर्ण भेटीची चर्चाही दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात जोरात चालू झाली

महाराष्ट्रात राजकीय चर्चा सुरू झाल्या (Political discussions have begun in Maharashtra.)
महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे भक्कम व बहुमत असलेलीसत्ता असताना देखील भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख विरोधक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते आहेत शरद पवार (SHARAD PAWAR)यांना एवढा मान पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)यांनी का दिला ? विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला तरी देखील दिल्ली दरबारी शरद पवार (SHARAD PAWAR)एवढी ताकद कशी काय ?
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तसेच देशाच्याही राजकारणामध्ये मागील पन्नास वर्षापासून शरद पवार (SHARAD PAWAR)यांचे राजकीय वजन हे सर्वांनी पाहिले आहे तब्बल चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद तर देशाचे कृषिमंत्री संरक्षण मंत्री तसेच विरोधी पक्षनेते म्हणून देखील शरद पवार (SHARAD PAWAR)यांचे काम आपण पाहिलेले आहे दोन वेळा काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वतःच अस्तित्व सिद्ध करून दाखविले त्यामुळे शरद पवार (SHARAD PAWAR)यांचा प्रभाव हा महाराष्ट्रात तसेच देशपातळीवर देखील राहिला पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्या पक्षाला चांगलाच झटका बसला आणि 288 पैकी फक्त दहा जागी शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्या पक्षाला यश आले तसेच त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्या पक्षाने 10 जागी लोकसभेची निवडणूक लढविली तर त्यापैकी आठ जागे त्यांचे उमेदवार विजयी झाले. यामुळे शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्या नावाची चर्चा देशभर झाली सर्वात सफल नेता म्हणून देखील शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्याकडे पाहिले जाऊ लागले पण विधानसभेला मात्र शरद पवार (SHARAD PAWAR)यांना केवळ दहाच जागा मिळाल्या

यानंतर राज्यात चर्चा सुरू झाली ती शरद पवार (SHARAD PAWAR)यांची राजकारण संपले पण दिल्लीमधील मराठी साहित्य संमेलनामध्ये शरद पवार (SHARAD PAWAR)यांनी परत एकदा दाखवून दिले की राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणामध्ये शरद पवार (SHARAD PAWAR)यांची किमया वेगळीच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)आणि शरद पवार (SHARAD PAWAR)या कार्यक्रमात एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले यामुळे शरद पवार (SHARAD PAWAR)यांचे दिल्लीमधील वजन हे कायम असल्याचे दिसून आले याच कार्यक्रमांमध्ये शरद पवार (SHARAD PAWAR)आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)यांनी एकामेकाची तारीफ देखील केली
हे हि वाचा-IPL 2025 Schedule : आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर! २२ मार्चपासून रंगणार थरार
शरद पवार नरेंद्र मोदी विषयी काय म्हणाले?(What did Sharad Pawar say about Narendra Modi?)
आपल्या भाषणामध्ये शरद पवार (SHARAD PAWAR)म्हणाले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीतील दुसऱ्यांदा होत आहे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)उपस्थित राहिले याचा मला आनंद आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी मोठी भूमिका बजावली आहे त्याबद्दल मी समस्त मराठी जनतेच्या वतीने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो याआधी 70 वर्षांपूर्वी झालेल्या दिल्लीमधील मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते तर तब्बल सत्तर वर्षांनी होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)यांच्या हस्ते होत आहे याचा मला आनंद आहे मी त्यांना निमंत्रण देण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी एक मिनिटाचा वेळ न लावता मी कार्यक्रमाला येणार असा शब्द त्यांनी मला दिला
पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांची जुनी मैत्री(Old friendship between Prime Minister Narendra Modi and Sharad Pawar)
जेव्हा देशामध्ये यूपीए चे सरकार होते आणि नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते यूपीए आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये जमत नव्हतं आणि अशा वेळेला नरेंद्र मोदी यांचे दिल्लीमधील सर्व काम करून द्यायची जबाबदारी ही शरद पवार (SHARAD PAWAR)यांनी पार पाडली अशी देखील चर्चा असते
आत्ता सध्या दिल्लीमधील असलेले भारतीय जनता पार्टीचे सरकार हे मित्र पक्षांच्या सहाय्यतेने चालत आहे आणि लोकसभेतील प्रत्येक खासदाराला प्रचंड महत्व आले आहे अशा मध्येच शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्या पक्षाकडे आठ खासदार आहेत आणि ते देखील महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात हे देखील कारण असल्याची चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये आहे
हे हि वाचा —marathwada mukti sangram din काय आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच इतिहास?वाचा
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे दोन पक्ष बरोबर आहेत अनेकदा या दोन्ही पक्षातील काही नेते नाराज असल्याच्या चर्चा कानावर येतात आणि यामुळेच एखादा भक्कम पर्याय आपल्या बाजूला असावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते हे सध्या शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्याशी जवळीक साधत असल्याची देखील चर्चा आहे ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)व शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्या दोस्ती कुणाकुणाला खटकली ?
दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या नंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली मला असे वाटले होते की नरेंद्र मोदी हे शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्या बाजूला बसणार नाही कारण की नरेंद्र मोदी यांनी शरद पवार (SHARAD PAWAR)यांना भटकती आत्मा असे म्हटले होते आता भटकती आत्म्याच्या बाजूला कसे बसले ? असा प्रश्न देखील खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला
संजय राऊत यांना ही गोष्ट खटकली असली तरी देखील सुप्रिया सुळे यांनी मात्र या मैत्रीपूर्ण संबंधाकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज असल्याचे सांगितले
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे मराठी साहित्य संमेलन होत आहे
एकंदरीत वरील सर्व गोष्टींचा विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये या दिल्लीत झालेल्या दोस्तीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर पडतील का ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)आणि शरद पवार (SHARAD PAWAR)यांची भेट ही फक्त मराठी साहित्य संमेलनापुरतीच होती का ?
याच महिन्यामध्ये महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना महादजी शिंदे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार देण्यासाठी स्वतः शरद पवार (SHARAD PAWAR)व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे एकाच व्यासपीठावर आले होते आणि याच महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)व शरद पवार (SHARAD PAWAR)हे एकाच व्यासपीठावर आले आहेत त्यामुळे काही राजकीय भूकंप घडतो की काय अशी देखील चर्चा ही सध्या महाराष्ट्रात आहे
शरद पवार (SHARAD PAWAR)हे वारंवार सांगत असतात की राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि प्रत्येकाने आपले संबंध हे मैत्रीपूर्ण ठेवलेच पाहिजे या एका स्वभावामुळे शरद पवार (SHARAD PAWAR)हे अगदी सहज विरोधी पक्षाच्या बड्या नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवताना आपण पाहिलेले आहेत यामुळे शरद पवार (SHARAD PAWAR)यांनी महाराष्ट्रातील राजकीय समज ही किती मोठी आहे हे वारंवार त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे