नवी दिल्ली -महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION)निवडणुकांच्या तारखा आज जाहीर झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागली आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले
नवी दिल्ली मधील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या याप्रसंगी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) व झारखंड या दोन राज्याच्या निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर केले यापासून ही बोलताना राजीव कुमार यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे सांगितले महाराष्ट्रामध्ये
हेही वाचा-http://नारायण गडा वरील दसरा मेळावा महाराष्ट्राची राजकीय समीकरण बदलणार का? https://sankalptoday.com/will-the-dasara-mela-at-narayan-fort-change-the-political-equation-in-maharashtra/
विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही 20 ऑक्टोबर पासून सुरू होईल यामध्ये 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल तर 4 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येतील महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) विधानसभेच्या मतदानाची प्रक्रिया ही 20 नोव्हेंबर रोजी होईल तर मतमोजणी ही 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघ एकाच टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल
हेही वाचा-http://या तीन विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार नात्यानं मधील राजकीय संघर्ष ? https://sankalptoday.com/in-these-three-assembly-constituencies-will-be-seen-the-political-conflict-between-the-relations/
तसेच दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक देखील विधानसभे सोबतच होईल नांदेड लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर तर अर्ज मागे घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर मतदान 20 नोव्हेंबर आणि मतमोजणी 23 नोव्हेंबरला होईल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) मध्ये मतदान केंद्राची संख्या ही शहरी भागामध्ये 42604 एवढी असेल तर ग्रामीण भागामध्ये मतदार केंद्राची संख्या ही 57582 एवढी असेल
प्रचारासाठी मिळाली फक्त 14 दिवस
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) विधानसभा निवडणुकीच्या तारखा चार नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज वापस घेता येणार आहेत तर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे म्हणजे उमेदवारांना प्रचार करण्यासाठी फक्त 14 दिवस एवढाच वेळ मिळेल एवढ्या कमी कालावधीमध्ये मतदारांपर्यंत उमेदवारांना पोहोचावे लागणार आहे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) विधानसभा मतदारसंघांचा जर आपण विचार करायला गेलो तर राज्यामध्ये एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत व यामध्ये एकूण 9 कोटी 63 लाख मतदार आहेत की जे विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावतील यामध्ये पुरुष मतदार 4 कोटी 97 लाख एवढे मतदार आहेत तर या एकूण मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या आहे चार कोटी 66 लाख या महिला मतदार आहेत
https://youtube.com/shorts/vTTEATUEPi0?feature=share
तर दिव्यांग मतदारांची संख्या सहा लाख बत्तीस हजार आहे आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) विधानसभा निवडणुकीमध्ये तृतीयपंथी मतदारांची संख्या 56 हजार पेक्षा जास्त आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये महिला मतदारांची संख्या जास्त आहे त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांपुढे महिला मतदार आपल्याकडे मतदान करण्यासाठी कसे वळवायचे यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपला जोर लावणार आहेत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा कितपत फायदा हा महायुतीला होऊ शकतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत
तसेच या विधानसभा निवडणुकीमध्ये शंभरी ओलांडलेल्या मतदारांची संख्या ही 50000 च्या आसपास आहे
तर वयाची 85 पूर्ण केलेल्या मतदारांची संख्या ही 12 लाख 48 हजार एवढी आहे
तसेच या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवीन मतदारांची संख्या ही 19 लाख 48 हजार एवढी आहे
वरील आकडेवारीचा आपण अभ्यास केल्यास लक्षात येते की नवं मतदार आपला पहिला मतदानाचा हक्क बजावताना कुठल्या गोष्टींचा विचार करून मतदान करतील याविषयी प्रत्येक राजकीय पक्षाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे
मागील काही निवडणुकींमध्ये महाराष्ट्रात मतदान किती टप्प्यात झाले
लोकसभेला महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले होते तर विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग किती टप्प्यांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) राज्यात निवडणुका येतात याविषयी सर्वत्र चर्चांना उधान आले आहे
2004 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली होती 13 ऑक्टोबर रोजी मतदान झाले तर 17 ऑक्टोबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली होती
2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली होती 13 ऑक्टोबरला मतदान झाले तर 22 ऑक्टोंबर रोजी मतमोजणी करण्यात आली
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एका टप्प्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली होती 15 ऑक्टोबर रोजी मतदान झाले तर 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली होती 21ऑक्टोबर रोजी मतदान झाले तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली होती
मागील वीस वर्षाचा आपण निवडणुकीचा इतिहास पाहायला गेलो तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे
कोणत्या पक्षाकडे किती जागा आहेत
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडवून गेल्या त्यामध्ये आजच्या स्थितीला कोणत्या पक्षाकडे किती आमदार आहेत
भारतीय जनता पार्टी 105
शिवसेना शिंदे गट 40
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 42
शिवसेना ठाकरे गट 16
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 12
काँग्रेस 44
माकप 1
ए एम आय एम 2
रासप 1
सपा 2
प्रहार 2
जनसुराज्य 1
शेकाप 1
स्वाभिमानी 1
अपक्ष 13
राज्यात निवडणुका जशा जाहीर झाल्या तसा अनेक राजकीय घडामोडींना उपयोग येताना दिसत आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फार्मूला हा जवळपास फायनल झाल्याची कळत आहे म्हणजे कोण किती जागा लढणार हे जवळपास निश्चित झाले असल्याची चर्चा आहे आता उमेदवारांची घोषणा उमेदवारी यादी या लवकरात लवकर येतील व त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये कशी लढत होणार हे स्पष्ट होईल
29 नोव्हेंबर 2024 पर्यंत नव सरकार स्थापन होणे गरजेचे आहे निवडणुकीच्या निकालाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता येणार महायुतीची कि माहाविकास आघाडीची कोणाला स्पष्ट बहुमत येणार आणि जर एकाही पक्षाला जर स्पष्ट बहुमत नाही आले तर राष्ट्रपती राजवट लागेल काय याविषयी सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे
यंदा दिवाळी ही 29 ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत आहे म्हणजे प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली दिवाळीनंतरच होईल महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची खरी रंगत ही दिवाळीनंतर पाहायला मिळेल