मुंबई- स्टॅन्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा(Kunal Kamra)च्या एका शोमध्ये कुणाल कामरा(Kunal Kamra)नी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे(Eaknathrao Shinde) यांचं नाव न घेता व्यंगात्मक गाणं गायलं व तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रकाशित झाला या गाण्यांमध्ये गद्दार असा उल्लेख केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले व त्यांनी कामराच्या स्टुडिओची तोडफोड देखील केली व कुणाल कामरा(Kunal Kamra)यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे

कुणाल कामरा ने (Kunal Kamra)त्याच्या स्टुडिओमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे(Eaknathrao Shinde) यांचे नाव न घेता एक गाणं गायलं व ते सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या स्टुडिओ ची तोडफोड देखील केली कुणाल कामरा ने (Kunal Kamra) गायलेल्या या गाण्याला पॅरडी सॉंग असं म्हणतात ज्यांनी अशा प्रकारची गाणी ऐकली हे त्यांना याची कल्पना आहे हे गाणं ज्या ठिकाणी रेकॉर्ड झालं व ज्या ठिकाणाहून हे गाणं प्रसारित झालं मुंबईमधील खार भागात असलेले स्टुडिओची तोडफोड शिवसैनिकांनी केली यानंतर आमदार मुर्जी पटेल यांनी कुणाल कामराच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तसेच तोडफोड करणाऱ्या शिवसैनिक आणि विरुद्ध सुद्धा तक्रार दाखल झाली आहे पोलीस कुणाल कामरा चा शोध घेत आहेत

नेमका वाद का झाला?
कुणाल कामरा(Kunal Kamra)यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे(Eaknathrao Shinde) यांची खील्ली उडवत आपल्या कॉमेडी मधून निशाणा साधला यामध्ये त्यांनी एकनाथराव शिंदे(Eaknathrao Shinde) यांचे थेट नाव घेतले नाही पण दिल तो पागल या चित्रपटातील भोली सी सुरत आखो मे मस्ती या गाण्याच्या चालीवर कुणाल कामराणे एक गाणं रचलं व ते गायलं ज्यामध्ये ठाणे की रिक्षा चेहरे पर दाढी आँख पर चष्मा…. मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये…. या गाण्यामध्ये एकनाथराव शिंदे(Eaknathrao Shinde) यांचा नाव न घेता पण एकंदरीत आपण या गाण्याचे बोल पाहिले तर त्याचा रोख हा एकनाथराव शिंदे(Eaknathrao Shinde) यांच्याकडे असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे उल्लेख गद्दार म्हणून केला
याच प्रकरणाचे आज अधिवेशना दरम्यान पडसाद उमटले मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कुणाल कामरा (Kunal Kamra)च्या प्रकरणावर बोलताना प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण त्यासोबत काही मर्यादा देखील आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी ठरवलेले आहे की खरी शिवसेना कोणाची त्यामुळे आता अशा पद्धतीचे विधान करणे चुकीचे आहे आणि अशा पद्धतीची एखाद्या लोकप्रिय मंत्र्यावर टीका सहन केली जाणार नाही कुणाल कामरा (Kunal Kamra)वर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले या प्रकरणावरून आज शिवसेनेचे आमदार तसेच सत्ताधारी पक्षाचे आमदार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले
आदित्य ठाकरे यांची पोस्ट https://x.com/AUThackeray/status/1903870352150937790?t=BnU29GRS9EQA7nLxs76fQA&s=19
पण या प्रकरणावर विरोधी पक्षाचे मान्य काही वेगळे आहे संजय राऊत आदित्य ठाकरे यांनी कुणाल कामरा(Kunal Kamra) यांची पाठराखण केली आहे याच्या गाण्यांमध्ये काहीही गैर नाही असे सांगितले कुणाल कामराज (Kunal Kamra)च गाण्यातून शंभर टक्के सत्य मांडलं
संजय राऊत यांची पोस्ट
https://x.com/rautsanjay61/status/1903825389279228272?t=n5q8jSBVcFPkQs-CJiSsEA&s=19
खासदार संजय राऊत यांनी देखील कुणाल कामरा (Kunal Kamra)ची पाठराखण करत कुणाल की कमाल जय महाराष्ट्र अशी पोस्ट करून त्याखाली कुणाल कामरा (Kunal Kamra)ने गायलेले ते गाणे देखील पोस्ट केले त्यामुळे आता वाद वाढण्याची शक्यता आहे
कुणाल कामरा काय म्हणतो ?

आज कुणाल कामरा (Kunal Kamra)ने हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन एक फोटो शेयर केला आपण कुठल्याही कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत अशा आशयाची एक पोस्ट केली ?
कुणाल कामरा (Kunal Kamra)च्या त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला महाराष्ट्र इलेक्शन मे इन्होने जो किया है बोलना पडेगा शिवसेना बीजेपी से बहार आ गई एन सी पी एनसीपी से बहार आ गई एक वोटर को 9 बटन दिये गये सब कन्फ्युज हो गये यानंतर कुणाल कामराने (Kunal Kamra) ते गाणं गायलं
महानगरपालिकांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर आहेत आणि या गाण्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत तर कुणाल कामरा (Kunal Kamra)देखील आपल्या विधानावर ठाम आहे ? कुणाल कामरा(Kunal Kamra)ने उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे(Eaknathrao Shinde) यांची माफी मागावी असे म्हणत आहेत तर कुणाल कामरा (Kunal Kamra)देखील जी कारवाई होईल त्याला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याची चर्चा आहे त्यामुळे हा वाद पुढे वाढण्याची दाट शक्यता आहे माजी खासदार संजय निरुपम यांनी कुणाल कामरा (Kunal Kamra)वर चांगलीच टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे
मागील काही दिवसापासून स्टॅन्ड अप कॉमेडियन कुठल्या ना कुठल्या वादाला सामोरे जात आहेत आणि यातून नवावाद निर्माण होत आहे आपण बोलताना दुसऱ्याच्या भावना दुखावू नये हे सांभाळणं प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे संविधानाने आपल्या मत मांडण्याची अधिकार दिलेला आहे पण त्यासोबतच आपलं मत मांडत असताना काही मर्यादा देखील आपण पाळल्या पाहिजेत हेही तितकच खरं