भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग जी यांनी नवी दिल्ली मधील एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला मृत्यू समयी त्यांचे वय 92 वर्ष होते
दिवंगत मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या मनमोहन सिंग (MANMOHAN SING JI) हे भारतातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक होते सामान्य कुटुंबात जन्माला आलेले मनमोहन सिंग जागतिक दर्जाचे अर्थशास्त्री बनले त्यांनी केलेल्या कामाला देश कधीही विसरणार नाही
https://x.com/narendramodi/status/1872328464658808947?t=PFoJ_YoUviMgNn4kZrLpjA&s=19
मनमोहन सिंग यांचे बालपण(Childhood of Manmohan Singh)
मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील चकवाला जिल्ह्यातील घेणे गावांमध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव गुरमुख सिंग आणि आईचे नाव अमृत कौर होते मनमोहन सिंग लहान असताना त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले व त्यापुढे त्यांच्या आजीने त्यांचे पालन पोषण केले लहानपणापासूनच मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )हे अभ्यासात अत्यंत हुशार होते ते त्यांच्या शाळेमध्ये वर्गामध्ये सर्वात हुशार विद्यार्थी होते
भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली आणि या फाळणीच्या दरम्यानच मनमोहन सिंग भारतात आले व त्यांचे कुटुंब अमृतसर मध्ये स्थायिक झाले मनमोहन सिंग यांनी आपले शिक्षण पुढे चालू ठेवले व त्यांनी हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला यानंतर मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांनी होशियारपूर मधील पंजाब विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला व याच ठिकाणी त्यांनी पदवीची परीक्षा पास केली पदवी पूर्ण झाल्यानंतर मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांनी इकॉनॉमिक्स मध्ये पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले त्यांचा ओढा जास्त इकॉनॉमिक्स कडे होता यामुळेच त्यांनी पुढील शिक्षण हे देशाच्या बाहेर घेण्याचा निर्णय घेतला व ते इंग्लंड येथे शिकायला गेले त्या ठिकाणी त्यांनी
युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज विद्यापीठांमधील सेंट जॉन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व याच ठिकाणी जॉन रॉबिन्सन व निकोलस कार्लोस यांसारखे अनुभवी प्राध्यापकांशी त्यांचा संपर्क आला त्यांच्या मार्गदर्शनाखाली इकॉनॉमिक्स चे बारकावे मनमोहन सिंग यांनी समजून घेतले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करण्यास सुरुवात केली यानंतर मनमोहन सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्यांनी पीएचडी पूर्ण केली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )भारतामध्ये परत आले व त्यांनी पंजाब विद्यापीठांमध्ये सीनियर लेक्चरर म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली या ठिकाणी त्यांनी दोन वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांना भारताच्या बाहेर जायची आणखीन एक संधी मिळाली.
हे हि वाचा-गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज
युनायटेड नेशन च्या एका डिव्हिजन मध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यांनी भारत देश सोडला युनायटेड नेशन मध्ये मनमोहन सिंग यांनी तीन वर्ष काम केले व त्यानंतर ते भारतामध्ये परत आले आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेत काम केल्यामुळे सर्वत्र मनमोहन सिंग यांच्या नावाची चर्चा होऊ लागली अशातचमनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांना मिनिस्ट्री ऑफ फॉरेन ट्रेड या ठिकाणी आडवायझर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली हे काम त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले यानंतर त्यांना 1972 मध्ये शासन स्तरावर आणखीन एक संधी मिळाली त्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली फायनान्स विभागातील चीफ एक्झिक्यूटिव्ह ॲडव्हायझर म्हणून त्यांनी काम पाहिले चांगली निर्णय क्षमता असल्यामुळे काही दिवसांमध्येच मनमोहन सिंग यांना तत्कालीन सरकारने वित्त विभागाचे सचिव केले भारताची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांनी घेतलेले निर्णय अत्यंत परिणामकारक सिद्ध झाले
देशाची आर्थिक परिस्थिती चांगली झाली याच कार्याची दखल घेऊन सरकारने त्यांना रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून 1982 मध्ये नियुक्त केले रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून काम करत असताना बँकांच्या कामकाजामध्ये सुधारणा येण्यासाठी अनेक निर्णय मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांनी घेतले त्या निर्णयामुळे बँकिंग व्यवस्था ही अत्यंत सुलभ झाली रिजर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांनी तीन वर्षे काम पाहिले
