Close Menu
Sankalp Today
    Recent News

    Two brothers together-ठाकरे बंधू एकत्र पण पुढे काय होणार?

    July 7, 2025

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025

    Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं

    May 26, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, August 6
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • खानदेश
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » महायुतीने महाविकास आघाडी ला शह देण्या साठी आखली नवीन योजना
    No Comments

    महायुतीने महाविकास आघाडी ला शह देण्या साठी आखली नवीन योजना

    महायुतीचा महाविकास आघाडीला हरविण्या साठीच जरा फॉर्मुला काय आहे ?
    Sankalp TodayBy Sankalp TodayAugust 25, 2024

    लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभव मधून महायुतीने चांगला धडा घेतला आहे व लोकसभा निवडणूक मध्ये झालेल्या चुका या आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये
    यामुळे भारतीय जनता पार्टी व महायुतीने आत्ताच एक योजना आखली आहे ज्यामुळे महायुतीला महाविकास आघाडीला शह देण्यामध्ये यश येईल तर ही योजना काय आहे
    हे आपण पाहूयामहायुतीने आखलेल्या या योजनेला आपण जरा फॉर्म्युला असं सुद्धा म्हणू शकतो यामध्ये प्रामुख्याने महायुतीने लोकसभेला केलेल्या चुका या परत होऊ नये
    यासाठी मोठी काळजी घेत आहेत
    मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्त्वाची
    (Manoj Jarange Patil’s role is important)
    आपण वर चर्चा केल्याप्रमाणे जरा फार्मूला मध्ये म्हणजे जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) लोकसभेच्या आधी मराठा आरक्षणाचा(Maratha reservation) प्रश्न हा
    चांगलाच पेटला आणि याचे परिणाम सुद्धा लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील व महाराष्ट्र मध्ये महायुतीला प्रचंड अपयश आले व
    महाविकास आघाडीला यश आले. यामागे कारण नाराज असल्या मराठा समाज हे बोलले जात आहे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी जालना जिल्ह्यातील
    अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी(Maratha reservation) उपोषण सुरू केले या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि यामुळे महाराष्ट्रातील
    मराठा समाज हा प्रचंड आक्रमक झालेला पाहायला मिळाला या लाटी हल्ल्याचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाले व यानंतर मनोज जारंगे पाटील(Manoj Jarange Patil)
    यांची विक्रमी सभा यांतरवारी सराटी ते पार पडली या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी सरकारने जाणून बुजून लाठी हल्ला केल्याचा आरोप केला
    व या हल्ल्यामागे देवेंद्र फडवणीस हेच कारणीभूत आहे असे स्पष्ट सांगितले या सभेनंतर मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन माणूस जरांगे पाटील
    (Manoj Jarange Patil) यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व जरंगे पाटील यांना एक महिन्याचा वेळ दिला यानंतर मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)
    यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला व या दौऱ्याला देखील मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला व या दौऱ्या दरम्यानच महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक
    भूमिका घेत मराठा समाजाच्या आरक्षणाला(Maratha reservation) विरोध केला व यामुळे कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाला सुरुवात झाली पण राज्यस्तरावर
    एकनाथराव शिंदे यांनी आम्ही मराठा समाजाला आरक्षण(Maratha reservation) देणारच की ठाम भूमिका ठेवली व यासाठी त्यांनी शिंदे समितीचे गठन केले पण दुसरीकडे
    छगन भुजबळ यांनी सुद्धा महाराष्ट्राचा दौरा चालू केला व ओबीसी आरक्षणात मधून मराठा समाजाला आरक्षण(Maratha reservation)देऊ नका अशी ठाम भूमिका घेतली.
    मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) व छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रती आरोप झाले यानंतर मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी थेट
    मुंबईकडे जायचा निर्णय घेतला व ते मुंबईकडे जाण्यासाठी निघाले पण मुंबईमध्ये जाण्याआधीच वाशीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन सगळ्या सोयऱ्याचा
    अध्यादेश त्यांच्या हातामध्ये दिला व याअध्यादेशाच्या अंमलबजावणी साठी काही वेळ मागितला जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांनी सुद्धा त्यांना वेळ दिला पण त्यावेळी
    आधीच शिंदे समितीचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के वेगळे आरक्षण देण्यात आले पण हे आरक्षण मराठा समाजाला मान्य झाली नाही
    आणि जरंगे पाटील यांनी सरकारला सांगितले यानंतर देशामध्ये लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्या व निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली यामुळे सरकारला कुठलाच निर्णय घेता
    आला नाही पण या गोष्टीचे पडसाद मात्र लोकसभेला चांगलेच पाहायला मिळाले मराठवाड्यामध्ये आठ पैकी सात जागी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले अनेक दिग्गज
    नेत्यांना लोकसभेमध्ये पराभव पत्करावा लागला व
    जरांगे फॅक्टर मुळे महायुतीला अपयश आले हे बोलले जाऊ लागले
    (It was said that the grand alliance failed due to the Jarange factor)
    आता होणारे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांनी 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करायचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टी काही नेत्यांनी
