सध्या जगाचं लक्ष आहे ते इजराइल कडे कारण एकदाच दोन देशांसोबत इजराइल युद्ध करत आहे
इराण व फिलिस्तीन दोन देशांसोबत युद्ध करण्याची ताकद इजराइलने कशी निर्माण केली?
मुळात संपूर्ण जगाला स्वतःची ओळख करून दिली ती शेतीच्या अनोख्या पद्धतीने या चिमुकल्या देशाने
संपूर्ण जगाला दाखवून दिले की इच्छा असेल तर आपल्याला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही.
मुळात ज्यु लोकांकडून अतोनात छळ झाल्यानंतर काही येहुदी नागरिक या प्रदेशात येऊन शेती करू लागले
साधारणतः ही गोष्ट 100 वर्षांपूर्वीची आहे पण शेती करत असताना यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले
पण इजराइलच्या लोकांमध्ये असलेली एकी यामुळे इजराइल ला सर्वच गोष्टी शक्य झाल्या आपण स्वयंपूर्ण
असल्याशिवाय आपलं अस्तित्व निर्माण होणार नाही याची जाण इजराइल नागरिकांना होती म्हणून त्यांनी
स्वयंपूर्ण होण्यासाठी शेती करण्याचा निर्णय घेतला व काही दिवसांमध्ये इजराइल अन्नधान्याबाबतीत स्वयंपूर्ण झाला
या देशाने जगाला दाखवून दिलं की वाळवंटात देखील मत्स्यपालन करता येते शेतीला लागणाऱ्या मोठमोठ्या मशनरी
या देशाने अगदी सहजरित्या तयार केल्या व त्याचा निर्यात ही संपूर्ण जगामध्ये केली
इजराइल या देशापुढील आव्हाने (Challenges for Israel)
या देशाला आव्हानाने जणू घेरलेलंच असतं यातलं मुख्य आव्हान होतं ती शेती करण्याच्या लायकीची जमीन इजराइल मध्ये नव्हती
वाळवंटी प्रदेश होता दुसरा आव्हान येथे पर्जन्यमान अत्यंत कमी व चारी बाजूंना असलेला शेजार हा कायमस्वरूपी त्यांचा शत्रूच
आशा आणि असंख्य अडचणीमुळे इजरायली नागरिकांना प्रयोग करायला भाग पाडले व शेतीचे नवीन तंत्रज्ञान
तयार होऊ लागले
समूह शेती ( कीबुज) (group farming (kibbutz)
शेती करणे हे एकट्या दुकट्याचे काम नाही याची जाण येथील नागरिकांना होती त्यामुळे त्यांनी समूह शेती करण्याचा (group farming (kibbutz)
निर्णय घेतला इजरायली भाषेमध्ये याला कीबुज असे म्हणतात
कामाची वाटणी फायद्याची वाटणी अशा पद्धतीने एकत्रित येऊन समो शेती करून आपले उत्पन्न या देशाने वाढविले
पाणी नाही इजराइल समोरील मोठे आव्हान
इजराइल मध्ये सरासरी पाऊस साठ ते सातशे मिली एवढा पडतो यामुळेच या देशांमध्ये पाण्याला फार मोठे महत्त्व आहे
प्रत्येक थेंबा मधून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घ्यावे हे या देशाकडून शिकण्यासारखे आहे समुद्राला जाणारे पाणी रोखले
याच पाण्याच्या अडचणी मधून इजराइलने संपूर्ण जगाला ठिबक सिंचन हा नवीन पर्याय उपलब्ध करून दिला ठिबक सिंचनाचा
उदय याच देशांमध्ये झाला आहे तसेच स्पिंकलर हे सुद्धा याच देशाची देण आहे
यांत्रिकीकरण (Mechanization)
इजराइल ची लोकसंख्या ही एक कोटीच्या मध्ये आहे त्यामुळे मजुरांच्या समस्येला इजराइलला सामोरे जावे लागते आजूबाजूच्या
देशामधून काही प्रमाणात मजूर मजुरी करण्यासाठी या देशांमध्ये येतात पण शेजारी शत्रूंची संख्या जास्त असल्यामुळे या देशाने
यांत्रिकीकरण करण्याचा निर्णय घेतला बहुतांश काम ही यंत्राच्या ( Mechanization) साह्याने करता येईल यासाठी शासन स्तरावर
