वाराणसी -काशी हिंदूधर्मातील लोकांच्या श्रद्धेचे महत्वाचे स्थान म्हणजे काशी हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार काशीला फार महत्त्व आहे
अन्य तीर्थक्षेत्रापेक्षा या तीर्थक्षेत्राला फार महत्त्व आहे तेथे भव्य असे काशी विश्वनाथाचे मंदिर तसे हजारो छोटे मोठे मंदिर आहेत
पवित्र अशा गंगा नदीच्या तीरावर वसलेले हे काशी शहर पण मागील दहा वर्षापासून वाराणसी काशी हे राजकीय केंद्रबिंदू बनलं आहे
कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (Narendra modi) याच वाराणसी शहरातून लोकसभेची निवडणूक मागील दोन निवडणुकांपासून लढवत आहेत
यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा काशीला एक वेगळं वलय प्राप्त झाला आहे
2014 मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने नरेंद्र मोदी(Narendra modi)यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं
तेव्हापासून सर्व राजकीय विश्लेषकांनी असा अंदाज बांधला होता की नरेंद्र मोदी (Narendra modi) हे आपल्या राज्यातून गुजरात मधून लोकसभेची
निवडणूक लढवतील पण हा अंदाज तेव्हा खोटा ठरला जेव्हा 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने नरेंद्र मोदी (Narendra modi) यांना दोन
लोकसभा मतदारसंघांमधून उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. यामध्ये वाराणसीचा समावेश होता राजकीय विश्लेषक हे सुद्धा सांगतात की दिल्लीच्या सत्तेचा
दरवाजा हा उत्तर प्रदेश मधून उघडतो कारण लोकसभेच्या सर्वात जास्त 80 जागा
या उत्तर प्रदेश मधून येतात त्यामुळे प्रत्येक पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची प्रथम पसंती ही उत्तर प्रदेश असते कारण की त्या पद्धतीचे वातावरणाची निर्मिती
ही उत्तर प्रदेश मधून निवडणूक लढवल्याशिवाय होत नाही हाच विचार करून भाजपाने नरेंद्र मोदी (Narendra modi) यांना वाराणसी मधून उमेदवारी दिली
त्यावेळेला नरेंद्र मोदी(Narendra modi) यांनी स्पष्ट सांगितले की मला कोणी पाठवले नाही कोणीही मला बोलविले नाही मला गंगा मातेने बोलावले आहे
असं म्हणून त्यांनी 2014 मध्ये आपली लोकसभेची उमेदवारी वाराणसी मधून दाखल केली व वाराणसी करांनी सुद्धा नरेंद्र मोदी(Narendra modi)यांना
भरभरून मतदान केले व नरेंद्र मोदी विजयी झाले या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना 56.50%एवढी मते मिळाली होती व यानंतर नरेंद्र मोदी यांच्या
लोकप्रियतेमध्ये वाढ होत गेली नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान बनले व 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांनी परत एकदा वाराणसी मधून उभे राहायचं ठरवले
व या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना 64% एवढी मते मिळाली म्हणजे मागील दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे
उमेदवारी अर्ज भरताना NDA ची एकी पाहायला मिळाली
(One of the NDA was seen while filling the nomination form)
दोन दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी वायनाड नंतर उत्तर प्रदेश मधील रायबरेली येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कारण वायनाड मध्ये राहुल गांधी यांच्या
विरुद्ध दिलेल्या उमेदवारामुळे राहुल गांधी यांचे निवडून येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे त्यांनी आपला परंपरागत मतदारसंघ रायबरेली येथून उमेदवारी अर्ज
दाखल केला पण या प्रसंगी INDIA आलायसचे एकही मोठा नेता याप्रसंगी राहुल गांधी सोबत दिसला नाही मलिका अर्जुन खरगे वगळता इतर कोणताही मोठा
नेता दिसला नाही यामध्ये प्रामुख्याने फक्त गांधी घराणे अर्ज दाखल करताना राहुल गांधी यांच्याबरोबर होते तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज
दाखल करताना NDA मधील सर्वच राजकीय घटक पक्षांचे प्रतिनिधी अध्यक्ष याप्रसंगी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने प्रफुल पटेल (एनसीपी)
पवन कलोन(जन कल्याण पार्टीचे अध्यक्ष) अबमणी रामदास(पी एम के’ जेके वासन (तमिल मनीला काँग्रेस) आदल बोरा (असम जन परिषद)
केंद्र कुशवाह (राष्ट्रीय लोक मोर्चा)
अनुप्रिया पटेल (आपणा दल एस) रामदास आठवले (आरपीआय आठवले गट) वरील सर्व नेते याप्रसंगी उपस्थित होते त्यामुळे एनडीए आघाडी कशी एकजूट आहे
हा दाखण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केला
नरेंद्र मोदी यांचा रोड शो
लोकसभेची उमेदवारी भरण्याच्या आदल्या रात्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समवेत एका भव्य रोडशोध चे आयोजन केले होते
या रोडशोमुळे संपूर्ण वाराणसी शहरांमध्ये मोदी मोदीचे नारे ऐकू येऊ लागले या रोड शो चाही मतदारांवर खूप मोठा प्रभाव होईल असे राजकीय विश्लेषकांना वाटते
विविध जाती-धर्मातील लोकांना घेऊन त्याला उमेदवारी अर्ज दाखल
( People from different castes and religions filed nominations for him )
