नांदेड ला मिळणार तीन खासदार
मागील काही दिवसापासून नांदेड जिल्हा चर्चेत आहे
कारण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत केलेला
प्रवेश व राज्यसभेची निवडणूक हा योग जुळून आला अशोकराव चव्हाण यांनी
भाजपामध्ये प्रवेश घेतल्यापासून त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार हे
जवळपास निश्चित होते पण आज भाजपा पक्षाचे जाहीर केलेल्या यादीमध्ये
नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली यामुळे
नांदेड वासीय मात्र आनंदात आहेत डॉक्टर अजित गोपछडे हे मागील
अनेक वर्षापासून पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रतिष्ठान च्या वतीने गरीब रुग्णांना
गावोगावीत जाऊन आरोग्य शिबिर आयोजित करणे व त्यांना मोफत उपचार देणे
अशा प्रकारचे काम डॉक्टर गुपछडे करत होते तसेच ते भाजपा
वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते कोविड काळामध्ये डॉक्टर
गोपछडे डॉक्टर गोपछडे यांचे काम उल्लेखनीय होते ते भाजपामध्ये बऱ्याच
काळापासून काम करतात त्यांचे शिक्षण एमबीबीएस एमडी असे आहे
त्यांनी निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड चे राज्यस्तरीय अध्यक्ष पद भूषवले होते
मागील वर्षी विधान परिषदेसाठी त्यांची उमेदवारी घोषित झाली होती
पण अचानक ती रद्द करण्यात आली होती डॉक्टर गोपछेडे
लिंगायत समाजामधून येतात त्यांचा फायदा मराठवाड्यात तसेच
कर्नाटकामध्ये सुद्धा होऊ शकतो यामुळे भाजपाने त्यांना उमेदवारी दिली आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे कालच भारतीय जनता पार्टीमध्ये
आले होते त्यांना सुद्धा यामध्ये उमेदवारी मिळाली आहे
तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आहे
तिथून प्रतापराव पाटील चिखलीकर हे खासदार आहेत त्यामुळे नांदेड वासियांना
आता तीन खासदार मिळाले आहेत आता पाहू की नांदेडचा विकास किती वेगाने होतो