पुणे पुण्यामध्ये जी.बी.एस(G.B.S.). या आजाराच्या रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढली आहे आरोग्य एक दुर्मिळ प्रकार देखील समोर आला यालाच मिलर फिशर सिड्रोम असे म्हणतात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकट्या पुण्यामध्ये 73 रुग्ण सापडले आहेत तर जिल्ह्यामध्ये इतर तीन ठिकाणी सुद्धा या आजाराचे रुग्ण सापडलेले आहेत यामुळे आजारावतीत घबराट पसरली आहे ?
जी.बी.एस(G.B.S.)आजार म्हणजे काय ?(What is G.B.S. disease?)
जी.बी.एस(G.B.S.)याचा अर्थ होतो गीयन बारे सिंड्रोम आपण नेमका हा आजार सर्वात आधी कुठे पाहायला मिळाला तर इतिहासामध्ये पहावे लागेल 1916 मध्ये फ्रेंच डॉक्टरांना दोन सैनिकांना गंभीर आजार झाल्याची माहिती मिळाली या आजारामध्ये त्या दोन सैनिकांना अशक्तपणा जाणवत होता व त्यांनी संवेदना गमावल्या होत्या असा अहवाल डॉक्टर जॉर्जेस गुईलेन यांनी दिला डॉक्टरांना अभ्यासादरम्यान सेरेब्रो स्पाईन फ्लूईड (CSF) व सामान्य पेशींच्या संख्येमध्ये उच्च पातळीचे प्रथिने पाहायला मिळाली पुढे याच रोगाला जी.बी.एस(G.B.S.)रोग म्हणून ओळखले जाऊ लागले
या आजाराचे दोन प्रकार पाहायला मिळतात 1) AIDP म्हणजे तीव्र दाहक डिमायलिनेटिंग पॉलीन्यूरोपॅथी
2) AMAN म्हणजे तीव्र मोटर ऍक्सोनल न्यूरोपॅथी
तसेच जी.बी.एस(G.B.S.)आजार हा एक स्वयम प्रतिकार स्वयंप्रतिकार न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे यामध्ये मुख्यतःहा आजार झालेल्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्ती व परधीय नसांवर हल्ला होतो आणि त्यामुळे रोग्याच्या शरीरातील स्नायू कमकुवत होतात ज्यामुळे पुढे चालून पक्षघात अर्थात पॅरॅलिसिस होऊ शकतो
जी.बी.एस(G.B.S.)हा आजार कोणत्या वयोगटातील लोकांना होतो
तसं आपण विचार करायला गेलो तर गुईलेन बॅरे सिंड्रोम हा आजार कोणत्याही वयोगटातील रुग्णांना होऊ शकतो ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे अशांना रोग होण्याची शक्यता जास्त असते परंतु पुरुषांमध्ये व प्रौढ लोकांमध्ये हे प्रमाण सामान्य आहे
हे हि वाचा –MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
जी.बी.एस(G.B.S.)रोग होण्याची कारणे(Causes of G.B.S)
जी.बी.एस(G.B.S.)हा रोग मुळात का होतो हे समजलेले नाही पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(W.H.O.) यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी या जिवाणूचा संसर्ग होतो आणि हा संसर्ग झाल्यानंतर गॅस्ट्रोएन्टेरिटिस होतो आणि यानंतर रुग्णाला अतिसाराचे लक्षण दिसायला लागतात यामध्ये मळमळ होणे उलट्या होणे अशी काही सुरुवातीची लक्षणे जाणवू शकतात हा आजार एवढा दुर्मिळ आहे की 79 हजार पैकी एखादालाच हा आजार होऊ शकतो क्वचित प्रसंगी लसीकरणामुळे सुद्धा जीबीएस आजाराचे प्रमाण वाढू शकते परंतु वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(W.H.O.) च्या म्हणण्याप्रमाणे याची शक्यता अत्यंत कमी आहे
सोप्या भाषेत सांगायची तर आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती असते आणि या रोगप्रतिकारशक्तीचे काम असतील की जर समजा एखाद्या आजाराने आपल्या शरीरावर हल्ला केल्यास त्यावेळेला ही रोगप्रतिकारशक्ती ही त्या रोगाच्या जंतूंना मारण्यासाठी सज्ज असते आणि त्या जंतूंचा शेवटची रोगप्रतिकारशक्ती करत असते थोडक्यात सांगायचं तर रोगप्रतिकारशक्ती म्हणजे आपल्या शरीरातील सैनिकच पण जर हीच रोगप्रतिकारशक्ती आपल्यावर हल्ला करायला लागली तर काय होईल मग आपल्या शरीराचे रक्षण कोण करणार
जी.बी.एस(G.B.S.)या आजाराचा शरीरावर काय परिणाम होतो
यामध्ये मुख्यतः स्नायू कमकुवत होणे असे परिणाम दिसतात आणि याला कारण आहे आपल्या शरीरात असणारी रोगप्रतिकार शक्ती ही यंत्रणा स्वतःच्याच पेशींवर हल्ला करते आणि रोगप्रतिकार प्रणाली यालाच मायलिन आवरण नष्ट करते आणि यामुळे मज्जा तंतू पेशीभोवती एक फॅटी थर आपल्या मेंदूला सिग्नल पाठवणाऱ्या मज्जातंतूच्या क्षमतेवर याचा परिणाम होतो आणि यामुळे जी.बी.एस(G.B.S.)परधीय मज्जासंस्थेवर परिणाम करते
हेहि वाचा-केंद्र सरकारचा जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा पाच लाख पर्यंत मिळणार मोफत इलाज
जी बी एस(G.B.S.)आजाराची लक्षणे (Symptoms of G.B.S)
सामान्यतः हा आजार झाल्यानंतर काही चिन्हे आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये मुख्यतः रुग्णांना मोठ्या प्रमाणामध्ये अशक्तपणा जाणवायला लागतो पाठ दुखी होते पाय दुखू लागतात हातापायांना मुंग्या यायला लागतात तसेच जिना चढणे अशक्य होते चेहऱ्या हालचाली करताना त्रास होतो तसेच दुहेरी दृष्टी ही सुद्धा लक्षणे दिसू शकतात आणि हाता पायाला किंवा चेहऱ्याला अर्धांग वायू होऊ शकतो जर डायरिया हा तीन-चार दिवसापासून कमी होत नाहीये तर आपण डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती तपासणी करून घ्यावी डायरीया सुद्धा या रोगाचे एक लक्षण आहे तसेच काही रुग्णांमध्ये सर्दी ताप डोकेदुखी यासारखे व श्वसना संबंधातील आजार असे देखील काही लक्षणे हे रुग्णांमध्ये पहावयास मिळतात ?
तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(W.H.O.) च्या म्हणण्यानुसार एक तृतीयांश लोकांमध्ये छातीच्या स्नायू वर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि यामुळेच रुग्णाला श्वास घेणे देखील कठीण होते तसेच गळ्यामध्ये सुद्धा इन्फेक्शन होऊ शकते यामुळे गिळायला आणि बोलायला त्रास होऊ लागतो
या आजाराचे कोणतेही लक्षण आपल्याला दिसल्यास आपण लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क करावा योग्य वेळी उपचार केल्यास हा रोग बरा होऊ शकतो
जी.बी.एस(G.B.S.)आजार होऊ नये म्हणून काळजी काय घ्यावी ?(What should be done to prevent GBS disease?)
जी.बी.एस(G.B.S.)हा आजार दूषित पाण्यामुळे होऊ शकतो अशी सध्या चर्चा आहे आणि यामुळे आपण कुठलीही दूषित पाणी पिऊ नये फक्त उकळून पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगले आहे शौचास गेल्यानंतर आणि जेवण्याच्या आधी साबणाने स्वच्छ हात धुवून घ्यावेत फळे किंवा भाज्या बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुऊन नंतरच खा मांसाहार करणाऱ्यांनी मांसाहारी पदार्थ हे योग्य प्रकारे शिजवून खावेत तसेच स्वतःच्या शारीरिक स्वच्छतेवर लक्ष द्यावे शिजलेले अन्न खावे वरील सर्व गोष्टीची काळजी घेण्याचे आव्हान महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेले आहे
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट-https://x.com/mohol_murlidhar/status/1883419489892454770?t=2hjpOBAFIv0SdSpbbd8Erg&s=08
शासनाने कुठला निर्णय घेतला आहे?
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक अत्यंत महत्त्वाचे ट्विट केले आहे यामध्ये त्यांनी संबंधित या जी.बी.एस(G.B.S.)रोगाशी लढण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना या शासन स्तरावर केल्या गेल्यात याची माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट द्वारे केली आहे
यामध्ये प्रामुख्याने जे जे बी एस बाधित रुग्ण हे जर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असतील तर त्यांना शासनाच्या महत्वाची अशी शहरी गरीब योजनेचा लाभ देण्यात येईल व पुणे महानगरपालिकेच्या वतीने दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे
तसेच या ट्विटमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत आणि पुढे ते असे लिहितात या रोगात उपचार घेणाऱ्या रुग्णांना इम्युनोग्लोब्यूलिन मोफत दिली जाणार आहे पुणे आणि सोलापूर या दोन ठिकाणी मृत झालेल्या रुग्णांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमका या रुग्णांचा मृत्यू कशामुळे झाला याचे खरे कारण स्पष्ट होईल
तरी एकंदरीत वरच्या सर्व गोष्टींचा विचार करता जीबीएस आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे पण हा रोग होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही तरीपण आपण स्वतःची काळजी मात्र निश्चित घ्यावी जर वर दिलेल्या कुठल्याही लक्षणांपैकी तुम्हाला तीव्र किंवा अति तीव्र अशी लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा हा आजार गंभीर स्थितीमध्ये सुद्धा चांगला करता येतो असे डॉक्टरांचे मत आहे तरी पण काळजी घेणे गरजेचे आहे हा आजार कुठल्याही वयाच्या लोकांना होऊ शकतो
महत्वाची सूचना हा लेख फक्त वाचकांच्या माहितीसाठी आहे सदरील माहिती हि इंटरनेट च्या माध्यमातुन गोळा केली आहे कोठलाही वैद्यकीय निर्णय घेण्या पूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या