मुंबई – मुंबईमधील सर्वात जुने रुग्णालय म्हणून ज्याची नोंद आहे ते रुग्णालय जे जे हॉस्पिटल(J. J. Hospital) हे आहे पण याच जे जे हॉस्पिटल(J. J. Hospital)ची ओळख ही प्रॉपर्टी कार्डवर ब्रिटिशांची(British Govt)संपत्ती म्हणून होती ती आता ओळख पुसली जाणार आहे व या जागी शासनाचे नाव येणार आहे
मुंबईमधील सगळ्यात मोठे हॉस्पिटल म्हणून सर जेजे रुग्णालय(J. J. Hospital)चे नाव येते 46 एकरांवर उभारलेलं हे हॉस्पिटल याचे बांधकाम 1845 मध्ये ब्रिटिश कालीन सरकार च्या काळात झाले होते व या वास्तूला आता 180 वर्ष पूर्ण झाले आहेत आजही लाखो गरीब रुग्णांसाठी जे जे हॉस्पिटल(J. J. Hospital)म्हणजे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे या जागी संपूर्ण महाराष्ट्रातून तर रुग्ण येतातच पण बाहेरील राज्यांमधील सुद्धा रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येतात ते मुंबईमधील सर्वात नावाजलेले रुग्णालय आहे
या रुग्णालयाचे नाव सर जमशेदजी जिजाभाई यांच्या नावाने आहे 1783 मध्ये जमशेदजी यांचा जन्म एका गरीब पारसी परिवारामध्ये झाला
पण 1799 मध्ये जमशेदजी यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचे वय सोळा वर्षे होते यानंतर त्यांनी आपल्या मामाचा व्यवसाय चालविण्यासाठी ते मुंबईला आले त्यांच्या मामांचा बाटल्याचा व्यवसाय असल्यामुळे त्यांचे आडनाव त्यांनी बाटलीवाला असं केले सर जेजे हे त्यांच्या सही सुद्धा बाटलीवाला म्हणून करत असत
जमशेदजी वीस वर्षाचे असताना त्यांनी त्यांच्या मामाच्या मुलीशी विवाह केला त्यांचे नाव आवाबाई होते
आणि मग खऱ्या अर्थाने जमशेदजीने व्यवसायाला सुरुवात केली त्यांच्या मामांच्या परंपरागत व्यवसायाला त्यांनी त्यांच्या विचारांची जोड दिली चीन इंग्लंड यासारख्या देशांमध्ये जाऊन त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायांचा अभ्यास करायला सुरुवात केली पण याच काळामध्ये मोठे युद्ध जगामध्ये चालू होते या प्रवासाच्या दरम्यान जमशेदजी दोनदा वाचले याच दरम्यान त्यांची ओळख ब्रिटिश सेवेत असलेल्या एका डॉक्टरशी झाली त्यांचे नाव विलियम जारडीन यांच्यासोबत जमशेदजीने हाँगकाँग मध्ये एका व्यवसायाची सुरुवात केली व्यवसायाची भरभराट झाली व जमशेदजी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारूपास आले
जमशेदजी यांनी हळूहळू समाजसेवा करायला सुरुवात केली आणि यामध्ये त्यांनी शाळा कॉलेजेस व रुग्णालय बांधायला सुरुवात केली भरपूर पैसा असल्यामुळे जमशेदजींना या सर्व गोष्टी सहज शक्य होत होत्या मग त्यांनी त्या काळामध्ये मुंबईचे नाव बॉम्बे होते व व जमशेदजींनी रुग्णालय बांधण्यासाठी गोवर्नर ऑफ बॉम्बे यांच्याशी संपर्क केला या बैठकीमध्ये गव्हर्नर हे आश्चर्यचकित झाले की एक भारतीय व्यक्ती एवढे मोठे रुग्णालय बांधायची स्वप्न कसा पहात आहे कारण जमशेदजी गव्हर्नर ऑफ बॉम्बेला सांगत होते की हॉस्पिटल कसे बांधायचे व यासाठी पैसे देण्यासाठी सुद्धा जमशेदजी तयार होते मग ब्रिटिश गव्हर्नर ने अट घातली की हे सर्व काम हे त्यांच्या मार्गदर्शना खाली होईल यासाठी त्यांनी 46 एकराची जमीन सुद्धा दिली
