खरीप पिकासाठी ई पीक पाहणी करण्यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत ची मुदतवाढ देण्यात आलेली आहे पण ही मुदत वाढ देऊन फारसा फायदा
हा शेतकऱ्यांचा होताना दिसत नाही कारणतांत्रिक अडचणीमुळे ईपीक पाहणी होतच नाहीये त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत
प्रधानमंत्री पिक विमा(Crop insurance)योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने एक रुपयांमध्ये पिक विमा(Crop insurance) ही योजना
आणली यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा(Crop insurance) हा आपल्या पिकाचा काढला आहे पण यासाठी दुसरी अट म्हणजे की
हा पिक विमा काढल्यानंतर ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे आणि यासाठी शासनातर्फे पूर्वी 31 ऑगस्ट पर्यंत ची मुदत देण्यात आली होती
आता पंधरा सप्टेंबर पर्यंत ची मुदतवाढ देण्यात आलेली आहे पण सदरील पीक पाहणी करत असताना सॉफ्टवेअर मध्ये येणाऱ्या अडचणीमुळे
बहुतांश शेतकरी(farmer)करू शकत नाही यामुळे शेतकरी(farmer)चांगले त्रस्त झाले आहेत तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मानवाचे आयुष्य हे सोपे
होतं असं बोललं जातं पण शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मात्र या तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा शेतकरी(farmer) तंत्रज्ञानामुळे त्रस्त आहे असं म्हणावं लागेल
ई पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी
आपण पिक विमा भरल्यानंतर आपण कुठल्या पिकाचा विमा (Crop insurance)भरला आहे यासाठी पेरा नोंदणी करणे हे अनिवार्य आहे ही
पेरा नोंदणी शेतात जाऊन फोटो काढून ई पीक पाहणी अँप वर डाऊनलोड करायची असते पण सध्या हे सॉफ्टवेअर हँग मारत असल्यामुळे
कित्येक तास वाट बघूनही ही पीक पाहण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाहीये. जेव्हा शेतकरी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करतात किंवा विमा कंपनीला
फोन करतात तो दोघेही उडवा उडवी चे उत्तर देतात यामुळे नेमकी ई पीक पाहणी कशी करायची आणि जर निसर्गाची अवकृपा झाली आणि
पिकाचे नुकसान झाले तर ती नुकसान भरपाई मिळेल तरी कशी या प्रश्नामुळे शेतकरी कमालीचे चिंतातुरआहेत
ई पीक पाहणी कशी करावी व कोणत्या चुका टाळाव्यात
विमा कंपन्या शेतकऱ्यांना पिक विमा(Crop insurance) देण्यासाठी टाळमटाळ करतात हे सर्व शेतकऱ्यांना ज्ञात आहे पण पिक विमा टाळताना
कंपन्या ह्या शेतकऱ्यांनी केलेल्या चुकीकडे बोट दाखवतात आपण भूतकाळात केलेल्या चुका या आपल्याला नंतर महागात पडतात व यामुळे
आपल्याला पिक विमा (Crop insurance)मिळत नाही जर आपण इ पीक पाणी व्यवस्थित रित्या केली तर आपल्याला या अडचणी येत नाहीत
व ई पीक पाणी व्यवस्थित केल्यानंतर देखील जर विमा कंपन्यांनी विमा देणे टाळले तर आपल्याला ग्राहक तक्रार मंचामध्ये दाद मागता येते पण
यासाठी ई पीक पाणी आणि तक्रार दोन्ही करणे अत्यंत आवश्यक आहे
सहसा शेतकरी पिक विम्याची(Crop insurance) मिळणारी रक्कम पाहून स्वतःचा पिकाचा पेरा ठरवतात म्हणजे कसं जर कापसाला सोयाबीन
पेक्षा जास्त विमा असेल तर शेतकरी कापसाचा विमा भरण्यामध्ये पसंती दाखवतात जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त विमा मिळावा ही
संकल्पना भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये असती पण नेमकी कंपन्या याचाच फायदा उचलतात आपण आपल्या शेतीच्या ज्या क्षेत्रामध्ये
जे पीक लावलेले आहे तसाच पेरा आपण नोंदविला पाहिजे याचे कारण म्हणजे आपण शेतामध्ये सोयाबीन लावलं व विमा काढताना जर आपण
कापसाचा विमा काढला आणि जर नुकसान झालं जेव्हा त्या कंपन्या
चे प्रतिनिधी आपल्या शेतामध्ये येतात तेव्हा आपण नोंद केलेली पीक त्यांना दाखवू शकत नाही आणि या कारणामुळे विमा कंपन्या लगेच आपला
विमा चा प्रस्ताव फेटाळून लावतात यासाठी आपण जे पीक शेतात पेरलेले आहे तसाच पेरा तयार करून त्या क्षेत्रामध्ये तेच पीक दाखवून सदरील
पेरा हा ई पीक पाहणी वर नोंदवावा ही पीक पाहणीची ॲप आहे ती वापरायला अत्यंत सोपी आहे यामध्ये शेवटीला आपला एक पिकाचा फोटो
हा अपलोड करावा लागतो आणि हा अपलोड केल्यानंतर आपलं एक पीक पाहणी पूर्ण होतं ज्या शेतकऱ्यांनी(farmer) शेतामध्ये एक पीक