उमेदवारी अर्ज दाखल भरत असताना प्रत्येकाला सूचक लागतात नरेंद्र मोदी यांनी यामध्ये सुद्धा सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्मुला वापरला व विविध जातीतील लोकांना
घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यामध्ये पंडित गणेश वर शास्त्री ब्राह्मण संजय सोनकर दलित ला चंद्र कुशवाहात ओबीसी या सर्वांचा समावेश होता येथे
सुद्धा नरेंद्र मोदी यांनी सर्वांना बरोबर घेऊन अर्ज दाखल केला
वाराणसी लोकसभा मतदारसंघातील जातीनिहाय मतदाना
(Caste wise voting in Varanasi Lok Sabha Constituency)
1) मुस्लिम तीन लाख
2) ब्राह्मण अडीच लाख
3) भूमिहार दीड लाख
4) कुर्मी दीड लाख
5) यादव दीड लाख
6) दलित ऐंशी हजार
वरील जातीय समीकरणामुळे नरेंद्र मोदी यांना वाराणसी ची जागा ही सोपी जाते असं बोललं जात
नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मध्ये केलेले ठळक कामे
(Important works done by Narendra Modi in Varanasi)
नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मध्ये अनेक विकास काम केली व अनेक विकास कामांचा शुभारंभ देखील केला यामध्ये प्रामुख्याने नमामि गंगे हा प्रकल्प हाती घेतला व गंगा
नदी साफ करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केला पण त्यामध्ये त्यांना फारस यश आल्याचे दिसत नाही कारण गंगा नदीच्या प्रदूषण व अस्वच्छतेमुळे कायमच नरेंद्र मोदी
यांच्यावर टीका होत राहिली आहे व या नदीची सफाई झाली नाही ही वास्तविकता खरी आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले
1) काशी विश्वनाथ कॉरिडोर (Kashi Vishwanath Corridor) – हा महत्वकांक्षी प्रकल्प नरेंद्र मोदी यांनी हाती घेतला व या प्रकल्पाला चांगली साथ दिली हे उत्तर प्रदेशचे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व 963 कोटी रुपये खर्चून हा काशी विश्वनाथ कॉरिडॉर हा प्रकल्प पूर्ण झाला या प्रकल्पामुळे वाराणसी शहराचा चेहरा मोरया बदलल्यामुळे
नरेंद्र मोदी यांना यश येताना दिसली आहे
2) काशी इंटिग्रेड कमांड अँड कंट्रोल सेंटर
(Kashi Integrated Command and Control Centre)
176 कोटी रुपये खर्चून नरेंद्र मोदी यांनी काशी
इंटिग्रेड कमांड अँड कंट्रोल सेंटर ची स्थापना केली व हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून कार्यान्वित केला याचाही खूप मोठा फरक हा वाराणसी शहराच्या
विकासावर पहावयास मिळत आहे
3) अंडरग्राउंड केबलिंग(Underground Cablin)
619 कोटी रुपये खर्चून काशी मधील महत्वकांशी प्रकल्प अंडरग्राउंड केबलिंग चे काम हे पूर्ण करण्यात आले
4) रुद्राक्ष सेंटर (Rudraksh Centre)
तसेच नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असलेला 186 कोटीचा रुद्राक्ष सेंटर हा प्रकल्प सुद्धा तयार झाला आहे
5) सीएनजी प्लांट (CNG Plant)
तसेच शहंशाहपुर मध्ये 23 कोटीचा मोठा असा सीएनजी प्लांट येथे लावण्यात आला त्याचाही फायदा खूप मोठ्या प्रमाणात वाराणसी
तसेच उत्तर प्रदेश मधील लोकांना झाल्याचे दिसून येत आहे
6)लाईट व नळ कनेक्शन (Light and tap connection)
तसेच वाराणसीवासी यांना महत्वाचे ठरले ते 55000 लाईट व नळ कनेक्शन हे मागील दहा वर्षांमध्ये
जोडून चालू झाले आहेत त्याचाही फायदा या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना होण्याची शक्यता आहे
एकंदरीत वरील सर्व गोष्टींचा विचार करता उत्तर प्रदेश आणि बिहार हे दोन राज्य महत्वाची यासाठी आहेत या दोन राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 120 जागा येतात म्हणूनच
राजकीय दृष्ट्या हा भाग खूप महत्त्वाचा मानला जातो यामुळेच नरेंद्र मोदी यांनी गुजरात सोडून उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला कारण याचा फायदा
त्यांना पवित्र शहर असल्यामुळे नरेंद्र मोदी यांना सबंध देशभरामध्ये मिळतो त्यामुळे त्यांनी वाराणसी लोकसभेची निवड केली आहे एकंदरीत चित्र पाहता 2009 मध्ये उत्तर प्रदेश
मध्ये भारतीय जनता पार्टीला 10 लोकसभेच्या जागा मिळाल्या होत्या 2014 मध्ये ही संख्या निश्चित वाढली पण खऱ्या अर्थाने 2019 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला
उत्तर प्रदेश मधून मोठे यश आलं याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा आहेत आता सर्व निवडणुका
नंतर सर्वांना वेद लागले ते चार जून चे चार जूनला आपल्याला हे पाहावं लागेल की नरेंद्र मोदी त्यांच्या तिसऱ्या टर्मच्या परीक्षेमध्ये पास होतात की नाही व भारतीय जनता पार्टीची
सत्ता येते की इंडिया आणायची सत्ता येते हे पहावं लागेल पण एकंदरीत आज दिवसभरामध्ये घडलेली मोठी घटना म्हणजे नरेंद्र मोदी यांनी परत एकदा आपकी बार 400 चा नारा
दिला आता हे पाहू लागेल की वाराणसी वासीय नरेंद्र मोदी यांना व संपूर्ण देशवासीय भाजपाला 400 जागांचा पल्ला देतात की नाही
Recent News
नमो नमो च्या गजरात नरेंद्र मोदी यांनी केला वाराणसी तुन उमेदवारी अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज भरताना NDA ची एकी पाहायला मिळाली