नांदेड लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीच्या
वतीने विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर
यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे
पण याच मतदारसंघातून सेवा जनशक्ती पार्टीचे
प्राध्यापक मनोहर धोंडे हे निवडणूक लढविणार आहेत
असं त्यांनी जाहीर केलं मनोहर धोंडे हे मागील अनेक
वर्षापासून शिवा संघटना तसेच अनेक सामाजिक
कार्यांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवतात सुरुवातीला विद्यार्थी सेनेमध्ये त्यांनी काम केले व ठाकरे कुटुंबीयांची त्यांची जवळी होती
स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे वारंवार त्यांच्याशी चर्चा करत होते तसेच त्यांनी राज साहेब ठाकरे यांच्यासोबत सुद्धा
बरीच वर्ष काम केले
आता ते नांदेड लोकसभेमध्ये आपली उमेदवारी दाखल
करणार आहेत प्रामुख्याने लातूर येथे त्यांनी एक मोर्चा
काढला त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या अशी
एक मागणी या मोर्चामध्ये होती त्यामुळे मराठा समाज
हा माझ्यामागे उभा राहील असा धोंडे सरांना विश्वास आहे
कारण मराठा समाजाची अजून तरी भूमिका ही कुठल्याही राजकीय पक्षाला मतदान करण्याची नाही त्यामुळे
हा समाज आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न प्राध्यापक मनोहर धोंडे हे निश्चित करतील तसेच नांदेड लोकसभेमध्ये
लिंगायत समाजाचे मतदान हे मोठ्या प्रमाणात आहे याचाही फायदा मनोहर धोंडे सरांना होऊ शकतो वरील सर्व
मुद्दे पाहता प्राध्यापक मनोहर धोंडे हे नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक राहणार असे चित्र दिसत आहे
आता प्रा.मनोहर धोंडे हे भाजपाचे मतदान आपल्याकडे वळतात की काँग्रेसचे हा सध्या नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये चर्चेचा विषय आहे