रस्त्यावर फिरणारे मोकाट कुत्रे यांच्यापेक्षा
मानवी आरोग्य व आयुष्याला जास्त महत्त्व
दिले पाहिजे अशी टिपणी काल केरळ
हायकोर्ट जस्टीस पी व्ही कुन्हीकृष्णन यांनी केली
मागील काही वर्षापासून कुत्र्यांचे मानवावर
हल्ले हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत कुत्र्यांचे
चावा घेतल्याने रेबीज सारखे खतरनाक आजार
होतात यामध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झालेली आहे
याला कारण मागील काही वर्षापासून मोकाट
कुत्र्यांना मारण्यावर आलेली बंदी
हैदराबाद मध्ये एका चिमुकल्या मुलावर आठ
ते नऊ मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याला ठार
मारले असे घटना मागील काही वर्षापासून
मोठ्या प्रमाणात वाढत आहेत
यावरील एका प्रकरणाची सुनावणी करताना
कोर्टाने डॉग लव्हरला वर्तमानपत्रात लेख व
व्हिडिओ टाकण्यापेक्षा पुढे येऊन मोकाट
कुत्र्यांची जबाबदारी स्वीकारा असे या म्हटले
हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया
केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यातील मुजहतदाम
वार्डात राहणाऱ्या काही नागरिकांनी राजू कृष्णन
नामक एका पशुप्रेमी च्या वागण्याला कंटाळून
कोर्टामध्ये याचिका दाखल केली यामध्ये राजू
कृष्णन हे शहरांमध्ये कुठे जखमी व आजारी कुत्रा
सापडल्यास त्याला स्वतःच्या घरी आणून इलाज
करतात की मोकाट कुत्रे रस्त्याने फिरल्यामुळे
लहान मुलं ज्येष्ठ नागरिक घराच्या बाहेर पडायला
घाबरत आहेत त्यावर मा .कोर्टाने टिपणी केली
की की मानवी आयुष्य हे मोकाट कुत्र्यांपेक्षा
जास्त गरजेचे आहे
खरोखरच सध्या मोकाट कुत्रे ही फार मोठी समस्या आहे