महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका(Maharashtra Legislative Assembly Elections)कधी होणार याविषयी सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे पण निवडणुका नेमका कधी होणार ? राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू होणार ? निवडणुका झाल्या तर त्याची अंदाजे तारीख काय असेल ?आचारसंहिता कधीपासून लागेल? याविषयी आपण चर्चा करूया
सध्या सर्वच राजकीय पक्षांना विधानसभेच्या निवडणुकीचे (Maharashtra Legislative Assembly Elections)वेध लागलेले आहेत आणि त्या संदर्भात तयारी सुद्धा जोरात चालू आहे पण नेमकी निवडणूक कधी होईल याविषयी स्पष्टता येण्यासाठी आणखीन काही दिवस लागतील 27 व 28 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचे(Central Election Commission)पथक हे महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहे विधानसभेची निवडणूक(Maharashtra Legislative Assembly Elections)घेण्याचे अधिकार हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission)असतात
या पथकाची प्रमुख कामे राज्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची एक बैठक घेतात व या बैठकीमध्ये महत्त्वाच्या सूचना या अधिकाऱ्यांना दिल्या जातात विधानसभेच्या निवडणुका(Maharashtra Legislative Assembly Elections)कशा होतील याविषयी संपूर्ण आढावा हे पथक दोन दिवसांमध्ये घेईल सर्व बाजूने चर्चा झाल्यानंतर हे पथक केंद्रीय निवडणूक आयोगाकडे(Central Election Commission) जाऊन आपला अहवाल सादर करेल व त्यानंतर महाराष्ट्रामध्ये निवडणुका(Maharashtra Legislative Assembly Elections)घेण्यासाठी पोषक वातावरण आहे त्यानंतर लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका(Maharashtra Legislative Assembly Elections)होण्याची शक्यता आहे तसेच महाराष्ट्र सोबत झारखंड या राज्याची सुद्धा विधानसभेची निवडणूक होणार आहे हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे(Central Election Commission)पथक हे महाराष्ट्रात येण्यापूर्वी झारखंड राज्याचा दौरा करणार आहेत 23 आणि 24 सप्टेंबरला ते झारखंडच्या दौऱ्यावर आहेत झारखंड राज्याची विधानसभेची मुदत ही 5 जानेवारी पर्यंतची आहे तर महाराष्ट्राची विधानसभेची मुदत ही 27 नोव्हेंबर पर्यंत आहे त्याआधी या दोन्ही राज्यांमध्ये नव सरकार स्थापन होणे गरजेचे आहे म्हणून या दोन राज्याच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता अधिक आहे
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अंदाजे कधी ?
(When are the Maharashtra Assembly elections approximately?)
27,28 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक यांचामहाराष्ट्र दौरा त्यानंतर जवळपास पंधरा दिवसाच्या आत केंद्रीय निवडणूक आयोग(Central Election Commission)पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या(Maharashtra Legislative Assembly Elections)तारखा जाहीर करतील पण सध्या हरियाणा आणि जम्मू कश्मीर या दोन राज्यांमध्ये निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुका आठ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहेत त्यामुळे हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे(Central Election Commission) पथक आपला अहवाल दिल्यानंतर आठ ऑक्टोबरच्या नंतरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या(Maharashtra Legislative Assembly Elections) तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर साधारणता 40 दिवस निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी लागतील म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका राज्यात पार पडतील अशी शक्यता आहे
केंद्रीय निवडणूक आयोगा(Central Election Commission)मधील कर्मचारी हे सध्या जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्याच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहे त्याआधी सुद्धा पत्रकार परिषद होऊन निवडणुका जाहीर होऊ शकतात तसेच अंदाजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात कारण 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे त्याआधी नवीन सरकार हे राज्यात आले पाहिजे 26 नोव्हेंबर रोजी पहिले अधिवेशन देखील झाले पाहिजे असे झाले नाही तर समजा 26 नोव्हेंबर पर्यंत जर सरकार स्थापन झाले नाही तर मग मात्र राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू होईल म्हणूनच 26 नोव्हेंबर च्या आधी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या(Maharashtra Legislative Assembly Elections)निवडणुका होऊन निकाल लागून सरकार स्थापन होणे गरजेचे आहे त्यामुळेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात?
केंद्रीय निवडणूक आयोगाचे(Central Election Commission)पथक हे महाराष्ट्रात येत आहे पण गंमत म्हणजे महाराष्ट्र चे निवडणूक आयुक्त कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही कारण पाच सप्टेंबर 2024 हे पद रिक्त आहे त्यापूर्वी युपीएस मदन हे निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे तसं पाहायला गेलं तर राज्य निवडणूक आयुक्त व विधानसभेच्या निवडणुका यांचा संबंध नसतो कारण या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाच्या(Central Election Commission)वतीने घेतल्या जातात सध्या राज्य निवडणूक आयुक्तांचा अतिरिक्त कारभार हा स्टेट इलेक्शन कमिशनर सेक्रेटरी सुरेश काकांनी यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार आहे राज्य निवडणूक आयुक्तांचा निवड ही राज्य मंत्रिमंडळ करत असते त्याचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात
केंद्रीय निवडणूक आयोग हे लोकसभा तसेच विधानसभा या निवडणुका पार पाडतात तर राज्य निवडणूक आयोगाकडे स्थानिक राज्य संस्था या निवडणुकांची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगाकडे असते
निवडणुकीच्या तारखांमुळे विरोधकांचे आरोप ?
