हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ज्या ठिकाणी स्वतः देवाधिदेव महादेव वास्तव्यास असलेल्या कैलास पर्वताची होणारी यात्रा म्हणजेच कैलास मानसरोवर यात्रा(KAILAS MANSAROVAR YATRA)ही परत एकदा सुरू होणार आहे आणि यामुळे भगवान महादेवाला मानणाऱ्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

देवाधिदेव महादेवांचे वास्तव्य असलेल्या कैलास पर्वताचे दर्शन घेण्यास जाण्यासाठी जाणाऱ्या यात्रेला कैलास मानसरोवर यात्रा(KAILAS MANSAROVAR YATRA)असं म्हटलं जातं 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये भारत(INDIA) आणि चीन(CHINA) या दोन देशांमधील सैनिकांमध्ये झालेली चकमक आणि या चकमकीच्या नंतर भारत(INDIA) आणि चीन(CHINA) या दोन देशांमध्ये संबंध हे कमालीचे ताणले गेले आणि याचाच राग मनात धरून चीन(CHINA)ने कैलास मानसरोवर यात्रा(KAILAS MANSAROVAR YATRA)बंद केली व या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना चीन(CHINA)मध्ये प्रवेश नाकारला आणि त्यामुळे कैलास मानसरोवर ची यात्रा ही बंद पडली पण पाच वर्षानंतर बीजिंग येथे भारत(INDIA) आणि चीन(CHINA) यांच्या परराष्ट्र सचिवाच्या बैठकीमध्ये कैलास मानसरोवर यात्रा(KAILAS MANSAROVAR YATRA)परत सुरु करण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती दर्शवली भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे सध्या दोन दिवसीय चीन(CHINA)दौऱ्यावर बीजिंग येथे गेले आहेत याच ठिकाणी चीन(CHINA)चे परराष्ट्र उपमंत्री सुन वेइडॉग यांची व भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री या दोघांमध्ये काही गोष्टींवर सहमती दर्शवली गेली यामध्येच कैलास मानसरोवर यात्रा(KAILAS MANSAROVAR YATRA)परत सुरु करण्यावर ही सहमती झाली आहे

या भेटीदरम्यान मैत्रीपूर्ण संबंधांना सुरुवात झाली आहे तसेच कुठल्या कुठल्या मुद्द्यावर भारत(INDIA) आणि चीन(CHINA) या दोन देशांमध्ये सहमती झाली आहे ते पाहूया
1)भारत(INDIA) आणि चीन(CHINA) या दोन देशांमधून वाहणाऱ्या नद्या या नद्यांमुळे दोन्ही देशांमध्ये संबंध कायमचे तणावाचे राहिलेले आहेत ब्रह्मपुत्रा नदीवर चीन(CHINA) आणखीन एक मोठे धरण बांधणार असल्याची चर्चा आहे पण आता मात्र सीमापार वाहणाऱ्या नद्यांच्या संबंधित माहितीही दोन्ही देशांनी एकमेकांना देण्याबाबतीत भावी काळामध्ये चर्चा होऊ शकतील
2)तसेच भारत(INDIA) आणि चीन(CHINA)मध्ये काही गैरसमज देखील तयार झालेले आहेत हे गैरसमज दूर करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जाणार असल्याचीही चर्चा भारत(INDIA) आणि चीन(CHINA) या दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले यामुळे भारत(INDIA) आणि चीन(CHINA) या दोन देशातील संबंध अधिक घट्ट होतील असा अंदाजा आहे
3)भारत(INDIA) आणि चीन(CHINA) या दोन देशातील राजकीय संबंध हे 75 वर्षे जुने संबंध आहेत हेच औचित्य साधून भारत(INDIA) आणि चीन(CHINA) यांच्या राजकीय संबंधाच्या वर्षपूर्तीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम दोन्ही देशांमध्ये होतील अशी सहमती झाली आहे
4)कैलास मानसरोवर यात्रा(KAILAS MANSAROVAR YATRA)सुरू करण्याबाबत भारत(INDIA) आणि चीन(CHINA) देशा दरम्यान थेट विमान उडद्याने सुरू करण्यासह कैलास मानसरोवर यात्रा(KAILAS MANSAROVAR YATRA)चालू करण्यावरही संमती दर्शवण्यात आली आहे
हे हि वाचा –Mahakumbh mela महा कुंभमेळावाला आज पासून सुरवात
कैलास मानसरोवर यात्रा(KAILAS MANSAROVAR YATRA)परत सुरु होणार ?
