नवी दिल्ली – आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रासाठी व मराठी माणसासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status)केंद्र शासनाने दिला आहे मागील अनेक वर्षापासून ची मागणीला यश आले आहे
मराठी भाषेसह अन्य बंगाली, पाली,आसामी,प्राकृत या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status)देण्यात आला आहे मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील साहित्यिक विचारवंत कवी मराठी माणूस या सर्वांची मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status)द्या अशी मागणी होती
अभिजात भाषा म्हणजे काय ? अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळतो
(What is classical language? How does one get the status of classical language?)
ज्या भाषेचा इतिहास हा अतिव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500 ते 2000 वर्ष एवढा जुना पाहिजे
या भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा(Classical language status)द्यायचा आहे त्या भाषेचे साहित्य हे अतिव प्राचीन असायला हवे त्या भाषिकांना या भाषेतील साहित्य म्हणजे मौल्यवान वारसा वाटायला हवा
दुसऱ्या अन्य कुठल्याही भाषेतून उसनी किंवा थोडासा बदल करून तयार केलेले साहित्य नको अस्सल साहित्यिक परंपरा त्या भाषेला हवी
अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा काही प्रमाणामध्ये निराळी हवी
अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी 2012 मध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे स्थापन करण्यात आली होती त्यांनी 128 पानी अहवाल केंद्राकडे सादर केला
2015 मध्ये या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला होता यामध्ये, महारट्ठी,महरट्ठी, मत्हाटी, मराठीअसा मराठीचा उच्चारबदलत गेल्याचा अहवालसादर केला होता
आपले महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्याच्या खूप आधीपासून मराठी भाषा ही प्रचलित होती तसेच या भाषेला अडीच हजार वर्ष जुना इतिहास परंपरा असल्याचं या सांगण्यात आलं होतं तसेच या संदर्भातले पुरावे देखील या अहवालात सादर करण्यात आले होते हा अहवाल सादर केल्यानंतर या अहवालाची व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरवठा करण्यासाठी एका समिती तयार करण्यात आली होती त्याचे अध्यक्ष सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर या समितीने सतत पाठपुरवठा केला
याआधी कोणत्या भाषांना हा दर्जा मिळाला आहे
मराठी व इतर पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status) मिळण्याच्या आधी हा दर्जा १)तमिळ (२००४) २)संस्कृत (२००५) ३)कन्नड (२००८) ४)तेलगू (२००८) ५)मल्याळम(२०१३) ६)ओडिसा (२०१४) या भाषांना मिळाला होता आणि आजच्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मराठी सह इतर चार भाषांना हा दर्जा मिळाला आहे
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचे फायदे
(Advantages of classical language after attaining its status)
2005 च्या पूर्वी कोणत्या भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा द्यायचा याचा सर्वस्वी अधिकार हा गृहमंत्र्याकडे होता पण 2005 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status)देण्याचे सर्व अधिकार हे सांस्कृतिक मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आले
हा दर्जा मिळाल्यानंतर नेमका फायदा काय होईल
१)मराठी भाषेतील प्राचीन ग्रंथ अनुवादित इतर भाषांमध्ये करता येतील
२)मराठी भाषेतील साहित्याचे जतन करणे
३)मराठी बोलीचा अभ्यास करणे
४)संशोधन करणे
५)देशात असलेल्या 450 विद्यापीठांमध्ये आता मराठी भाषा शिकवण्याची सोय करणे
६)महाराष्ट्रातील सर्व वाचनालयांचे सशक्तीकरण करणे
७)मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी काम करणारे लेखक सामाजिक संस्था एखादा व्यक्ती विद्यार्थी या सर्वांना अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status)मिळाल्यानंतर त्यांना भरीव मदत करता येईल
वरील हे सर्व फायदे हा दर्जा मिळाल्यानंतर होतील
संसदेमध्ये अनेक वेळा हा प्रश्न विचारण्यात आला
नरेंद्र मोदी सरकारने दहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला पण तरीही मराठीलाअभिजात भाषेचा दर्जा(Classical language status)मिळत नव्हता अनेक वेळा मराठी खासदारांनी या संदर्भातले प्रश्न वेळोवेळी दोन्ही सभागृहात विचारले होते भारतीय जनता पार्टीचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रजनी पाटील शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अनेक वेळा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status) कधी मिळणार हा प्रश्न सभागृहात विचारला होता
टायमिंग वर प्रश्नचिन्ह का ?(Why the question mark on timing?)
केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status) दिला पण विरोधकांनी मात्र या निर्णयाच्या टायमिंग वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे अवघ्या काही दिवसाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे यापूर्वी राज्य शासनाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक निर्णय घेण्याचा सपाटा सध्या लावलेला आहे त्यातच केंद्र शासनाने घेतलेला हा निर्णय चांगला आहे पण त्याच्या टायमिंग हाच का असाही प्रश्न सध्या विरोधक विचारात आहेत अनेक वर्षापासून ही मागणी केंद्र सरकारच्या समोर आहे पण केंद्र सरकारने याबाबतीत निर्णय एवढे वर्ष का घेतला नाही असाही प्रश्न विरोधक सध्या सरकारला विचारत आहेत संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली यामध्ये त्यांनी मराठीला अभिजात भाषेच्या दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्रातील अनेकांनी पाठ पुरवठा केला शिवसेनेने देखील ही मागणी सतत लावून धरली पण लोकसभा मिळालेल्या पराभवामुळे ही शहाणपण सुचलं असल्याची टीका संजय राऊत यांनी केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर केली पोस्ट(Prime Minister Narendra Modi posted on social media)
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status)मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली यामध्ये त्यांनी असं म्हटलं
मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीयभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन.हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्याइतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदाना चा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचाआधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजातभाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्यलोकांना प्रेरणा मिळेल.
मराठी भाषेतील साहित्यिकांच्या प्रतिक्रिया(Reactions of Marathi language literature)

डॉक्टर संजय बालाघाटे (साहित्यिक)
मराठी मुळात अभिजनांनी मारलेली आहे जी ही मराठी भाषा जिवंत आहे ती बहुजनांमधल्या खेड्यापाड्यातल्या विविध जाती-धर्मातील लोकांनी जिवंत ठेवली त्यातील लाखो शब्द आजच्या मराठी भाषेमध्ये आहेत ज्या पद्धतीने जातीचे वर्गीकरण केले जाते पण व्यवहारांमध्ये जो काही भेदभाव असतो त्या पद्धतीचा भेदभाव हा भाषां पातळीवर सुद्धा आहे तसेच मराठी भाषेसारख्याच ज्या अन्य बोलीभाषा आहेत त्यांचेही संवर्धन होणे गरजेचे आहे
तसेच मराठी शाळा पुढे जिवंत राहतील काय कारण या शाळांमधून शिकून अनेक विद्यार्थ्यांनी पुढे मराठीमध्ये विद्या वाचस्पती मिळविली आहे अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठांमध्ये नोकऱ्या देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status)दिल्याबद्दल अभिनंदन

शंकर वाडेवाले (ज्येष्ठ साहित्यिक )
मराठी भाषेचे अस्तित्व हे अंदाजे अडीच हजार वर्षांपूर्वीची आहे अशा एका महत्त्वपूर्ण भाषेला मराठी भाषेचे संवर्धन तसेच मराठी भाषा दूरवर पोहोचावी म्हणून अनेक विचारवंतांनी साहित्यिकांनी मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने अथक प्रयत्न केले बऱ्याच दिवसापासून ची ही मागणी शासनाच्या लक्षात आली अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय शासनाने मराठी भाषेच्या संबंधात घेतला आहे
इंग्रजी तसेच अन्य बोली भाषेतल्या शाळा असणे चांगले आहे पण आपण ज्या प्रांतात राहतो जी भाषा बोलतो त्या भाषेचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे
ज्या साहित्यिकांनी विचारवंतांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जो पाठपुरवठा केला त्या सर्वांच्या श्रमाला फळ आले आहे परत एकदा शासनाचे हार्दिक अभिनंदन

डॉक्टर वसंत बिराजदार
प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर
रीतसर जगात अभिजात माय मराठी गेली आपली माय मराठी अगोदरच अभिजात भाषा होती आता रीतसर प्रमाणपत्राद्वारे अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status) मिळाला ही बाब अत्यंत गौरवास्पद अभिमानास्पद व ऐतिहासिक स्वरूपाची आहे आता मराठी भाषेचे अभिजात संवर्धन करणे गरजेचे आहे तसेच माय मराठीत असलेल्या नव्या ज्ञान निर्मितीला चालना मिळेल आणि भारतातील प्रत्येक प्रांतात असलेल्या भारतीयांची मराठी भाषा ही जनभाषा हो हीच अपेक्षा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status) दिल्याबद्दल केंद्र शासनाचे व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status) देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचेही हार्दिक अभिनंदन

दत्तात्रय येमेकर (गुरुजी)
वात्रटिकाकार साहित्यिक कंधार
गेली अनेक वर्ष मराठीला भाषेला अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status) देण्यासाठी अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.पण यंदाच्या २०२४ ला
मायबोली मराठी भाषेला केंद्र सरकारनी अभिजात भाषेचा दर्जा दिल्या बद्दल तमाम मन्याड खोर्यातील मातृभाषेच्या प्रेमी जनांच्या वतीने खंडोगणती बळदं भरुन शब्द हर्षित आनंदोत्सवी आभाराभिनंदन!