अर्थसंकल्पाच्या नंतर देशांमध्ये चांदी व सोन्याच्या दरामध्ये (GOLD RATE)मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले नेमके सोने(GOLD)आणि चांदीचे दर हे का वाढत आहेत? भविष्यामध्ये सोने(GOLD RATE)आणि चांदीचा दर हा किती होऊ शकतो आणि हे दर वाढ होण्याच्या मागे कुठली कारणे आहेत
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला आणि यानंतर सोने आणि चांदीच्या घरामध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले यामध्ये सोने(GOLD)82000 वरून 83 हजारच्या वर प्रति दहा ग्राम पोहोचले तर चांदी एका किलोचा दर हा 94000 चा पार गेला आहे नेमकी ही वाढ होण्याच्या मागे काय कारणे आहेत आणि आता सोने(GOLD)आणि चांदीचा भाव कुठपर्यंत वाढू शकतो अर्थतज्ज्ञांचा याविषयी अंदाज नेमका काय आहे

सोन्याचे दर कसे निश्चित केले जातात(How are gold rates determined?)
सोने(GOLD)हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते सोन्याचे दर(GOLD RATE) हे सहसा खाली येत नसल्यामुळे सोन्यामध्ये (GOLD)गुंतवणूक ही अत्यंत फायदेशीर असते आणि त्यामुळे सामान्य लोकांचा कल हा गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सोन्याकडे अधिक असतो अगदी पुरातन काळापासून सुद्धा सोन्याची नाणी वापरणे दागिने वापरणे यांच्याकडे मानवाचा कल हमेशा राहिलेला आहे
हे हि वाचा–Union Budget 2025- मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना रिटर्नगिफ्ट; वाचा सर्व घोषणा एकाच ठिकाणी
सोने(GOLD) चांदी या दोन्ही धातूंच्या दरामध्ये होणारी चढ उतार याला मागणी आणि पुरवठा यातील अंतर हे तर कारण आहेतच त्यासोबतच सोन्याची किंमत(GOLD RATE)खालीवर होण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती ही सुद्धा कारणीभूत असते जागतिक आर्थिक परिस्थिती यावर सुद्धा सोन्याचे भाव(GOLD RATE)अवलंबून असतात तसेच एखादी मोठी राजकीय घटना जागतिक स्तरावरील त्यामुळे सुद्धा सोन्याच्या दरांमध्ये चढ-उतार झाल्याचे आपल्याला पाहायला मिळालेले आहे भौगोलिक संकटामध्ये सुद्धा सोन्याचे दर(GOLD RATE) हे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये(GOLD RATE)चढ-उतार व्हायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात
हे हि वाचा–MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
तसेच याबरोबरच सोन्याचे दर(GOLD RATE)वाढणे किंवा कमी व्हायला बँकांचे व्याजदरांचा सुद्धा खूप मोठा परिणाम हा सोन्याच्या दर(GOLD RATE)वाढीवर दिसून येतो तसेच एखाद्या देशाच्या सरकारच्या धोरणांचा सुद्धा परिणाम हा सोन्याच्या भावावर(GOLD RATE)होऊ शकतो महागाईचा दर हा सुद्धा सोन्याच्या दरामध्ये(GOLD RATE)चढ उताराला कारणीभूत असते
24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोनं म्हणजे काय ?(What is 24 carat and 22 carat gold?)
