दूरदर्शन वरील प्रसिद्ध सीरियल रामायण मध्ये प्रभू रामचंद्राची भूमिका साकारणारे अरुण गोविल
यांना भारतीय जनता पार्टीने मेरठ मधून उमेदवारी दिली आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला
त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्याकडे 8.8 कोटी रुपयांची संपत्ती आहे असे जाहीर केले आहे
यामध्ये ६२.९९ लाख रुपयांची मर्सिडीज आणि ३.१९ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर त्यांची
पत्नी श्रीलेखा गोविल यांच्याकडे २.७६ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे
स्थावर मालमत्तेचा विचार करता, अरुण गोविलच्या एकूण स्थावर मालमत्तेची किंमत 5.67 कोटी पेक्षा जास्त आहे
तर त्यांच्या पत्नी श्रीलेखाची 2.80 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गोविल पती-पत्नीकडे प्रकारचे शस्त्र नाही
तर बँकेमध्ये अरुण गोविल यांच्या नावे
1.03 कोटी रुपये तर त्यांच्या पत्नीचे नावे 80.43 लाख रुपये जमा आहेत
तसेच त्यांच्याकडे तीन लाख 75 हजार रुपयांची रोकड तर त्यांच्या पत्नीकडे चार लाख रुपयांची रोकड आहे
अरुण गोविल यांच्याकडे 220 gm वजनाचे दागिने आहेत त्याची किंमत 10.93 लाख रुपये आहे
तर त्यांच्या पत्नीकडे 600gm एवढे दागिने आहेत त्याची किंमत 32.89 लाख रुपये एवढी आहे
तसेच दोघही पती-पत्नीवर कुठल्याही प्रकारचे गुन्हे कोणत्याच पोलीस स्टेशनमध्ये दाखल नाहीत
अरुण गोविल यांनी Bsc पर्यंत शिक्षण आग्रा विद्यापीठातून केले आहे
गोविल यांच्या नावे पुण्यामध्ये एक प्लॉट तर त्यांच्या पत्नीचे नावे अंधेरी मध्ये एक फ्लॅट आहे
तसेच अरुण गोविल यांच्याकडे 1.20 कोटीचे शेअर्स 1.40 कोटीचे म्युचल फंड आहेत