2020 मध्ये पूर्व लडाख मध्ये भारत(INDIA) आणि चीन(CHINA) या दोन्ही देशांचे सैनिक गस्त घालत असताना या दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक सुरू झाली आणि यामुळे या दोन्ही देशांचे राजकीय संबंध हे कमालीचे ताणले गेले आणि यामुळेच चीन(CHINA)ने कैलास मानसरोवर यात्रा(KAILAS MANSAROVAR YATRA)बाबतीत भाविकांना परवानगी देणे बंद केले आणि यामुळे कैलास मानसरोवर यात्रा(KAILAS MANSAROVAR YATRA)ही बंद झाली भारतामध्ये अनेक शिवभक्तांनी ही यात्रा परत सुरु करण्यासाठी वारंवार केंद्र सरकारकडे मागणी केली जात होती आणि आता जर सहमती झालेल्या असताना भारताची मध्ये जर थेट विमान सेवा सुरू झाली तर कैलास मानसरोची यात्रा ही अधिक सुखद होईल
कैलास पर्वताला एवढी महत्त्व का ?
कैलास पर्वत हे चीन(CHINA) द्वारा शासीत तिबेट प्रांतात आहे आणि हे कैलास पर्वत पिरॅमिडच्या आकाराचे आहे या ठिकाणी फक्त एकच कैलास पर्वत नाही तर कैलास पर्वताच्या रांगा तेथे आहेत यामधील सर्वात उंच पर्वत हा लुपो गंगरी या पर्वताची उंची 23 हजार 278 फुट एवढी आहे तसंच कैलास पर्वत रांगांमध्ये दुसरा सर्वात मोठा पर्वत म्हणजे ज्याला आपण कैलास पर्वत असे म्हणतो समुद्रसपाटी पासून कैलास पर्वताची उंची ही 22 हजार 28 फूट एवढी आहे तिबेट मध्ये याच पर्वताला माउंट मेरू देखील म्हटले जाते माउंट मेरू याचा अर्थ होतो देवतांचे घर हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार याच ठिकाणी भगवान शंकर आणि माता पर्वतीचे वास्तव्य असल्याचे बोलले जाते आणि कैलास पर्वताचा उल्लेख हा शिवपुराण स्कंद पुराण व मत्स्यपुराणांमध्ये देखील कैलास पर्वताचा उल्लेख आढळतो याला शक्तीपीठ असे देखील म्हटले जाते याच पुरातन ग्रंथांमध्ये कैलास पर्वत हाच पृथ्वीपासून स्वर्गलोकांमध्ये जाण्याचा रस्ता असल्याची देखील सांगितले जाते
तसेच कैलास पर्वताला स्वस्तिक पर्वत देखील म्हटले जाते कारण की भाविकांच्या म्हणण्यानुसार पर्वताच्या दक्षिण मुखावर एक स्वस्तिक चे चिन्ह आहे आज पर्यंत कैलास पर्वतावर कुणीही चढू शकले नाही ज्यांनी ज्यांनी हा प्रयत्न केला ते रस्ता भरटकल्याचे सांगण्यात येते जाते आणि आता चिनी सरकारने या पर्वतावर चढण्यासाठी बंदी घातली आहे कैलास पर्वताच्या बाजूला एक तलाव आहे ज्याला आपण मानसरोवर असं म्हणतो हा सरोवर 320 किलोमीटर एवढा मोठा हा कैलास मानसरोवर आहे समुद्रसपाटीपासून कैलास मानसोरावाची उंची 4500 मीटर एवढी आहे तसेच हे मानसरोवर 90 मीटर खोल असल्याचे देखील सांगितले जाते हिंदू धर्मातील मान्यता नुसार या सरोवराची उत्पत्ती ही भगवान विष्णू यांच्या मनातून झालेली आहे
MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
म्हणूनच याला मानसरोवर असं देखील म्हटलं जातं याच मानसरोवर्षाच्या बाजूला पाच बौद्ध धर्माचे मठ देखील आहेत याच ठिकाणावरून भारतातील चार प्रमुख नद्यांचे उगम देखील होतं कैलास पर्वताच्या दक्षिण मुखावरून कर्नाली या नदीचा उगम होतो कैलास पर्वताच्या पूर्व बाजूला ज्याला अश्वमुख असे देखील म्हटले जाते तेथून ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो तसेच कैलास पर्वताच्या पश्चिम बाजूने सतलज नदीचा उगम देखील होतो तसेच कैलास पर्वताच्या उत्तर बाजूने सिंधू नदीचा उगम होतो याच नदीच्या नावा वरून हिंदू शब्दाचा उगम देखील झाला असे सांगितले जाते तसेच मानसरोवर च्या बाजूला एक आणखीन सरोवर आहे ज्याला राक्षस सरोवर किंवा त्याला रावण ताल देखील म्हटले जाते हा सर्व पूर्णपणे खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे या सरोवरामध्ये एकही माशी नाही आणि त्या लगत असलेल्या मानसरोवर हा गोड्या पाण्याचा सरोवर आहे येथील पाणी हे थंड आणि गोड आहे