लावलं व पेरा दुसरा भरला ते शेतकरी सहसा शेजारच्या शेतामध्ये जाऊन फोटो घेतात पण या फोटोच्या ॲप मध्ये अक्षांश रेखांश याप्रमाणे
फोटो काढलेले असते आणि दोन जागांचं अक्षांश रेखांश हा एक सारखा येऊ शकत नाही तसेच काही शेतकरी आपल्या मोबाईल मध्ये पिकाचा
फोटो घेऊन घरी येऊन हा फोटो ई पीक पाहणी अँप वर डाऊनलोड करायचा प्रयत्न करतात हे सुद्धा संपूर्ण चुकीचे आहे येथे सुद्धा फोटोमधील
जागेचा उल्लेख हा त्या ॲपमध्ये असतो त्यामुळे सुद्धा आपल्याला पुढे अडचणी येऊ शकतात मग मात्र शेतकरी(farmer) जेव्हा नुकसान होतो
जेव्हा ते तक्रार करतात तक्रारीनंतर जेव्हा प्रतिनिधी शेतात येतो तेव्हा पेरावरील पीक व प्रत्यक्ष शेतामधील पीक यामध्ये फरक आढळतो आणि
विमा कंपन्या आपल्याला विमा देण्यास नकार देतात आणि कायदेशीर दृष्ट्या आपण याच्या विरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागू शकत नाहीत यावर
पर्याय एकच आहे ज्या पद्धतीने आपण पीक पेरले त्याच पद्धतीने पेरा तयार करा व तोच पेरा ई पीक पाहणी वर नोंदवा फोटो त्याच शेतामध्ये घ्या
पिकाचे नुकसान झाल्यास तक्रार कुठे व कशी करायची
पिक विमा(Crop insurance) मिळविण्यासाठी इ पीक पाहणी झाल्यानंतर जर अतिवृष्टीमुळे किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे जर आपल्या
पिकाचे नुकसान झाले असेल तर नुकसान झालेल्या क्षणापासून ते 24 तासाच्या आत आपण कंपनीने दिलेल्या टोल फ्री क्रमांक किंवा ई-मेल
आयडीवर आपली तक्रार नोंदवावी बऱ्याच वेळेला शेतकरी तक्रारी नोंदवतात पण यानंतर विमा कंपनीचा प्रतिनिधी शेतामध्ये येण्यासाठी दहा ते
बारा दिवसाचा वेळ लावतात आणि ही त्या विमा कंपन्यांच्या सर्वात मोठी चूक असते कारण आपण तक्रार केल्यानंतर 24 तासाच्या आत त्यांनी
सुद्धा आपल्या शेतामध्ये पाहणी करायला आलं पाहिजे पण सहसा कंपन्या असं करत नाहीत व कायदे माहित असल्यामुळे आपणही त्यांना जाब
विचारत नाहीत तो विमा कंपनीचा प्रतिनिधी जेव्हा आपल्या शेतामध्ये येईल बारा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर आपण त्याला कुठले नुकसान
दाखवायचे हा प्रश्न आपल्याला पडतो व तो विमा प्रतिनिधी आपल्याला सांगतो की तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं नाही आपण तो प्रतिनिधी
आल्यानंतर एक फोटो व त्याने केलेल्या कॉल चे स्क्रीन शॉट घेऊन ठेवावेत आणि विमा कंपनीने जर आपला दावा फेटाळला किंवा आपले
झालेल्या नुकसानीपेक्षा भरपाई कमी दिली तर आपण ग्राहक तक्रार मंचांमध्ये याविषयी दाद मागू शकतो पण यासाठी सर्व पुरावे आपल्याकडे
तयार पाहिजेत बरेचदा शेतकरी ग्राहक तक्रार मंचामध्ये जाऊन कोण डोकेदुखी करून घेणार म्हणून या गोष्टीकडे कानाडोळा करतात पण
लक्षात ठेवा शेतकरी(farmer) मित्रांनो नुकसान हे आपलं झालेलं असतं शासनाने आपल्या पिकांचा विमा काढण्यासाठी विम्याचा हप्ता हा पूर्ण
भरलेला असतो एवढा खर्च झालेला असतो त्यामुळे आपणही आपले स्वतःचे नुकसान करून घेण्यात काही अर्थ नसतो आपण जरूर ग्राहक तक्रार
मंचामध्ये या अन्यायाच्या विरुद्ध दाद मागितली पाहिजे
ग्राहक तक्रार मंचामध्ये सुद्धा अर्ज देण्यासाठी अत्यंत सोपी प्रक्रिया आहे ग्राहक तक्रार मंचामध्ये जाऊन एखाद्या वकिलाचा नंबर घेऊन आपण
वकिलामार्फत आपली तक्रार ही ग्राहक तक्रार मंच्यामध्ये दाखल करावी जेणेकरून तो वकील आपली बाजू ही ग्राहक तक्रार मंचामध्ये भक्कम
मांडेल व कायदेशीर दृष्ट्या मांडेल आणि आपले नुकसान होणार नाही
15 सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणी करण्याची मुदत आहे या मुदतीआधी आपण योग्यरीत्या आपले पिक पाहणी करून घ्यावे व ई पीक पाहणी
करताना कुठल्याही चुका करू नका आणि नुकसान झाल्यानंतर 24 तासाच्या आत तक्रार द्यायलाही विसरू नका आधीच शेती ही फायद्याची
ठरत नाहीये आणि त्यात होणारे नुकसान हे शेतकऱ्यांना परवडणारे नाही तरी संकल्प टुडे च्या वतीने आपल्याला नम्र विनंती आहे की योग्यरीत्या
ई पीक पाहणी करून आपण योग्यरीत्या तक्रार दाखल करावी
Recent News
ई पीक पाहणी करण्यासाठी १५ सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ पण ई पीक पाहणी करायला येत आहेत अडचणी
ई पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी मुळे शेतकरी त्रस्त