लोकसभेच्या निवडणुका या सात टप्प्यांमध्ये संपूर्ण देशात घेण्यात आल्या होत्या जेव्हा या तारखा जाहीर झाल्या तेव्हा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फायदा व्हावा म्हणूनच सात टप्प्यांमध्ये निवडणुका होत असल्याचा आरोप केला होता तसा चा काही आरोप हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या(Maharashtra Legislative Assembly Elections)वेळेस होत आहे सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका(Maharashtra Legislative Assembly Elections) या दोन टप्प्यात होतील असा अंदाजा हा व्यक्त केल्याच्या चर्चा आहेत पण याची शक्यता फार कमी आहे मागील विधानसभा निवडणुकीच्या इतिहास पाहिला तर फक्त दोनच वेळा महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या बाकी एकाच टप्प्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका(Maharashtra Legislative Assembly Elections)पार पडलेल्या आहेत राज्यामध्ये निवडणुका कधी घ्यायचा हे केंद्रीय निवडणूक आयोग ठरवेलच पण राज्यात निवडणुका एका टप्प्यात होतात की दोन टप्प्यात होतात हे आता पहावे लागेल
सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रचाराची धामधूम(During the festive season, there is a lot of publicity)
ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये दसरा तसेच दिवाळी हे दोन मोठे सण आहेत नवरात्र त्या पाठोपाठ दिवाळी या सणांमुळे प्रचार करताना राजकीय नेत्यांची चांगलीच धावपळ होणार आहे 12 ऑक्टोबरला दसरा तर 30 ऑक्टोबरला दिवाळी हे सण येत आहेत निवडणुकांच्या तारखा या दसऱ्याच्या नंतर जाहीर होतील तर दिवाळी ही ऐन प्रचारामध्ये येईल नवरात्री मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही किती महिलांपर्यंत सत्ताधारी पोहोचविण्या मध्ये यशस्वी होतात हे प्रचारामध्ये मुख्य मुद्दा असू शकतो त्यानंतर येणाऱ्या दिवाळीमध्ये नेमके दिवाळीच्या नंतर कुठल्या राजकीय पक्षांना फटाके फोडण्याची संधी मिळते याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष असे दिवाळी दसरा या सणांची लगबग व त्यामध्ये निवडणुकीचा प्रचार कसा होतो ते आता पहावे लागेल
आता पहावे लागेल की 27 व 28 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पाहणी दौऱ्यानंतर कशा पद्धतीने हालचालींना वेग येतो विरोधकांनी हाही आरोप केला आहे की सत्ताधारी पक्ष हे निवडणुका पुढे ढकलण्याच्या विचारात आहे पण याची शक्यता सध्या तरी दिसत नाही निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने(Central Election Commission)कामाला सुरुवात केल्याचे दिसत आहे त्यामुळे ठराविक वेळेमध्येच महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतील अशी दाट शक्यता आहे
वरील सर्व तारखांचा जर आपण विचार केला तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या(Maharashtra Legislative Assembly Elections)निवडणुका या पार पडतील व त्यानंतर नव सरकार देखील स्थापन होईल अशी शक्यता सध्या दिसत आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष सध्या निवडणुकीच्या कामाला लागले आहेत आणि आपापल्या उमेदवाराचे निवड करणे व राज्यस्तरावर प्रमुख राजकीय पक्ष व त्यांचे घटक पक्ष या सर्वांमध्येच जागा वाटपाबाबत चर्चा या शेवटच्या टप्प्यावर आहेत आपले उमेदवार आधी घोषित करून त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे काही राजकीय पक्षांनी आपले उमेदवारांची यादी देखील जाहीर केलेली आहे
तसेच जम्मू कश्मीर आणि हरियाणा मधील निवडणुकीच्या नंतर केंद्रीय निवडणूक आयोग(Central Election Commission)देखील महाराष्ट्र व झारखंड राज्याच्या निवडणुकांसाठी तयारीला लागेल
26 नोव्हेंबर पर्यंत राज्यामध्ये नव सरकार येईल की राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू होईल याविषयी सध्या राज्यामध्ये गावागावांमध्ये याच चर्चा चालू आहेत मतदार आता नेमका कौल महायुतीच्या बाजूने देणार की महाविकास आघाडीच्या बाजूने देणार की तिसरा पर्याय म्हणून तिसरी आघाडी किती जागा घेणार याविषयी प्रसार माध्यम तसेच सोशल मीडिया मध्ये चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे आता हे पहावे लागेल की महाराष्ट्रातली जनता ही कोणाच्या बाजूने कौल देते