सोन्याची(GOLD) शुद्धता नेमकी किती आहे याचा ठरवलेला मापदंड म्हणजे कॅरेट यामध्ये 22 आणि 24 कॅरेटचे सोने(GOLD)हे बाजारामध्ये उपलब्ध असते आपण सराफाकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे आपण मागणी करतो की आम्हाला 24 कॅरेट सोनं(GOLD)पाहिजे म्हणजेच शुद्धता असलेले सोने(GOLD) पाहिजे आता जाणून घेऊया की नेमकं 22 आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये काय फरक आहे
24 कॅरेट सोना(GOLD)म्हणजे शुद्धतेचे प्रमाण यामध्ये आपण जर सोन्याच्या(GOLD)शुद्धतेचे टक्केवारी पाहिले तर ती असते 99.9%
एवढी शुद्धता 24 कॅरेट सोन्यामध्ये(GOLD)असते म्हणजे या 24 कॅरेट सोन्यामध्ये भेसळीचे प्रमाण हे नसल्यात जमा असते
22 कॅरेट सोने सोन्याच्या(GOLD)दुसऱ्या मापदंड म्हणजे 22 कॅरेट सोने(GOLD)यामध्ये शुद्धतेचे प्रमाण हे 91% एवढे असते याचे कारण हे असते की या सोन्यामध्ये(GOLD)दागिने बनवण्यासाठी त्यामध्ये चांदी,तांबे,जस्त यांसारखे दुसरे धातू देखील मिश्रण केले जातात आणि त्यांची टक्केवारी ही सोन्यामध्ये 9% एवढी असते आपण जर 22 किंवा 24 कॅरेट सोनं(GOLD)खरेदी केलं तर 24 कॅरेट सोन्या मध्ये कुठलीही कपात याला प्रचलित भाषेत कट्टी असे म्हणतात हि होत नाही पण 22 कॅरेट मध्ये मात्र कट्टी ही घेतली जाते त्यामुळे सराफा दुकानदारांचा कल हा 22 कॅरेट सोने विकण्याकडे जास्त असतो

सध्या सोन्याचे दर वाढण्याची काय कारणे आहेत ?(What are the reasons for the current increase in gold prices?)
सोने(GOLD)खरेदी सहसा चलनवाढीच्या विरुद्ध बचाव म्हणून केले जाते अर्थव्यवस्थेमधील चलनवाढ या विषयामुळे गुंतवणूकदार हे सोने(GOLD)खरेदी करण्याकडे स्वतःचा कल दाखवतात आणि परिणामी भाव वाढतात
*सध्या जागतिक स्तरावर युद्धामुळे असलेली अनिश्चितता हेही कारण सोन्याची भाव वाढण्यासाठी आहे कारण रशिया आणि युक्रेन मधील युद्ध असो की इजराइलची युद्ध असो यामुळे सुद्धा सोन्याचे भाव(GOLD RATE)हे सध्या वाढताना दिसत आहेत
*अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची शक्यता पाहून देखील सोन्याच्या किमतीवर परिणाम सध्या होत आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे
*भारतीय सराफा बाजारातील व्यापारी व स्टॉकिस्ट यांचे म्हणणे आहे की सध्या लग्नसरायची सुरुवात झाली असल्यामुळे सोन्याची आणि चांदीच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे आणि अजून किमान तीन ते चार महिने लग्नाच्या तारखा असल्यामुळे देखील सोन्याच्या किमती आणखीन वाढण्याची शक्यता ही सराफा बाजारामधील व्यापारी वर्तवत आहेत लग्नसराईच्या दरम्यान भारतीय लोक हे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात त्यामुळे देखील मागणी आणि पुरवठा यामधील आलेल्या फरकामुळे सोन्याचे दर सध्या वाढताना दिसत आहे

*सहसा जेव्हा गुंतवणुकीच्या दुसऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूकदाराला जेव्हा धोका दिसायला लागतो तेव्हा गुंतवणूकदारांची पहिली पसंती ही सोने आणि चांदीच असते आणि त्याचाही परिणाम हा सध्या स्थितीला सोने आणि चांदी यांच्या भावावर सध्या पडताना दिसत आहे
*सोने(GOLD) हा धातू असल्यामुळे त्याचा पुरवठा देखील मर्यादित स्वरूपाचा असतो आणि त्यामुळे ज्या देशांमध्ये सोने मिळते त्या देशांनी जर पुरवठ्यावर मर्यादा आणल्या तर सोन्याची टंचाई निर्माण होते आणि त्यामुळे सुद्धा चढ्या भावाने सोने(GOLD) घेण्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे देखील सोन्याचे दर हे वाढत असतात आणि याही गोष्टीचा परिणाम हा सोने दरवाडीवर(GOLD RATE)झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे
हे हि वाचा–GSB DISEASE UPDATE पुणेकरांनो सावधान,GSB आजराचा धोका वाढला
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर
खालील दर हे आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून घेतलेले आहेत यामध्ये बाकी सरकारी करांचा समावेश नाही त्यामुळे आपल्या शहरांमध्ये किमती वेगळ्या असू शकतात
पुणे शहरातील सोन्याचे दर
पुण्यामध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे दर हे प्रति दहा ग्राम हे 76,150 रुपये एवढे आहेत तर 24 कॅरेट सोन्याचे दर हे प्रति दहा ग्राम 83080 एवढा दर आहे
मुंबई शहरातील सोन्याचे दर
मुंबई शहरामध्ये आज 24 कॅरेट सोन्याचे दर हे 83070 प्रति दहा ग्राम एवढा दर आहे
तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे प्रति दहा ग्राम 76148 रुपये एवढा आहे
नागपूर शहरामध्ये सोन्याचे दर
नागपूर शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर हे प्रति दहा ग्राम मुंबई इतकेच म्हणजे 76148 रुपये एवढे आहेत
24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति दहा ग्राम हे 83070 रुपये एवढे आहेत
नाशिक शहरांमध्ये सोन्याचे दर
नाशिक शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव हे प्रति दहा ग्राम 83070 एवढे आहेत
तर 22 कॅरेट सोन्याचे भाव हे प्रति दहा ग्रॅम 76148 रुपये एवढा दर आहे
छत्रपती संभाजी नगर मध्ये सोन्याचे दर
छत्रपती संभाजी नगर मध्ये 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रति दहा ग्राम हे 79050 एवढे आहेत
तर 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम हे 86240 एवढा दर आहे
वरील काही मुख्य शहरातील सोन्याचे भाव बघता येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे दर हे 90 हजाराच्या वर जातील तर चांदी देखील एक लाख प्रति किलो एवढा दर मिळू शकतो ? असा तज्ञांचा अंदाज आहे संकल्प टुडे या दराची पुष्टी करत नाही
पण पुढे येणारी लग्नसराई आणि बाजारामध्ये सोन्याची वाढती मागणी यामुळे सोन्याच्या दरमध्ये(GOLD RATE)परत एकदा उसळी येण्याची शक्यता ही प्रसारमाध्यमां मध्ये वर्तवली जात आहे तर सामान्य लोकांमध्ये ही चर्चा आहे की सोने आता एक लाख रुपये प्रति 10 ग्राम या भावापर्यंत सुद्धा जाऊ शकते अशी सुद्धा चर्चा सध्या सामान्य लोक करत आहेत आता हे पहावे लागणार आहे की नेमकं सोन्याचे भाव(GOLD RATE)हे कुठे जाऊन थांबतात की सोन हे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर जाईल याबाबतीत आपल्याला काही दिवस निश्चित वाट पाहावी लागणार आहे पण या वाढत्या सोन्याच्या भावामुळे सामान्य माणसाचे सोन्याचे दागिने घालण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहत की काय असा प्रश्न सध्या सामान्य लोकांना पडत आहे
नोट -सदरील दर हे इंटरनेट च्या माध्यमामधून घेतलेले आहेत तुमच्या शहरातील भाव तपासून पहा भाव वाढणार कि कमी होणार याचा अंदाज संकल्प टुडे वर्तवित नाही
1 Comment
Pingback: vidhan parishad election-विधानपरिषदे साठी कोणाच्या नावाची चर्चा ? - Sankalp Today