संशोधन सुरू झाले आपल्या महाराष्ट्राप्रमाणे मजुरांची समस्या येथेही आहे पण त्यांनी त्यावर मात केली
शेतीमधील अनोखे प्रयोग (Unique experiments in agriculture)
येथे कोणी कुठली पिकं घ्यायची याविषयी शासन स्तरावरच निर्णय घेतले जातात यामुळे अतिरिक्त उत्पादनावर आळा बसतो व प्रत्यक्ष
शेतकऱ्याला(Agriculture of Israel) चांगले उत्पन्न मिळते 15 हेक्टर जमिनीमध्ये एकाच प्रकारची पालेभाजी घेऊन रोजची उलाढाल
इथे शेतकरी करतात व यामधून दहा ते बारा कोटी रुपये कमवतात लावणी ते काढणीपर्यंत सर्व काम व पुढील प्रक्रिया ही मशीनद्वारे
येथील उत्पादनांना चांगली मागणी आहे
नैसर्गिक आपत्तीवर मात (Overcome natural disasters)
भारतासारखं उन्हाळा पावसाळा हिवाळा असे तीन ऋतू येथे आळीपाळीने नसतात कधी 42 डिग्री सेंटीग्रेड तापमान तर कधी चार डिग्री
पर्यंत हेच तापमान खाली येते वाळवंटी प्रदेशामध्ये सुद्धा योग्य नियोजनाने येथे शेती(Agriculture of Israel) केली आहे या वाळवंटामध्ये
चक्क इजराइलने फुलाची शेती करून दाखविली आहे इजराइलच्या या ठिकाणच्या खजुराला जगात सगळ्यात जास्त मागणी आहे याच
ठिकाणी शेती तंत्रज्ञान विकसित करून भारतामध्ये साधारणतः वीस गुंठ्यामध्ये आपण जर एखाद्या भाजीपाल्याचे उत्पन्न एक टनापर्यंत येतो
तर या ठिकाणी इजराइल हीच गुंठ्यामध्ये जवळपास 22 तमा पर्यंत उत्पादन घेतो त्यामुळे इजराइलचा जागतिक स्तरावरील निर्यातीचा वाटा
मोठा आहे
शेती संशोधनाशिवाय महत्व दिले गेले
(Apart from agricultural research,importance was given)
इजराइल हा देश मुळात निर्वासितांचा देश त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर स्वावलंबी होणे याशिवाय इजरायल समोर दुसरा पर्याय नव्हता कारण
शेती हा काय इजरायली लोकांचा परंपरागत व्यवसाय नव्हता पण शेती करण्याशिवाय दुसरा पर्यायी त्यांच्याकडे काही नव्हता म्हणून या
देशाने शेती संशोधनाला व स्वतःच्या संरक्षणाला जास्त महत्त्व दिले कारण इजराइल हा देश चारही बाजूने दुश्मन देशाने वेढलेला आहे
फक्त एका समाजाची लोक राहिल्यामुळे येथे जास्ती वाद विवाद होण्याची शक्यता कमीच होती आणि शेतीचे कुठलेही ज्ञान नसल्यामुळे
शेती शिकण्याशिवाय इजरायली नागरिकांकडे पर्याय नव्हता स्वतःच्या मनाने शेतीमधले वेगवेगळे प्रयोग करून इजराइल नागरिकांनी 50
टक्के जास्त उत्पन्नाचा आकडा गाठला तोही अगदी पहिल्या पिढीनेच आणि इथूनच खऱ्या अर्थाने शेती संशोधनाला सुरुवात झाली आलेल्या
शेतीमालातून चांगला असलेला शेतीमाल हा बियाणासाठी वापरला जाऊ लागला व व्यवस्थित नोंदी ठेवल्यामुळे येणाऱ्या रोगराईचा अभ्यास
या चिमुकल्या देशाला होत गेला त्यानंतर दुसऱ्या पिढीने तब्बल 13% ची वाढ आपल्या उत्पन्नामध्ये केली त्यांना त्यांच्या मागील पिढीच्या
अनुभवाचा खूप मोठा फायदा झाला तसेच इथल्या प्रशासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मदत करत वोल्कानी सेंटरची स्थापना
केली व यामुळे परंपरागत शेतीला व देशी बियाणापासून जास्त उत्पन्न घेण्याच्या प्रयत्नाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली व इथूनच जेनेटिकली
मॉडीफाईड असलेले नवनवीन बियाणांचा शोध या सेंटरच्या माध्यमातून लावला गेला व शेतकऱ्यांची चर्चा करून त्यांच्या गरजेप्रमाणे तंत्रज्ञान