    मनोज रंगे पाटील(Manoj Jarange Patil) यांना चिथावनी द्यायला सुरुवात केली याला कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) हे शरद पवार यांचा माणूस
    असल्याचा आरोप वारंवार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी केला जर मनोज जरांगे पाटील यांनी 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले तर ते काँग्रेस आणि शरद पवार
    गटाचे मत खातील असा अंदाजा भारतीय जनता पार्टीने बांधला आहे त्यामुळे काहीतरी झाले तरी मनोज जणांनी पाटील यांनी 288 उमेदवार उभेच केले पाहिजे या योजनेने महायुतीतील
    सर्वच घटक पक्ष कामाला लागले आहे कारण याचा खूप मोठा प्रभाव हा मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये पाहायला मिळेल जर मनोज जरांगे पाटील यांनी खरोखरच 288 विधानसभा
    मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार निवडणुकीत उतरवले तर याचा फटका महाविकास आघाडीला निश्चित बसेल व याचा फायदा महायुतीला होऊ शकतो
    राज ठाकरे यांचाही पक्ष विधानसभेच्या सर्व जागा लढवणार
    (Raj Thackeray’s party will also contest all seats in the Legislative Assembly)
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभेमध्ये फक्त एकच आमदार आहे तरीपण मनसेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे(Raj Thackeray) यांचा मात्र प्रभाव महाराष्ट्रावर मोठा पाहायला मिळतो
    विशेष करून तरुण वर्गामध्ये राज ठाकरे(Raj Thackeray) हे चांगलेच प्रसिद्ध आहेत त्यांच्या भाषणांना रेकॉर्ड तोड गर्दी होते पण मागील काही वर्षांमध्ये राज ठाकरे
    (Raj Thackeray) यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत लोकसभेच्या आधी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला यामुळे सुद्धा चर्चेला चांगलाच
    उधाण राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी कणकवली मध्ये जाऊन नारायण राणे यांच्यासाठी सभा सुद्धा घेतली या सभेचा फायदा नारायण राणे यांना होताना दिसला पण बाकी
    महाराष्ट्रामध्ये मात्र महायुती चांगलीच परेशानी झाली विधानसभेच्या आधी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे व ते 200 ते 250 जागा लढवणार
    अशी त्यांनी घोषणा केली आहे यामध्ये राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे करावेत अशी भूमिका महायुतीची असू शकते कारण जर राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी 250
    उमेदवार उभे केले तर विधानसभेला परत एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष होईल व उद्धवजी ठाकरे व त्यांच्या गटावर नाराज असलेल्या मतदार हा मात्र राज ठाकरे
    (Raj Thackeray) यांच्या मागे उभा राहण्याची दाट शक्यता आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या राजकारणातून हिंदुत्वाला बगल दिल्याचे दिसत आहे हा नाराज मतदार जर राज ठाकरे
    यांच्या बाजूने आला तर महाविकास आघाडी मधील घटक पक्ष उबाठा यांना मात्र चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळेच महायुतीचे ही रणनीती असू शकते की राज ठाकरे
    (Raj Thackeray) यांनी 200 ते 250 जागी आपले उमेदवार जरूर उभे करावे जेणेकरून मत विभाजनाचा फायदा हा महायुतीला होऊ शकतो राज ठाकरे यांचा विशेष प्रभाव हा
    मुंबई ठाणे, कल्याण नाशिक पुणे नवी मुंबई तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा प्रभाव आहे
    जर मत विभाजन झाले तर महायुती मुंबई नाशिक पुणे येथे निर्णय स्थितीत राहू शकते अशी शक्यता आहे पण राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या बदलणाऱ्या भूमिका यामुळे
    राज ठाकरे(Raj Thackeray) हे खरोखरच 250 उमेदवार मैदानात उतरतील काय याबद्दल मात्र संभ्रम कायम आहे
    राज ठाकरे व मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी जर उमेदवार उभे केले तर मात्र याचा फायदा हा महाविकास आघाडी मधील घटक पक्ष राष्ट्रवादी
    काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथराव शिंदे गट यांना होऊ शकतो पण मनोज जरांगे पाटील हे खरोखरच दोनशे उमेदवार उभे करतील काय याबद्दल अजून स्पष्टता नाही
    जर मनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patil) यांनी आपले उमेदवार उभे केले नाही तर मात्र याचा फटका महायुतीला बसू शकतो पण जर मनोज रंगे पाटील यांनी आपले
    उमेदवार उभे केले तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो त्यामुळे आता महाविकास आघाडी मनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patil) यांनी उमेदवार उभे करू नये
    म्हणून प्रयत्न करतील तर महायुती हे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी आपले उमेदवार जरूर उभे करावे यासाठी प्रयत्न करतील आता शेवटी निर्णय हा मनोज जरांगे पाटील
    व राज ठाकरे यांना घ्यायचा आहे पुढे पाहू या की काय निर्णय घेतात पण महायुतीने आखलेल्या योजनेला महाविकास आघाडी कशा पद्धतीने खोडून काढतील हे पाहावे लागेल

    Post Views: 225
    manoj jarange patil maratha reservation Raj Thackeray
    Add A Comment

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024926 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024579 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024885 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024366 Views

    गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज

    September 7, 2024686 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024926 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024579 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024885 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    148332
    Views Today : 1230
    Who's Online : 1
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.