1985 मध्ये मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांची नियुक्ती प्लॅनिंग कमिशनच्या डेपिट्यू सेक्रेटरी म्हणून झाली देशातील विविध योजनांचे नियोजन ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी मनमोहन सिंग यांनी सेक्रेटरी म्हणून आपला चांगलाच प्रभाव पडला
MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
मनमोहन सिंग जी यांची राजकारणात प्रवेश(Entry of Manmohan Singh Ji into politics)
प्रसिद्ध अर्थतज्ञ म्हणून मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )हे नावा रूपास आले आरबीआयचे गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी काम पाहिले या सर्व कार्याची दखल राजकीय मंडळींनी घ्यायला सुरुवात केली व 1987 ला तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्या इकॉनॉमिक्स ऑफिस या क्षेत्रातील पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांची नियुक्ती करण्यात आली आणि इथूनच खऱ्या अर्थाने मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांची भारताच्या राजकारणामध्ये प्रवेश झाला असे म्हणावे लागेल यानंतर 1991 मध्ये पी.व्ही.नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )हे वित्तमंत्री झाले कॅबिनेट मंत्री म्हणून मनमोहन सिंग यांची ही पहिलीच वेळ होती वित्त मंत्री झाल्यानंतर मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न होता
ते 1990 पासून भारताची आर्थिक परिस्थिती ही पार डबघाईला आली होती देशातील सोने गहाण ठेवण्याची वेळ आपल्या देशावर आली होती एवढ्या मोठ्या समस्येला सामोरे जाऊन देशाची आर्थिक स्थिती ही पूर्वपदावर आणणे ही जबाबदारी मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांच्या खांद्यावर होती या ठिकाणी सुद्धा मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेऊन भारताची आर्थिक परिस्थितीपूर्वीसारखी केली याच काळामध्ये 1982 ला हर्षद मेहताचा शेअर बाजारामधील घोटाळा समोर आला यावेळी होणाऱ्या टीकेला देखील मनमोहन सिंग यांनी आपल्या कामातूनच उत्तर दिले देशाची आर्थिक स्थिती ही चांगली झाली 1999 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला याआधी मनमोहन सिंग हे राज्यसभेचे खासदार होते
पण या निवडणुकीमध्ये मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांचा पराभव झाला पण 2004 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश आले व 22 मे 2004 मध्ये मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )हे देशाचे पंतप्रधान झाले पंतप्रधान म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करताना मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांनी आरोग्य या विषयाचे गांभीर्य ओळखले व त्यावर काम करायला सुरुवात केली 2005 मध्ये नॅशनल हेल्थ कमिशनची स्थापना देखील मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांनीच केली
याद्वारे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी व ग्रामीण भागामध्ये अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळविण्यासाठी त्यांनी आरोग्य विभागामध्ये मोठे बदल केले याचा खूप मोठा फायदा देशवासीयांना झाला
2006 मध्ये मनमोहन सिंग यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे बदल केले व देशामध्ये आणि आयआयटी आयआयएम या ठिकाणी 20 टक्के जागा राखीव केल्या
तसेच आंध्र प्रदेश,बिहार,ओडीसा,पंजाब,मध्य प्रदेश,राजस्थान,हिमाचल प्रदेश या ठिकाणी आयआयटी ची स्थापना करण्यात आली या निर्णयामुळे जागतिक स्तरावरील शिक्षण हे भारतातील ग्रामीण भागामध्ये देखील मिळू लागले मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांच्या सरकारने घेतलेला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे महात्मा गांधी नॅशनल रुलर एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट म्हणजेच मनरेगा ची स्थापना केली मनरेगामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार युवक युवतींना त्यांच्याच गावामध्ये गॅरेंटेड रोजगार मिळू लागला आज सुद्धा ही योजना चालू आहे
2009 मध्ये शिक्षणाचा अधिकार राईट ऑफ चिल्ड्रन फ्री अँड कंपल्सरी 2009 यामध्ये सहा वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली व याविषयी कायदा देखील स्थापन करण्यात आला अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने सुरू केलेले सर्व शिक्षा अभियान या अभियानाला चालना देत मध्यान भोजन योजनेवर विशेष लक्ष दिले गेले त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू लागले
28 जानेवारी 2009 रोजी आधार कार्ड ची सुरुवात केली प्रत्येक देश वासियाला स्वतःचा एक युनिक नंबर पाहिजे यासाठी युडी आय आधार कार्ड तयार करून घ्यायची प्रक्रियेची सुरुवात केली
मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांचा परिवार
1958 मध्ये मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांचा विवाह गुरु शरण कर यांच्याशी झाला त्यांना तीन मुले आहेत
संकल्प टुडे च्या वतीने दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग जी(MANMOHAN SING JI )यांना भावपूर्ण श्रद्धांजली