विकसित केले गेले फक्त इजराइल शासनच नाही तर इजराइल शेतकऱ्यांनी सुद्धा प्रगतीचा ध्यास आपल्या मनामध्ये घेतला व शास्त्रज्ञांनी
सांगितलेले तंत्रज्ञान त्यांनी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला व आधुनिक तंत्रज्ञान आणि अपार मेहनत यामुळे या चिमुकल्या देशाने अख्ख्या
जगाला थक्क करून सोडले इजराइल शेतीमध्ये व शेती तंत्रज्ञानामध्ये जगात नंबर एक होण्याचे कारण म्हणजे की येथे किती उत्पन्न घ्यायचं
व कसं घ्यायचं याचा सर्व डाटा सर्व तंत्रज्ञान हे स्वतः सरकार उपलब्ध करून देते त्यामुळे अतिरिक्त उत्पादनाचा विषयच येत नाही आणि
उच्च तंत्रज्ञानामुळे जगातल्या कुठल्याही भागातल्या शेतकऱ्यांपेक्षा 70 ते 80 टक्के उत्पन्न इजराइल शेतकरी हा जास्त घेतो त्यामुळे इजराइल
ची शेती ही समृद्ध आहे
पुढील भागामध्ये आपण इजराइलच्या शेतीसलगणीत व्यवसायासंदर्भात चर्चा करूया व या तंत्रज्ञानाचा विकास कसा केला याविषयी आपण
सविस्तर चर्चा करूया
महाराष्ट्र व इजराइल च्या शेतीत फरक काय
(What is the difference between the agriculture of Maharashtra and Israel?)
इजराइल ची शेती (Agriculture of Israel)पाहून मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये व इजराइलच्या शेतकऱ्यांमध्ये(Agriculture of Israel)
काही मूलभूत फरक पाहायला मिळाले आपण पाण्याला महत्व देत नाहीत इजराइल प्रत्येक पाण्याच्या थेंबातून जास्तीत जास्त उत्पन्न
घेण्याचा प्रयत्न करतो
इजराइल येथील शास्त्रज्ञ स्वतः बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या येणाऱ्या समस्या विषयी चर्चा करतात तसं आपल्या भारतात दिसत नाही
इजराइल मध्ये माती परीक्षणाला खूप महत्त्व आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त सरकारी योजना उचलायची तेव्हाच माती परीक्षण केले जाते
इजराइल मध्ये शेतीमध्ये कमीत कमी मजुरांवर शेती कशी करता येईल यासाठी वेगवेगळ्या यंत्रांचा शोध लावणे छोट्या छोट्या यंत्रांचा शोध
लावणे याकडे इजराइलचा कल दिसतो पण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणावं तसं अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा कुठलाही प्रयत्न
विद्यापीठांकडे किंवा कृषी अधिकाऱ्याकडून होताना दिसत नाही शासन स्तरावर सुद्धा याबाबतीत उदासीनता स्पष्ट दिसून येते
व्हिएतनाम नेपाळ कंबोडिया हायलँड श्रीलंका इत्यादी ठिकाणावरून येथे मोठ्या प्रमाणात मजूर शेतीमध्ये मजुरी करण्यासाठी जातात व
तंत्रज्ञानाच्या साह्याने मानवावर अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मजुरांच्या समस्येवर मात केली आहे
एकंदरीत वरील सर्व गोष्टींचा विचार करत आपणही इजराइल सारखी स्वतःचे तंत्रज्ञान तयार करून आपण सुद्धा शेतकऱ्यांचे उत्पन्न हे
दुप्पट तिप्पट करू शकतो सर्वांनी मिळून या चिमुकल्या देशाकडून शेतीचे तंत्रज्ञान शिकून आपली प्रगती करून घ्यावी व राष्ट्राच्या
ही संपत्ती मध्ये वाढ करावी उर्वरित विषयांची चर्चा भाग दोन मध्ये आपण जरूर करूया
इस्राईल शेती तंत्रज्ञान कस आहे भाग १
इस्राईल शेती मध्ये यांत्रिकरणाचे महत्व काय आहे
Add A Comment