ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला एका व्यक्तीने अडचणीत आणले आहे
ती व्यक्ती कोण आहे ती व्यक्ती आहे सॅम पित्रोदा(Sam Pitroda ) यांच्या एका विधानामुळे काँग्रेसच्या
अडचणीत वाढ झाली आहे
तर भारतीय जनता पार्टीला एक नवीन मुद्दा काँग्रेसवर टीका करण्यासाठी मिळाला आहे आपकी
बार 400 पार चा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत
भारत जोडो यात्रा संपून राहुल गांधी यांनी सुद्धा लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत पण काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये
काँग्रेस सत्तेत आली तर सगळ्यांच्या संपत्तीची ऑडिट व्हावं असं त्यांनी जाहीर केलं यावरच काँग्रेसवर मोठ्या
प्रमाणावर टीका सुरू झाली त्यात आणखीन भर पडली ती सॅम पित्रोदा यांच्या एका वक्तव्यामुळे
सॅम पित्रोदा नेमके आहेत तरी कोण (Who is Sam Pitroda?)
सॅम पित्रोदा(Sam Pitroda) नावावरून जरी त्या ख्रिश्चन वाटत असले तरी त्यांचं मूळ नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा
ते जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा तेथे नाव हे शॉर्ट फॉर्म मध्ये घेण्याची सवय आहे त्यामुळे त्यांचं नाव सॅम पित्रोदा
झालं त्यांचा जन्म 4 मे 1942 ला ओडिसा मधील तिथला गड येथे झाला त्यांचे वडील अत्यंत गरीब होते ते
सुतारकीचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवीत होते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांचे शिक्षण चालू झाले
त्यांच्या संपूर्ण घरावर व सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांच्या जीवनावर महात्मा गांधी व त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो
यामुळे सॅम पित्रोदा हे आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय या उद्देशाने पुढे जाऊ लागले त्यांनी आपले शालेय
शिक्षण हे गुजरात मधून पूर्ण केले त्यानंतर त्यांनी गुजरात मधील सयाजीराव विद्यापीठ वडोदरा येथून मास्तर
डिग्री फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पूर्ण केली
नंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले व तिथे त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियर ची
डिग्री शिकागो मधील विद्यापीठातून पूर्ण केली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेत राहायचा निर्णय घेतला
व तिथे राहून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून स्वतःचे पेटंट घ्यायला सुरुवात केली मोबाईल वायलेट चे पेटंट
सुद्धा पित्रोदा यांच्याकडे आहे 100 पेक्षा जास्त जागतिक पेटंट घेतल्यामुळे पित्रोदा यांचे नाव सगळ्या जगात गाजायला
लागले अशातच एकदा भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची व सॅम पित्रोदा यांची भेट झाली दोघांमध्ये मैत्री झाली
व देशासाठी काही करायचं ही इच्छा श्याम यांनी राजीव गांधी यांना बोलून दाखवली व तेव्हापासून सॅम पित्रोदा हे
राजीव गांधीचे म्हणून सल्लागार काम पाहू लागले भारतामध्ये आजी डिजिटल क्रांती पाहायला मिळतील त्याची पूर्ण रूपरेषा
ही सॅम पित्रोदा यांनी तयार केली होती आपल्याला आठवत असेल पीसीओ म्हणजे पब्लिक टेलिफोन बूथ ही सुद्धा
सॅम पित्रोदा यांची संकल्पना होती
नवनवीन विचाराने आणि वेगळे आखणीने लवकरच सॅम पित्रोदा हे काँग्रेसचे थिंक टॅंक झाले प्रत्येक निवडणुकीच्या वेळी
सॅम पित्रोदा कुठले कुठले मुद्दे घ्यायचे याविषयी काँग्रेसला मार्गदर्शन करू लागले हे सक्रिय राजकारणात नसून देखील
काँग्रेसच्या थिंक टॅंक मध्ये काम करू लागले
सॅम पित्रोदा आणि विवाद
(Sam Pitroda and his controversial statement)
सॅम पित्रोदा हे जेवढे हुशार आहेत तेवढेच त्यांचे फक्त हे वादग्रस्त असतात (Sam Pitroda and his controversial statement)
व त्यांनी केलेल्या वक्तव्याचा प्रभाव हा
सर्वात जास्त काँग्रेसवर पडताना दिसतो कित्येक वेळेला तर काँग्रेसला पित्रोदा यांच्या बोलण्यासाठी माफी देखील