तसेच जमशेदजी यांना कलेची फार आवड होती म्हणून त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट ची स्थापना केली आजही जेजे स्कूल ऑफ आर्ट हे जगातील नावाजलेलं कॉलेज आहे
तसेच जमशेदजींनी त्याकाळच्या वर्तमानपत्रांना सुद्धा मदत केली त्याकाळचे बॉम्बे टाइम्स की जे पुढे टाइम्स ऑफ इंडिया झाले
यानंतर ब्रिटिश सरकारने(British Govt)1942 मध्ये जमशेदजी यांना ब्रिटिश सरकार (British Govt)मध्ये सर्वात मोठा बहुमान असलेले सर ही पदवी दिली आणि यानंतर जमशेदजी सर जमशेदजी जिजा भाई झाले तसेच यानंतर सर ही पदवी जमशेदजी यांच्या पुढील सर्व पिढ्यांना लागली आज देखील जमशेदजी यांचे वंशज रुस्तमजी माणिकजी हे टाटा सन्स या कंपनीमध्ये डायरेक्टर पदावर आहेत
मुंबई जी सात बेटांमध्ये विभागलेली होती त्या मुंबईला जोडण्याचं काम देखील सर जमशेदजी जिजाभाई
यांनी केले होते आजही आपण मुंबईमध्ये फिरत असताना आपण अनेक गोष्टी या जे जे नावाने सुरू झालेल्या पाहायला मिळतात जे जे फ्लाय ओव्हर जे जे हॉस्पिटल(J. J. Hospital) जे जे स्कूल ऑफ आर्ट
जे जे हॉस्पिटल ची सुरुवात(Beginning of JJ Hospital)
गव्हर्नर ऑफ बॉम्बे यांच्याशी संपर्क करून सर जेजे यांनी एक रुग्णालय बांधण्याची इच्छा व्यक्त केली की ज्यामध्ये श्रीमंतांसोबत गरिबांना सुद्धा इलाज घेता येईल ही संकल्पना बॉम्बे गव्हर्नरला आवडली त्यांनी 46 एकरची जागा दिली व 1845 मध्ये जे जे हॉस्पिटलचे बांधकाम होऊन पूर्ण झाले
त्यावेळी जे जे हॉस्पिटल ची 46 एकर जागा ही सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया इन कौन्सिल यांच्या नावे होती तसेच मालकीही ब्रिटिश सरकारची(British Govt)होती
अशा पद्धतीने 1845 मध्ये जे जे हॉस्पिटलचे(J. J. Hospital)बांधकाम पूर्ण होऊन तेथे उपचार ला सुरुवात झाली पुढे याच संस्थेचे वटवृक्ष झाले आज मेडिकल कॉलेज डेंटल कॉलेज आणि मोठे रुग्णालय यामुळे गोरगरीब जनतेचा फायदा झाला सर जेजे यांनी केलेले बांधकाम व त्यांनी फक्त जे जे हॉस्पिटलचे(J. J. Hospital)बांधकाम नाही केले तर त्याच पद्धतीने त्यांनी सर जेजे समूह रुग्णालयाच्या मध्ये जे जे हॉस्पिटल सेंट जॉर्जेस रुग्णालय कामा रुग्णालय यासारखी मोठी रुग्णालय त्यांनी बांधली आजही ही रुग्णालय रुग्णसेवेचे काम करीत आहेत व याच रुग्णालयांमधून चांगल्या डॉक्टरचे प्रशिक्षण सुद्धा पूर्ण होत आहे
वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे जे हॉस्पिटल(J. J. Hospital)मध्ये प्रवेश मिळणे म्हणजे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाते सर जमशेदजी जिजा भाई यांचे निधन 14 एप्रिल 18 59 मध्ये झाले जे जे रुग्णालया मधून शिक्षण घेतलेले डॉक्टर हे संपूर्ण भारतामध्ये आपली छाप सोडत आहेत व तसेच अत्यंत कमी दरामध्ये येथे रुग्णांवर आजही उपचार सुरू आहे आज या रुग्णालयाची देखरेख ही ब्रिटिश सरकार(British Govt)गेल्यानंतर भारत सरकार या रुग्णालयाची देखभाल करते व ते रुग्णालय चालवते पण 76 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी(British Govt)आपला देश सोडला पण 180 वर्षानंतर सुद्धा जे जे रुग्णालयात(J. J. Hospital)ची 46 एकर जमिनीच्या मालकी हक्क व प्रॉपर्टी कार्ड हे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया इन कौन्सिल यांच्या नावाने आहे पण आता ब्रिटिशांची(British Govt)ही मालकी आता पुसली जाणार आहे व लवकरच सर जेजे रुग्णालयाच्या (J. J. Hospital) प्रॉपर्टी कार्डवर लवकरच शासनाचे नाव दिसेल
सर जेजे रुग्णालयाचे(J. J. Hospital)आयुक्त राजीव निवतकर यांनी प्रसार माध्यमांची बोलताना सांगितले की सर जेजे रुग्णालयाच्या(J. J. Hospital)प्रॉपर्टी कार्डवर ब्रिटिशांच्या(British Govt)नावाऐवजी शासनाचे नाव यावे यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न चालू आहेत लवकरच या प्रयत्नांना यश येईल व ब्रिटिश सरकारची मालकी संपून शासनाच्या नावाने हे प्रॉपर्टी कार्ड निघेल या संदर्भातले सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत अशी माहिती निवतकर यांनी दिली आहे
एक वर्षाखाली जे जे रुग्णालयाच्या(J. J. Hospital) डागडुजीचे काम चालू असताना या ठिकाणी 130 वर्ष जुने एक भुयार सापडले आहे 180 वर्ष जुन्या इमारतीमध्ये आणखीन काय काय आहे याचा अंदाजा येणे कठीण आहे
मुंबई व महाराष्ट्रावर कुठलेही बिकट संकट आल्यानंतर सर्वात मोठा आधार वाटतो सर जेजे हॉस्पिटल(J. J. Hospital)चा कोरोना काळामध्ये सुद्धा या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांचे प्राण वाचवायचे काम केले कार्यतत्परता असल्यामुळे या रुग्णालयाचे नाव हे मोठे आहे संकट कुठले जरी असले तरी जे जे हॉस्पिटल(J. J. Hospital)हमेशा रुग्णसेवेला तयार राहते व आता शासनाने घेतलेल्या पुढाकारामुळे आपलं हक्काचं रुग्णालय आता ब्रिटिशांचं(British Govt) नाव न राहता ते आपलं होणार आपल्या शासनाचं होणार यामुळे मुंबईकरांच्या तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण आहे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होऊन सर जेजे हॉस्पिटलच्या(J. J. Hospital)प्रॉपर्टी कार्डवर शासनाचे नाव यावे हीच अपेक्षा सर्वांची आहे 180 वर्ष त्यानंतर ही प्रॉपर्टी भारताची होणार आहे आणि ब्रिटिशांची(British Govt)मालकी आता पुसली जाणार आहे 76 वर्षांपूर्वी ब्रिटिश जाऊन देखील ही संपत्ती ब्रिटिशांच्याच(British Govt)नावाने होती ती आता आपल्या शासनाच्या नावाने होणार आहे यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत आता ही प्रॉपर्टी शासनाच्या नावाने कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे