मागील दोन दिवसा पासून मराठवाड्यामध्ये सतत पाऊस चालू आहे त्यामुळे मराठवाड्यातील
नांदेड परभणी(Parbhani) हिंगोली लातूर या जिल्ह्यामधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
तसेच या अतिवृष्टीमुळे(heavy rain) काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे
मराठवाड्यातील परभणी(Parbhani) नांदेड हिंगोली(Hingoli) लातूर या जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांमध्ये
मुसळधार पाऊस(heavy rain)झाला आहे व यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे
तसेच मराठवाड्यात असलेले मुख्य धरणे सुद्धा आता शंभर टक्के भरली आहेत यामध्ये
मन्याड नदीवर असलेले नांदेड(Nanded)जिल्ह्यातील लिंबोटी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे
त्यामुळे मन्या नदीच्या लगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
तसेच मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचे असलेले पैठण मधील जायकवाडी धरण सुद्धा पाणीसाठा
आता 87% वर पोहोचला आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी जायकवाडी धरणांमधून पाण्याचा विसर्ग
सुरू होऊ शकतो त्यामुळे गोदा काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
गोदाकाठच्या 100 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे विशेष करून शेतकऱ्यांनाही
काही सूचना देण्यात आलेले आहे कारण की पूर वाढेल या भीतीने नदीमध्ये असलेल्या जुन्या
मोटारी काढण्यासाठी शेतकरी नदीपात्रात उतरतात पण जायकवाडी धरणा मधून कुठल्याही
क्षणी पाणी सोडले जाऊ शकते त्यामुळे कोणीही नदीपात्रात उतरू नये असे आवाहन शासनातर्फे
करण्यात आले आहे गेल्या आठवड्यामध्ये नाशिक व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस
पडल्यामुळे जायकवाडी धरण हे आता 87% भरत आलेले आहे आणि त्यामुळेच लवकरच
जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत जर पाऊस असाच चालू राहिला तर
मराठवाड्यातील गोदाकाच्या परिसरामध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे आणखीन पुराचा
धोका निर्माण होऊ शकतो जायकवाडी धरण भरल्यानंतर त्याच्या खाली असलेल्या धरणांमध्ये
सुद्धा पाणीसाठा वाढल्यामुळे सिंचनाच्या पाण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही होईल
नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 24 तासापासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे(heavy rain)
अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत हवामान खात्याकडून जिल्ह्याला रेड
अलर्ट जारी करण्यात आला आहे मुख्यता नांदेड(Nanded)जिल्ह्यामध्ये पैनगंगा गोदावरी मन्याड या तिन्ही
नद्यांना पूर आला आहे त्यामुळे या नद्या नदीच्या लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी हे जमा
झाले आहे मन्याड नदीवरील लिंबोटी धरणाची दरवाजे हे उघडण्यात आले आहेत मुख्यतः मन्याड
नदीमध्ये लातूर तसेच नांदेड(Nanded) जिल्हा ती काही भागातून या नदीला पाणी येते त्यामुळे लिंबोटी धरण
हे 90 टक्के भरले आहे त्यातून पाण्याचा विसर्ग हा सध्या चालू झाला आहे
तसेच हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली(Hingoli) शहरांमध्ये शहराला लागून असलेल्या कयाधू नदीला पूर
आल्यामुळे बॅक वॉटर हे हिंगोली(Hingoli) शहरात आल्यामुळे शहरांमध्ये अतोनात नुकसान झाले आहे
जिल्ह्यातील केमिस्ट भवन मध्ये सुद्धा पाणी शिरले आहे शहरातील बांगर नगर परिसरामध्ये सुद्धा
पुराचे पाणी शिरले व दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापारांचे नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात
झाले आहे दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे आता त्या दुकानातील वस्तू या काहीच कामाच्या राहिल्या
नाहीत याही नुकसानाचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी सध्या व्यापारी करत आहेत तसेच
अनेक इमारतींमध्ये सुद्धा पुराचे पाणी शिरले आहे काही पावसाचा जोर ओसरल्यानंतर या पुराची
दाहकता समोर आली आहे यामध्ये हजारो घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी वस्तू या
वाहून गेल्या आहेत सर्वत्र हिंगोली(Hingoli) शहरांमध्ये चिखलाचे साम्राज्य पाहिला मिळत आहे यामध्ये शेकडे
गाड्यांचे सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे
तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये सुद्धा
पाणी मोठ्या प्रमाणात आले आहे
आता पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे सध्या हिंगोली कर वासियांनी आपल्या घरातील
चिखल बाहेर काढण्यासाठी सुरुवात केली आहे आता हळूहळू नेमके नुकसान किती झाले याचा
अंदाज आता येईल
तसेच या अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान झाले आहे ते शेतकऱ्यांचे शेतीमध्ये पाणी साचल्यामुळे
पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे तसेच राज्यस्तरावर देखील
राज्य शासनाने या अतिवृष्टीची दखल घेऊन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पावसाचा जोर कमी
झाल्यानंतर पंचनामाचे आदेश दिले आहेत यामध्ये मुख्यता कापूस सोयाबीन व सध्या मुगाच्या
शेंगाचे तोडणी चालू आहे त्यामुळे मूग मूग या पिकाचे सुद्धा शंभर टक्के नुकसान झालेले आहे
हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यामुळे शेतकरी सध्या चिंतातुर आहेत
या साचलेल्या पाण्यामुळे सर्वच पिकांवर मूळ कुज रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात
पाहिलास पुढे येऊ शकतो कारण जोपर्यंत पूर ओसरणार नाही तोपर्यंत शेतीतले पाणी हे
बाहेर निघणार नाही त्यामुळे शेती पिकाच्या नेमके नुकसान किती झाले हे पाऊस कमी झाल्या
शिवाय याचा अंदाज लागू शकत नाही तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पिकाचे झालेले
नुकसान ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्यांनी वेळेमध्येच विमा कंपनीकडे तक्रार करावी
अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे तर ई पीक पाहणी करण्यासाठी 15 सप्टेंबर
पर्यंत ची मुदत वाढ देण्यात आली होती काही शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेले नाही त्यामुळे या
ई पीक पाणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा मिळणार की नाही यामुळे सुद्धा शेतकऱ्यांमध्ये सध्या
चिंतेचे वातावरण आहे याविषयी शासन स्तरावर स्पष्टपणे आदेश काढण्याची मागणी सुद्धा सध्या
शेतकऱ्यांमधून होत आहे
नदीकाठच्या गावांमध्ये सुद्धा पावसाने हाहाकार माजवला आहे कारण शेकडो जनावरे ही या पुरामध्ये
वाहून गेले आहेत त्याचे पंचनामे चे आदेश कधी निघणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे
अक्षरशा मागील दोन दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये आभाळ फाटलं की काय असं शेतकऱ्यांना वाटत होतं
परभणी(Parbhani) जिल्हा देखील अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आहे
पावसाचा जोर वाढल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली व नागरी वस्तीमध्ये
घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली नंतर या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या
प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे तर लोअर दुधना प्रकल्प यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात
पाण्याची आवक झाल्यामुळे याही प्रकल्पामध्ये पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला
सध्या मिळत आहे तसेच गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्प सुद्धा भरला आहे ती सर्व धरणांमध्ये
पाण्याची पातळी वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचे प्रश्न व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा जवळपास
मिटला आहे पण तरीही शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पात प्रमाणे
जे छोटे नाले ओढे आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे त्यामुळे सुद्धा शेतीचे मोठे
नुकसान झाले आहे यामध्ये मुख्यता हळद कापूस सोयाबीन या पिकांचा समावेश सुद्धा परभणी जिल्ह्यात
मोठ्या प्रमाणात आहे
तसेच विदर्भातील वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा लेंडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे काही
घरांमध्ये पाणी शिरले आहे कारंजा मंगळूर पीर रिसोड मालेगाव या तालुक्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात
शेतीचे नुकसान झाल्याच्या बातम्या येत आहेत
तसेच मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील मंठ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे पुराचे
पाणी गावात शिरले आहे यामुळे दुकानदारांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे
तसेच आज शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा या पोळ्यावर देखील पावसाची सावट
आहे शेतीचे झालेल्या नुकसानामुळे शेतकरी कमालीचा चिंतेत आहे तरी शासन स्तरावर पंचनामाचे काम
हे तातिडेने होऊन शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत करण्याची मागणी ही विविध संघटनांकडून होत आहे
तसेच व्यापारी संघटनामार्फत सुद्धा व्यापारांचे झालेले नुकसानाचे देखील पंचनामे व्हावेत अशी मागणी
सुद्धा करण्यात येत आहे एकंदरीत मागील दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी सामान्य
नागरिक व्यापारी या सर्वांचेच अतोनात नुकसान झाले आहे तरी या समाजातील सर्व घटकांना
बाबतीत शासन स्तरावर कोणते निर्णय होतात हे पहावे लागेल व कशा पद्धतीने शासन या सर्वांना मदत करेल
Recent News
मराठवाड्यात मुसळदार पाऊस जनजीवन प्रभावित शेतीचे मोठे नुकसान
हजरो हेक्टर पिकांचे १००% नुकसान?