मागावी लागली तसेच सॅम पित्रोदा यांना अनेक वेळा आपले पोस्ट डिलीट सुद्धा करावी लागली सॅम पित्रोदा हे इंडियन
ओवरसीस काँग्रेसचे अध्यक्ष आहेत व काँग्रेसचे सल्लागार सुद्धा आहेत काल त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाकात देत असताना
असे सांगितले की अमेरिकेमध्ये संपत्ती वारसा करा ( Inheritance Tax)संदर्भात चर्चा करताना त्यांनी अशा पद्धतीचा कायदा हा आपल्या
देशात असायला पाहिजे असे विधान केले मुळात अमेरिकेतील हा संपत्ती वारसा कर काय आहे ते पाहूया
अमेरिकेमध्ये जर एखादा व्यक्ती मरण पावला तर त्याची संपत्ती संपूर्ण त्याच्या कुटुंबाला त्याच्या पाल्यांना जात नाही तर
त्यातील फक्त 45% संपत्ती ही वारसाला दिली जाते बाकी 55% संपत्ती ही सरकार स्वतःकडे ठेवून घेते पण भारतामध्ये
अशा प्रकारचा कायदा नाही ( Inheritance Tax)जर एखाद्या व्यक्ती मरण पावला तर त्याची सर्व संपत्ती ही त्यांच्या
वारसांना मिळते पण सॅम
पित्रोदा यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेतील या कायद्याविषयी भारतामध्ये चर्चा होऊन हा कायदा भारतामध्ये सुद्धा लागू
व्हायला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं हे वक्तव्य आल्याबरोबर भारतीय जनता पार्टीने या वक्तव्याचा चांगला समाचार
घेतला भारत देशातील हिंदूंची संपत्ती ही ताब्यात घेऊन ती अल्पसंख्यांक व बाहेरून आलेल्या लोकांना वाटण्याचा
काँग्रेसचा डाव आहे असं भाजपाकडून बोलले जात आहे तर गृहमंत्री अमित शहा यांनी सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे
काँग्रेसची विचारसरणी उघडी पडली आहे जनतेस समोर आली आहे असं वक्तव्य केले काही दिवसापूर्वी सॅम पित्रोदा यांच्या
या वक्तव्याला विरोध व्हायचे कारण म्हणजे राहुल गांधी यांनी केलेले संपत्तीचा सर्वे (Inheritance Tax) करणार असं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं
त्यामुळे विरोधकांनी राहुल गांधींनी केलेले वक्तव्य व सॅम पित्रोदा यांचे वक्तव्य हे दोन्हीही एकच आहेत असं बोलायला सुरुवात केली
काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे व हा जाहीरनामा बनवण्यामध्ये सॅम पित्रोदा यांचे योगदान मोठे आहे
भारतीय जनता पार्टीने केलेल्या टीकेनंतर काँग्रेसने सारवासारव केली सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याने विरोधकांना
आणखीन बळ मिळाले आहे भारतीय जनता पार्टीने काँग्रेसची प्राथमिकता काय आहे हे स्पष्ट करावे गरीब ची
मुस्लिम हे काँग्रेसने स्पष्ट करावे असं भारतीय जनता पार्टी बोलत आहे
याआधी सुद्धा सॅम पित्रोदा यांनी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक चे पुरावे सर्वात आधी सॅम पित्रोदा यांनीच मागितले होते
तसेच 1984 च्या शीख दंगली बाबतीत सुद्धा वादग्रस्त विधान केले होते तसेच अमेरिकेमधील एका कार्यक्रमांमध्ये
सॅम पित्रोदा यांनी भारत देशामध्ये मंदिर बांधून रोजगार उपलब्ध होणार नाही असे विधान केले होते तसेच मूळ प्रश्नाला बगल
देऊन बाकीच विषयांना हात घातला जातो असंही विधान त्यांनी केलं होतं
यावेळी केलेल्या विधानामुळे काँग्रेस मात्र चांगलीच अडचणीत आली आहे तसेच जाहीरनाम्यातील संपत्तीचा सर्वे हाच मुद्दा सुद्धा
चुकीचे लक्ष झाला आहे भारतीय जनता पार्टीने जर काँग्रेस सत्तेत आली तर आपल्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीवर कब्जा करून
ती लोकांमध्ये वाटण्याचा काँग्रेसचा डाव आहे अशा पद्धतीचे विधान करून अशा पद्धतीने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न
भाजपाने सध्या चालू केला आहे आधीच मोदीवर टीका करण्यासाठी पुरेसे मुद्दे काँग्रेसकडे नाहीत अशातच सॅम पित्रोदा यांच्या
विधानामुळे काँग्रेस चांगलीच बॅकफूट गेली आहे
एकंदरीत वरील सर्व विषय पाहता सॅम पित्रोदा यांचे वारसा संपत्ती कर यावर केलेले विधान व त्या नंतर उमटणाऱ्या प्रतिक्रिया
यामुळे काँग्रेस अडचणीत आली आहे तर भारतीय जनता पार्टीला एक नवीन मुद्दा मिळाला आहे
पण खर च अशा प्रकारचा कायदा आपल्या देशात असावा का याविषयी आपली प्रतिक्रिया जरूर खाली नोंदवा