भारताचे माजी गृहमंत्री व उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च बहुमान देण्याचा निर्णय झाला आहे
स्वतः नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली व लालकृष्ण अडवाणी यांचे घरी जाऊन अभिनंदन केले व ते फोटो मीडियामध्ये शेअर केले
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची मध्ये झाला त्यांच्या आईचे नाव ज्ञानी अडवाणी तसेच वडिलांचे नाव के डी आडवाणी असे होते
नंतर ते भारतात आले व पुढील शिक्षण त्यांनी भारतात केले आडवाणी हे लॉ ग्रॅज्युएट आहेत त्यांच्या पत्नीचे नाव कमला अडवाणी
शिक्षणानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला व ते 1986 मध्ये ते बीजेपीचे अध्यक्ष झाले
बीजेपी चे संस्थापक सदस्य होते
सक्रिय राजकारणामध्ये असताना त्यांनी रथयात्रा काढून बीजेपीला पहिल्यांदा सत्तेत बसविले व ते
केंद्रीय मंत्री झाले भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री तसेच उपपंतप्रधान अशा दोन्ही बाजू सांभाळल्या
लालकृष्ण आडवाणी हे पाच वेळा लोकसभेत तर चार वेळा राज्यसभेवर निवडून आले आहेत
आज लागली हे 97 वर्षाचे आहेत व आता त्यांना भारत देशातील सर्वोच्च असा बहुमान भारतरत्न मिळाला आहे