कैलास पर्वतापेक्षा सुद्धा उंच असलेल्या माउंट एव्हरेस्टवर आतापर्यंत बऱ्याच जणांनी चढाई केलेली आहे त्यातल्या काही जणांनी तर ऑक्सिजन सिलेंडर न घेता देखील ही चढाई करून दाखविलेली आहे पण तेथील गिर्यारोहकांचे मान्य आहे की कैलास पर्वतावर गिर्यारोहण करणे हे अत्यंत आव्हानात्मक आहे आणि या पर्वतावर चढणं जवळपास अशक्यच आहे तसेच एक गिर्यारोहक यु रकलेज यांनी माउंट एव्हरेस्ट सर केला होता त्यांनी सुद्धा कैलास पर्वत चढण्याचा दोनदा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही आणि त्यांनी सुद्धा हा प्रयत्न बंद केला आणि त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की या पर्वतावर चढणे अशक्य आहे कैलास पर्वतावर चढण्याचा शेवटचा प्रयत्न हा इसवीसन 2001 मध्ये स्पॅनिश गिर्यारोहकांच्या गटाने केला होता पण त्यांना देखील यश आले नाही आणि त्यानंतर चीन(CHINA) सरकारने या पर्वतावर गिरविरोहण करण्यासाठी बंदी घातली याच ठिकाणी भाविक कैलास पर्वताची परिक्रमा करतात याला तीन दिवस लागतात आणि हे अंतर 53 किलोमीटर आहे
कैलास मानसरोवर यात्रेला जाणार कसं
कैलास मानसरोवर यात्रेसाठी भारतातून दोन ठिकाणाहून जाता येते एक सिक्कीम राज्यात ना आणि दुसरं उत्तराखंड राज्यांमधून कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाता येते यासाठी कुमाव मंडल विकास निगम व भारत(INDIA) पर्यटन विकास मंडळ यांच्या वतीने या यात्रेच्या आयोजन केले जाते या यात्रेसाठी 18 वर्षे ते 70 वयोगटातील स्त्री पुरुषांना या यात्रेसाठी जाता येते पण ज्यांना उच्च रक्तदाब हृदया संबंधित आजार आणि मधुमेह असणाऱ्यांना या यात्रेसाठी परवानगी दिली जात नाही यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट असणे अनिवार्य आहे वरील सर्व परवानगीची पूर्तता केल्यानंतर आपण कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाऊ शकतो यासाठी किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो तसेच तिब्बत आणि भारत(INDIA) सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने एक पॅकेज देखील काढण्यात आलेले आहे
वरी सर्व गोष्टींचा विचार करता लवकरात लवकर कैलास मानसरोवर यात्रा(KAILAS MANSAROVAR YATRA)ही सुरू होऊन भारतातील हिंदू भाविकांना कैलास मानसरोची यात्रा करता यावी भारतातील अनेक राज्यांनी कैलास मानसरोवर यात्रेसाठी अनुदानाची देखील घोषणा केलेली आहे त्यामुळे साधारणता दीड ते दोन लाख रुपये लागणारा खर्च हा सुद्धा कमी होऊ शकतो
2 Comments
Pingback: BASANT PANCAMI - माता सरस्वती व भगवान विष्णू यांच्या मध्ये युद्ध का झाले होते ? - Sankalp Today
Pingback: Indian immigrants ला अमेरिकेने लष्करी विमानानं पाठवलं मोदी सरकारकडून विरोध का नाही ? - Sankalp Today